Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
चत्वारिशत्तमं पर्व ।
अथातः सम्प्रवक्ष्यामि क्रियासूत्तरचूलिकाम् । विशेषनिर्णयो यत्र क्रियाणां तिसणामपि ॥१ तत्रादौ तावदुम्नेष्ये क्रियाकल्पप्रक्लप्तये । मन्त्रोद्धारं क्रियासिद्धिर्मन्त्राषीना हि योगिनाम् ॥ २ आधानादिक्रियारम्भे पूर्वमेव निवेशयेत् । त्रीणि छत्राणि चक्राणां त्रयं त्रीश्च हविर्भुजः ॥३ मध्येवेदि जिनेन्द्रार्चाः स्थापयेच्च यथाविधि । मन्त्रकल्पोऽयमाम्नातस्तत्र तत्पूजनाविधौ ॥ ४ नमोऽन्तो नीरजश्शब्दश्चतुर्थ्यन्तोऽत्र पठ्यताम् । जलेन भूमिबन्धार्थ परा शुद्धिस्तु तत्फलम् ॥ ५ वस्तरणसम्बन्धस्ततः पश्चादुवीर्यताम् । विघ्नोपशान्तये दर्पमथनाय नमः पदम् ॥६ गन्धप्रदानमन्त्रश्च शीलगन्धाय वै नमः । पुष्पप्रदानमन्त्रोऽपि विमलाय नमः पदम् ॥ ७
यानंतर मी ज्या गर्भान्वय, दीक्षान्वय व कन्वय अशा तीन क्रियांचे वर्णन मागील अध्यायात केले आहे त्यांची उत्तरचूलिका या अध्यायात सांगतो. या उत्तरचूलिकेत या तीनही क्रियांचा विशेष निर्णय होईल ॥ १॥
__ यात प्रारंभी सगळ्या क्रियांच्या समूहाची सिद्धि व्हावी म्हणून मन्त्रोद्धार-मन्त्राच्या रचनेचे वर्णन करतो. कारण योग्यांची क्रियासिद्धि देखिल मन्त्रांच्या आधीनच असते ॥ २ ॥
आधानादिक्रिया करण्याच्या आरंभी प्रथमतः तीन छत्रे, तीन चक्रे आणि तीन अग्नींची स्थापना करावी ॥३॥
वेदीच्या मध्यभागी विधिपूर्वक श्रीजिनप्रतिमांची स्थापना करावी व जिनप्रतिमांच्या पूजनविधीमध्ये वर्णिलेला मंत्रसमूह उपयोगात आणावा ॥ ४ ॥
ज्याच्या अन्ती नमः शब्द आहे असा चतुर्थ्यन्त नीरज शब्द भूमिसेचनासाठी पूजकाने म्हणावा व या मंत्राने द्रव्यकर्मे ज्ञानावरणादिक व भावकर्मे अज्ञान, राग, द्वेष, मोह आदिक या उभयकर्मानीरहित अशा जिनेश्वरास नमस्कार असा अभिप्राय आहे. उत्तम आत्मशुद्धि होणे या मंत्राचे फल आहे. तात्पर्य, या मंत्राचा उच्चार करून भूमिशुद्धि करावी व या मंत्राने आत्मशुद्धीही होते ॥ ५ ॥
यानंतर त्या शुद्ध केलेल्या जमीनीवर दर्भ पसरावे व विघ्नांची शान्ति व्हावी म्हणून दर्पमथनाय नमः हा मन्त्र उच्चारावा. अहंकाराला ज्यानी नष्ट केले त्या जिनेश्वरांना नमस्कार असा या मंत्राचा अर्थ आहे ॥ ६ ॥
यानंतर गंधप्रदानमंत्र ‘शीलगंधाय नमः' हा मंत्र म्हणावा. अठरा हजारशीलांचा सुगंध धारण करणाऱ्या जिनेश्वरास नमस्कार असा याचा अर्थ आहे. यानन्तर विमलाय नमः हा मंत्र म्हणून पुष्पप्रदान करावे. कर्ममलरहित जिनेश्वराला नमस्कार असा याचा अभिप्राय आहे ॥ ७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org