Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३८-१४१)
महापुराण
(३८३
ततोऽस्यगुर्वनुज्ञानादिष्टा वैवाहिकी क्रिया । वैवाहिके कुले कन्यामुचितां परिणेष्यतः ॥ १२७ सिद्धार्चनविधि सम्यक् निवर्त्य द्विजसत्तमाः । कृताग्नित्रयसम्पूजा कुर्यस्तत्साक्षि तां क्रियाम् ॥ १२८ पुण्याश्रमे क्वचित्सिद्धप्रतिमाभिमुखं तयोः । दम्पत्योः परयाभूत्या कार्यः पाणिग्रहोत्सवः ॥ १२९ वेद्यां प्रणीतमग्नीनां त्रयं द्वयमर्थककम् । ततः प्रदक्षिणीकृत्य प्रसज्य विनिवेशनम् ॥ १३० पाणिग्रहणदीक्षायां नियुक्तं तद्वधूवरम् । आसप्ताहं चरेद्ब्रह्मव्रतं देवाग्निसाक्षिकम् ॥ १३१ क्रान्त्वा स्वस्योचितां भूमि तीर्थभूमीविहृत्य च । स्वगृहं प्रविशेद्भत्या परया तद्वधूवरम् ॥ १३२ विमुक्तकणं पश्चात्स्वगृहे शयनीयकम् । अधिशय्य यथाकालं भोगाङ्गरुपलालितम् ॥ १३३ सन्तानार्थमृतावेव कामसेवां मिथोभजेतृ । शक्तिकालव्यपेक्षोऽयं क्रमोऽशक्तेष्वतोन्यथा ॥ १३४ एवं कृत विवाहस्य गार्हस्थ्यमनुतिष्ठतः । स्वधर्मानतिवृत्त्यर्थ वर्णलाभमतो ब्रुवे ॥ १३५ ऊढभार्योऽप्ययं तावदस्वतन्त्रो गुरोर्गृहे । ततः स्वातन्त्र्यसिद्धर्थ वर्णलाभोऽस्यवणितः ॥ १३६ गुरोरनुज्ञया लब्धधनधान्यादिसम्पदः । पृथक्कृतालयस्यास्य वृत्तिवर्णाप्तिरिष्यते ॥ १३७ तदापि पूर्ववत्सिद्धप्रतिमार्चनमग्रतः । कृत्वान्योपासकान्मुख्यान्साक्षीकृत्यार्पयेद्धनम् ॥ १३८ धनमेतदुपादायस्थित्वास्मिन्स्वगृहे पृथक् । गृहिधर्मस्त्वया धार्यः कृत्स्नो दानादिलक्षणः ॥ १३९ यथास्मत्पित दत्तेन धनेनास्माभिरजितम् । यशोधर्मश्चतद्वत्त्वं यशोधर्मानुपार्जय ॥ १४० इत्येवमनुशिष्यनं वर्णलाभे नियोजयेत् । सदाचारः स सद्धर्म तथानुष्ठातुमर्हति ॥ १४१
___ यानन्तर याच्या गुरूची आज्ञा घेऊन या बटूची विवाहक्रिया करावी. विवाह करण्यायोग्य अशा कुलातील योग्य कन्याबरोबर विवाह करावा. प्रथमतः सिद्धांची पूजाउत्तम रीतीने करावी व दक्षिण, गार्हपत्य आणि आहवनीय या तीन अग्नीची उत्तम रीतीने पूजा केल्यावर सिद्ध व अग्नित्रयांच्या साक्षीने ही विवाहक्रिया करावी. एखाद्या पवित्र स्थानी मोठ्या वैभवाने सिद्ध प्रतिमेच्या पुढे त्या दंपतीचा पाणिग्रहणविधि करावा अर्थात् वराच्या हातात कन्येचा हात द्यावा. पित्याने कन्यादान विधि करावा. वेदीवर तीन किंवा दोन अथवा एक अग्नीला वधूवरानी प्रदक्षिणा घालून एकमेकाजवळ बसावे. विवाह विधीत नियुक्त झालेल्या त्या वधूवरानी सात दिवसपर्यन्त देवाग्नीच्या साक्षीने ब्रह्मचर्यव्रत पाळावे. नंतर योग्य अशा ठिकाणी जाऊन किंवा तीर्थाच्या स्थानी जाऊन वधुवरानी मोठ्या समारंभाने आपल्या घरात प्रवेश करावा. यानंतर विवाह कंकण सोडावे. तांबूल वगैरे उपभोग्य वस्तूचे सेवन करावे. भोग आणि उपभोगांच्या साधनानी सज्ज अशा शय्येवर शयन करावे. केवळ पुत्रोत्पत्तीच्या इच्छेनेच ऋतुकाली वधुवरांनी कामसेवन करावे. हा संभोगाचा व्यवहार शक्ति व काळ यावर अवलंबून आहे. पण जे अशक्त आहेत त्यांचा याहून विपरीत क्रम समजावा. अर्थात् त्यानी संभोगात तत्पर राहू नये. याप्रमाणे ही विवाहक्रिया १७ वी आहे ॥१२७-१३४॥
याप्रमाणे ज्याचा विवाह झाला आहे व जे गृहस्थाश्रमाचे पालन करीत आहे, अशा आपल्या पुत्राने आपल्या धर्माप्रमाणे वागावे. म्हणून आता वर्णलाभ नावाची क्रिया मी सांगतो. जरी आपल्या पुत्राचा विवाह झाला तरीही तो आपल्या पित्याच्या घरी स्वतन्त्र मानला जात नाही. तेव्हा त्याला स्वातन्त्र्याची प्राप्ति व्हावी म्हणून वर्णलाभ हा संस्कार येथे वणिला आहे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org