Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३९-२११)
पुष्पिताग्रा वृत्तम्
महापुराण
शार्दूलविक्रीडितम् - भव्यात्मा समवाप्य जातिमुचितां जातस्ततः सद्गृही । पारिव्राज्यमनुत्तरं गुरुमतादासाद्य यातो दिवम् ॥ तत्रैन्द्रीं श्रियमाप्तवान्पुनरतश्च्युत्वा गतश्चक्रिताम् । प्राप्तार्हन्त्यपदः समग्र महिमा प्राप्नोत्यतो निर्वृतिम् ॥ २११
जनमत विहितं पुराणधर्मम् । य इममनुस्मरति क्रियानुबद्धम् । अनुचरति च पुण्यधीः स भव्यो भवभयबन्धनमाशु निर्धुनाति ॥ २०९ परम जिनपदानुरक्तधीर्भजति पुमान् य इमं क्रियाविधिम् । स धुतनिखिलकर्मबन्धनो जननजरामरणान्तकृद्भवेत् ॥ २१०
इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्यविरचिते त्रिषष्टिलक्षणश्री महापुराणसङग्रहे दीक्षान्वय क्रियावर्णनं नामैकोनचत्वारिंशत्तमं पर्व ॥ ३९ ॥
( ४२९
पवित्र बुद्धिधारक जो भव्यजीव वर सांगितलेल्या तीन क्रियानी युक्त अशा जिनमतातील पुराणधर्माचे वारंवार स्मरण करतो व त्याचे आचरण करतो तो शीघ्र संसाराच्या भीतिदायक बंधाचा नाश करतो ॥ २०९ ॥
Jain Education International
उत्तम जिनेश्वराच्या चरणावर ज्याची बुद्धि प्रीतियुक्त झाली आहे असा जो भव्य या क्रियाविधीचा आश्रय करतो. तो संपूर्ण कर्माच्या बन्धाना नष्ट करतो आणि तो जन्म, वृद्धावस्था व मरणाचा नाश करतो ।। २१० ॥
हा भव्यात्मा - भव्यपुरुष प्रथम योग्य जातीची प्राप्ति करून घेतो व नन्तर तो उत्तम गृहस्थ होतो. यानंतर गुरूच्या आज्ञेने उत्कृष्ट मुनिदीक्षा धारण करतो व आयुष्यांती स्वर्गात जातो. तेथे त्याला इन्द्राची लक्ष्मी प्राप्त होते. पुनः तेथून च्युत झाल्यावर चक्रवर्तीचे पद त्याला मिळते. यानन्तर सम्पूर्ण महात्म्याने भरलेले अरिहन्ताचे पद त्याला प्राप्त होते आणि त्यानन्तर तो भव्यात्मा मोक्ष प्राप्त करून घेतो ।। २११ ।।
याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यप्रणीत आर्षत्रिषष्टिलक्षण श्रीमहापुराण संग्रहाच्या मराठी भाषानुवादात दीक्षान्वयक्रिया व कर्त्रन्वय क्रियांचे वर्णन करणारे एकोणचाळीसावें पर्व समाप्त झाले.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org