Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३९-२००)
महापुराण
(४२७
.............................
तपोऽयमनुपानत्कः पादचारी विवाहनः । कृतवान्पद्मगर्भेषु चरणन्यासमर्हति ॥ १९३ वाग्गुप्तो हितवाग्वृत्या यतोऽयं तपसि स्थितः । ततोऽस्य दिव्यभाषा स्यात्प्रीणयन्त्यखिला सभाम् ॥ अनाश्वानियताहारपारणोऽतप्त यत्तपः । तदस्य दिव्य विजयपरमामृततृप्तयः ॥ १९५ त्यक्तकामसुखो भूत्वा तपस्यस्थाच्चिरं यतः। ततोऽयं सुखसाद्भूत्वा परमानन्द) भजेत् ॥ १९६ किमत्र बहुनोक्तेन यद्यदिष्टं यथाविषम् । त्यजेन्मुनिरसङ्कल्पस्तत्तत्सूतेऽस्य तत्तपः ॥ १९७ प्राप्तोत्कर्ष तदस्य स्यात्तपश्चिन्तामणेः फलम् । यतोऽर्हज्जातिमूर्त्यादिप्राप्तिः संषानुवर्णिता ॥ १९८ जैनेश्वरी परामाज्ञां सूत्रोद्दिष्टां प्रमाणयन् । तपस्यां यदुपाधत्ते पारिवाज्यं तदाञ्जसम् ॥ १९९ अन्यच्च बहुवाग्जाले निबद्धं युक्तिबाधितम् । पारिवाज्यं परित्यज्य ग्राह्यं चेदमनुत्तमम् ॥२००
(इति पारिवाज्यम्) जोडा-चपला इत्यादिकांचा ज्याने त्याग केला व गाडी, घोडा आदि वाहनांचाही ज्याने त्याग केला आहे व केवळ पायानीच चालणाऱ्या या साधूने जे तप केले त्यामुळे कमलांच्या मध्यभागात पावले ठेवून विहार करण्यास योग्य होतो ।। १९३ ॥
या मुनिवर्याने वचनगुप्तीचे पालन केले किंवा हितकर वचनांचा प्रयोग केला अशारीतीने वागून हे मुनि तपात स्थिर झाले होते म्हणून याना सर्वसभेला प्रीति उत्पन्न करणारी दिव्यवाणी प्राप्त झाली आहे ॥ १९४ ॥
या साधुवर्याने उपवास करून किंवा नियमित आहार घेऊन पारणा केली व अशारीतीने तपश्चरण केले म्हणून याला दिव्यतृप्ति, विजयतृप्ति, परमतृप्ति, अमृततृप्ति अशा चार तृप्ति प्राप्त झाल्या आहेत ॥ १९५ ॥
ह्या मुनिराजाने कामसुखाचा त्याग करून दीर्घकालपर्यन्त तप केले त्यामुळे हा अनन्त सुखी होऊन उत्कृष्ट आनन्दाला प्राप्त होईल ॥ १९६ ॥
आता याविषयी अधिक सांगणे पुरे. या मुनिराजाला जे जे ज्या प्रकारचे आवडते पदार्थ आहेत त्या त्या पदार्थांची मला प्राप्ति व्हावी असा संकल्प मुनीश्वराने त्यागावा. त्या पदार्थाचा संकल्प त्यागणाऱ्या त्याला त्याच्या तपश्चर्येने ते ते प्राप्त होतात ॥ १९७ ॥
___ या मुनीश्वराने ज्यांचा संकल्प केला नव्हता असे ते ते पदार्थ उत्कर्षाने सहित असे प्राप्त होतात. अर्थात् हे त्याच्या चिन्तामणिस्वरूप तपश्चरणाचे फल आहे. अर्थात् या तपश्चरणापासून अर्हज्जाति, मूर्ति आदिकांची प्राप्ति होते. अशा या पारिव्राज्यक्रियेचे वर्णन केले ॥ १९८॥
जिनेश्वरानी आगमात वर्णिलेल्या उत्कृष्ट आज्ञेला प्रमाण मानून तिचे पालन करणाऱ्या मुनिवर्याने जे तप धारण केले आहे त्याला पारिव्राज्य म्हणतात व तेच आजसखरे आहे, निर्दोष आहे. अनेक प्रकारच्या वचनांच्या जाळ्यात जे बांधले आहे अशारीतीचे युक्तिबाधित जें अन्यलोकानी सांगितलेले पारिव्राज्य आहे त्याचा त्याग करावा व आम्ही जे पारिव्राज्य सांगितले आहे ते ग्रहण करावे व ते सर्वोत्कृष्ट आहे. याहून इतर पारिव्राज्य उत्कृष्ट नाहीच याप्रमाणे पारिव्राज्य वर्णिले आहे ॥ १९९-२००॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org