Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४२८)
महापुराण
(३९-२०१
या सुरेन्द्रपदप्राप्तिः पारिवाज्यफलोदयात् । सैषा सुरेन्द्रता नाम क्रिया प्रागनवणिता ॥ २०१
(इति सुरेन्द्रता) साम्राज्यमाधिराज्यं स्याच्चक्ररत्नपुरःसरम् । निधिरत्नसमुद्भूतभोगसम्पत्परम्परम् ॥ २०२ ।।
(इति साम्राज्यम् ) आर्हन्त्यमहतो भावः कर्म वेति परा क्रिया । यत्र स्वर्गावतारादिमहाकल्याणसम्पदः ॥ २०३ यासौ दिवोऽवतीर्णस्य प्राप्तिः कल्याणसम्पदाम् । तदाहन्त्यमिति ज्ञेयं त्रैलोक्यक्षोभकारणम् ।। २०४
(इत्याहन्त्यम्) भवबन्धनमुक्तस्य यावस्था परमात्मनः । परिनिवृतिरिष्टा सा परं निर्वाणमित्यपि ॥ २०५। कृत्स्नकर्ममलापायात्संशुद्धिर्यान्तरात्मनः । सिद्धिः स्वात्मोपलब्धिः सा नाभावो न गुणच्छिदा॥२०६ इत्यागमानुसारेण प्रोक्ताः कन्वयक्रियाः । सप्तैताः परमस्थानसङ्गतिर्यत्र योगिनाम् ॥ २०७ योऽनुतिष्ठत्यतन्द्रालुः क्रिया ह्येतास्त्रिधोदिताः। सोऽधिगच्छेत्परं धाम यत्सम्प्राप्तौ परं शिवम्॥ २०८
जी या साध्वर्याला देवेन्द्रपदाची प्राप्ति होते ती पारिवाज्याचे फल आहे. ह्या सुरेन्द्रक्रियेचे वर्णन पूर्वी केलेले आहे. अशी सुरेन्द्रक्रिया आहे ॥ २०१॥
__साम्राज्य ज्याला आधिराज्य- सर्वोत्कृष्टराज्य म्हणतात हे चक्ररत्नाच्या प्राप्तीने युक्त असते. याची प्राप्ति झाली असता नऊ निधि व चौदा रत्ने यांच्यापासून भोगपदार्थांची परम्परा प्राप्त होते. याप्रमाणे साम्राज्यक्रियेचे वर्णन आहे ॥ २०२॥
अरिहन्ताची अवस्था प्राप्त होणे यास आर्हन्त्य म्हणतात किंवा अरिहन्ताच्या पदसूचक ज्या क्रिया होतात त्यास आर्हन्त्य म्हणतात जसे- सोळा स्वप्ने मातेला पडणे, यानंतर स्वर्गातून अवतरण होणे, इत्यादि महाकल्याणसंपदांची प्राप्ति होते ॥ २०३ ॥
स्वर्गातून अवतीर्ण झाल्यावर जी गर्भ, जन्म, दीक्षा, केवलज्ञान व मुक्तिप्राप्ति या पाच कल्याणांची प्राप्ति होते त्यास आर्हन्त्य-अर्हत्पद म्हणावे. हे अर्हत्पद त्रैलोक्यात क्षोभ उत्पन्न करणारे आहे. याप्रमाणे आहन्त्यक्रियेचे वर्णन आहे ।। २०४ ॥
संसारबन्धनापासून मुक्त झालेल्या परमात्म्याची जी अवस्था तिला परिनिर्वृति म्हणतात व तिलाच परंनिर्वाण असेही म्हणतात- संपूर्ण कर्ममलांचा नाश झाल्यावर जी अन्तरात्म्याची शुद्धि होते तिला सिद्धि म्हणतात व तिलाच आपले आत्म्याची शुद्धस्वरूप प्राप्ति असेही म्हणतात. ही शुद्धस्वरूपप्राप्ति अभावरूपाची नाही किंवा शुद्धात्म्याच्या सर्वगुणांचा नाश होणे या स्वरूपाचीही नाही ।। २०५-२०६ ।।
याप्रमाणे आगमाला अनुसरून सात कर्जन्वयक्रिया सांगितल्या आहेत. या क्रियांनी योगिजनाना परमस्थानाची-मोक्षाची प्राप्ति होते ॥ २०७ ।।
___ जो भव्यजीव आळसरहित होऊन या तीन प्रकारच्या सांगितलेल्या क्रिया (गर्भान्वयक्रिया, दीक्षान्वय क्रिया आणि कन्वयक्रिया) आगमाला अनुसरून करतो त्याला उत्कृष्ट स्थानाची-मोक्षाची प्राप्ति होईल व त्याची प्राप्ति झाल्यावर उतम शिव-सुख प्राप्त होईल ॥ २०८ ॥
अ
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org