Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४२६)
गृहशोभां कृतारक्षां दूरीकृत्य तपस्यतः । श्रीमण्डपादिशोभास्य स्वतोऽभ्येति पुरोगताम् ॥ १८६ तपोऽवगाहनादस्य गहनान्यधितिष्ठतः । त्रिजगज्जनतास्थानसहं स्यादवगाहनम् ॥ १८७ क्षेत्रवास्तुसमुत्सर्गात्क्षेत्रज्ञत्वमुपेयुषः । स्वाधीनत्रिजगत्क्षेत्रमश्यमस्योपजायते ॥ १८८ आज्ञाभिमानमुत्सृज्य मौनमास्थितवानयम् । प्राप्नोति परमामाज्ञां सुरासुरशिरोधृताम् ॥ १८९ स्वामिष्टभृत्य बन्ध्वाविसभामुत्सृष्टवानयम् । परमाप्तपदप्राप्तावध्यास्ते त्रिजगत्सभाम् ॥ १९० स्वगुणोत्कीर्तनं त्यक्त्वा त्यक्तकामो महातपाः । स्तुतिनिन्दासमो भूयः कीर्त्यते भुवनेश्वरैः ॥ १९१ वन्दित्वा वन्द्यमर्हन्तं यतोऽनुष्ठितवांस्तपः । ततोऽयं वन्द्यते वन्द्यैरनिन्द्यगुणसन्निधिः ॥ १९२
महापुराण
जिचे रक्षण केले जात आहे अशा घरांची शोभा त्यागून तपश्चरण करणाऱ्या या मुनीच्यापुढे श्रीमण्डपादिकांची शोभा आपोआप स्वतःच येते ।। १८६ ॥
( ३९ - १९२
तपश्चरणात अवगाहन सर्व प्रकारे प्रवेश करून अरण्यात राहणाऱ्या या मुनीला तीर्थंकरत्व प्राप्त झाल्यावर त्रैलोक्यातील जीवाना ज्यामध्ये स्थान मिळते अशी अवगाहनशक्ति प्राप्त होते. अर्थात् केवलज्ञान झाल्यावर या तपस्व्याला समवसरणसभा प्राप्त होते व याला अवगाहनशक्ति प्राप्त झाल्यामुळे त्रैलोक्यातील सर्व जीवाना त्यात सुखाने स्थान प्राप्त होते ॥ १८७ ॥
क्षेत्र - शेत व वास्तु-घर यांचा त्याग झाल्यामुळे क्षेत्रज्ञत्व - आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले अर्थात् केवलज्ञान झाले त्यामुळे या साधूला त्रैलोक्याचे क्षेत्र स्वाधीन होऊन त्याचे स्वामित्व प्राप्त होते ।। १८८ ॥
गृहस्थावस्थेतला आज्ञा करण्याचा स्वभाव व अभिमान हे टाकून दिल्यामुळे या मुनिराजाने मौनाचे सेवन केले आहे त्यामुळे या साधूच्या ठिकाणी सर्व सुर आणि असुर आपल्या मस्तकानी याची आज्ञा मान्य करतात ॥ १८९ ॥
या मुनिराजाने आपले आवडते मित्र, नोकर, बन्धु आदिकांच्या सभेचा त्याग केला त्यावरील मोह त्यागल्यामुळे त्याला उत्कृष्ट आप्तपदाची सर्वज्ञतेची प्राप्ति झाली आणि हा साधु त्रैलोक्याच्या सभेत विराजमान झाला आहे ।। १९० ।।
या साघुराजाने आपल्या गुणांची बढाई मारणे सोडून दिले, कामविकाराचा त्याग केला व स्तुति व निंदासमान मानून तद्विषयक हर्षविषाद त्यागले व महातप केले. त्यामुळे त्रैलोक्याच्या सर्व स्वामीनी वारंवार स्तविला गेला आहे ।। १९१ ॥
Jain Education International
त्रैलोक्यवद्य अशा अर्हत्परमेष्ठींना वन्दन करून या साधुवर्याने तपश्चरण एकनिष्ठेने केले. म्हणून हा साधुपुंगव अनिंद्य-प्रशंसनीय गुणांचा निधि बनला व त्यामुळे वन्द्य साधूंनी ही वन्दना करण्यास योग्य झालेला आहे ।। १९२ ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org