________________
४३४)
पीठिकामन्त्र एषः स्यात्पदेरेभिः समुच्चितैः । जातिमन्त्रमितो वक्ष्ये यथाश्रुतमनुक्रमात् ॥ २६ सत्यजन्मपदं नान्तमादौ शरणमप्यतः । प्रपद्यामीति वाच्यं स्यादर्हज्जन्मपदं तथा ॥ २७ अर्हन्मातृपदं तद्वत्त्वन्तमर्हत्सुताक्षरम् । अनादिगमनस्येति तथानुपमजन्मनः ॥ २८ रत्नत्रयस्य शरणं प्रपद्यामीत्यतः परम् । बोद्धयन्तं च ततः सम्यग्दृष्टिं द्वित्वेन योजयेत् ॥ २९ ज्ञानमूर्तिपदं तद्वत्सरस्वतिपदं तथा । स्वाहान्तमन्ते वक्तव्यं काम्यमन्त्रश्च पूर्ववत् ॥ ३०
महापुराण
सिद्धेभ्यो नमो नमः | ३१ ) अनादिपरम्परसिद्धेभ्यो नमो नमः । ३२) अनाद्यनुपम सिद्धेभ्यो नमो नमः। ३३) सम्यग्दृष्टे सम्यग्दृष्टे, आसन्नभव्य आसन्नभव्य, निर्वाणपूजार्ह निर्वाणपूजार्ह अग्नीन्द्र अग्नीन्द्र स्वाहा । सेवाफलं षट्परमस्थानं भवतु, अपमृत्युविनाशनं भवतु, समाधिमरणं भवतु । याप्रमाणे पीठिकामन्त्र सांगितले ।। २२-२५ ।।
(४०-२६
याप्रमाणे यावरील सर्वपदानी पीठिकामंत्राचे वर्णन केले आहे. आता पुढे शास्त्राला अनुसरून मी जातिमंत्र सांगेन ।। २६ ।।
आरंभी नकारान्त सत्यजन्म हा शब्द आहे व याच्यानंतर शरण शब्द आहे. यानंतर प्रपद्यामि हे पद बोलावे आणि अर्हज्जन्म हे पद बोलावे ।। २७ ।
तसेच अर्हन्मातृपद बोलून अन्ती शरणादिक पदे बोलावीत. यानंतर अर्हत्सुताक्षरअर्हत्सुत हे पद बोलून शरणादिक पदे बोलावीत. अनादिगमनस्य हे पद बोलून शरणादिक पदे बोलावीत. यानंतर अनुपमजन्मनः हे पद बोलून शरणादिक पदे बोलावीत ॥ २८ ॥
यानंतर रत्नत्रयस्य शरणं प्रपद्यामि हे पद बोलावे. यानन्तर सम्यग्दृष्टि हे सम्बोधनात्मक पद दोन वेळा बोलावे ।। २९ ।।
Jain Education International
ज्ञानमूर्तिपद व सरस्वतिपद ही पदे दोन वेळा उच्चारून अन्ती स्वाहापद बोलावे. यानन्तर काम्यमंत्र पूर्वीप्रमाणे बोलावा. १ सत्यजन्मनः शरणं प्रपद्यामि - मी सत्यरूप जन्माला धारण करणाऱ्या जिनेन्द्राला शरण जातो. २) अर्हज्जन्मनः शरणं प्रपद्यामि- अरिहंतपदाला योग्य जन्म धारण करणान्याला मी शरण जातो. अर्हन्मातुः शरणं प्रपद्यामि मी अर्हन्ताच्या मातेला शरण जातो. अर्हत्सुताला म्हणजे अरिहंत ज्याचा पुत्र आहे अशाला म्हणजे अरिहंताच्या पित्याला मी शरण जातो. अनादिगमनस्य शरणं प्रपद्यामि- अनादि ज्ञानाला धारण करणाऱ्याला मी शरण जातो त्याचा आश्रय घेतो. अनुपमजन्मनः शरणं प्रपद्यामि मी ज्याचा जन्म अनुपम उपमारहित श्रेष्ठ आहे त्याला मी शरण जावो. रत्नत्रयस्य शरणं प्रपद्यामि मी रत्नत्रयाला शरण जातो. हे सम्यग्दृष्टे, हे सम्यग्दृष्टे, हे ज्ञानमूर्ते, हे ज्ञानमूर्ते, हे सरस्वति, हे सरस्वति, स्वाहा हे सम्यग्दृष्टि सम्यग्दृष्टि युक्त सरस्वति, हे सरस्वति मी तुला हवि अर्पण करतो. सेवेचे फल अशी षट्स्थानांची मला प्राप्ति होऊ दे. अपमृत्युविनाशनं भवतु, समाधिमरणं भवतु । अपमृत्यु टळो आणि मला समाधिमरण प्राप्त होवो ॥ ३० ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org