Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४००)
महापुराण
(३८-२८७
पुरःसरेष निःशेषनिरुद्धव्योमवीथिषु । सुरासुरेषु तन्वत्सु सन्दिग्धार्कप्रभं नभः ॥ २८७ अन्तःस्थितेषु सम्प्रीत्या पार्थिवेषु ससम्भ्रमम् । कुमारमग्रतःकृत्वा प्राप्तराज्यं नवोदयम् ॥ २८८ अनुयायिनि तत्त्यागादिव मन्दीभवद्युतौ । निधीनां सहरस्नानां सन्दोहेऽभ्यर्णसाक्षये ॥ २८९ सैन्ये च कृतसन्नाहि शनैःसमनुगच्छति । मरुघूतध्वजवातनिरुद्धपवनाध्वनि ॥ २९० ध्वनत्सु सुरतूर्येषु नृत्यत्यप्सरसा गणे । गायन्तीषु कलक्वाणं किन्नरीषु च मंगलम् ॥ २९१ भगवानभिनिष्क्रान्तःपुण्ये कस्मिंश्चिदाश्रमे । स्थितःशिलातले स्वस्मिश्चेतसीवातिविस्तुते ॥२९२ निर्वाणवीक्षयात्मानं योजयन्नद्भुतोदयः । सुराधिपैःकृतानन्दचितः परयेज्यया ॥ २९३ योऽत्र शेषो विधिर्मुक्तःकेशपूजादिलक्षणः । प्रागेव स तु निर्णीतो निष्क्रान्तौ वृषभेशिनः ॥ २२४
इति निष्क्रान्तिः ॥ ४८
सुर व असुर देव पुढे चाललेले असतात व त्यांनी सर्व आकाशाचे मार्ग रोकलेले असतात व त्यांनी व्याप्त झालेले आकाश सूर्याच्या कान्तीने व्याप्त झाले की काय असा संशय उत्पन्न होतो ।। २८७ ॥
ज्याला राज्य प्राप्त झाले आहे व ज्याला नवीन उदय प्राप्त झाला आहे अशा कुमाराला पुढे करून राजे प्रभुपुढे उभे राहतात ॥ २८८ ।।
भगवंताच्या जवळ राहणे अर्थात् भगवंताचा संबंध आता ज्यांचा सुटला आहे व त्यामुळे जणू ज्यांची कान्ति मंद झाली आहे असा निधीचा व रत्नांचा समूह प्रभूच्या पाठीमागून जात होता ॥ २८९॥
वाऱ्याने हालत असलेल्या ध्वजांना हातात घेऊन ज्यांनी आकाश व्याप्त केले आहे, असे सज्ज सैन्य प्रभूच्या पाठीमागून हळूहळू जात होते ॥ २९० ।।
त्यावेळी देवांची वाद्ये वाजत होती, अप्सरांचा समूह नाचत होता, किन्नरी देवी आपल्या मधुर स्वराने मंगलगाणे गात होत्या ।। २९१ ।।
त्यावेळी दीक्षा घेण्यासाठी निघालेले भगवान पवित्र अशा एका आश्रमात शिलातलावर उभे राहिले. ते शिलातल प्रभूच्या हृदयाप्रमाणे अतिशय विस्तृत होते ।। २९२ ।।
ज्यांचा उदय आश्चर्य उत्पन्न करणारा आहे व देवांच्या स्वामींनी इंद्रानी आनंदाने उत्कृष्ट पूजेने ज्यांना पूजिले आहे असे भगवंत त्यावेळी मोक्षप्राप्ति करून देणाऱ्या दीक्षेने युक्त झाले ॥ २९३ ॥
या दीक्षेत केशलोच करणे, त्या केशांची पूजा करणे, आदिकांचे वर्णन येथे केले नाही, ते सर्व आदिभगवंताच्या दीक्षेच्या प्रकरणात आचार्यानी त्याचा निर्णय केला आहे. याप्रमाणे निष्क्रान्ति क्रिया वणिली आहे ।। २९४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org