________________
३९-११९)
महापुराण
(४१७
दीक्षा जैनी प्रपन्नस्य जातः कोऽतिशयस्तव । यतोद्यापि मनुष्यस्त्वं पादचारी महीं स्पृशन् ॥११२ इत्युपारूढ़संरम्भमुपालब्धः स केनचित् । ददात्युत्तरमित्यस्मै वचोभियुक्तिपेशलैः ॥ ११३ श्रूयतां भो द्विजम्मन्य त्वयास्मद्दिव्यसम्भवः । जिनो जनयितास्माकं ज्ञानं गर्भोऽतिनिर्मलः ॥११४ तत्रार्हन्तीं त्रिषाभिन्नां शक्ति त्रैगुण्यसंश्रिताम् । स्वसात्कृत्य समुद्भूता वयं संस्कारजन्मना ॥११५ अयोनिसम्भवास्तेन देवा एव न मानुषाः । वयं वयमिवान्येऽपि सन्ति चेब्रूहि तद्विधान् ॥ ११६ स्वायम्भुवान्मुखाज्जातास्ततो देवद्विजा वयम् । व्रतचिह्नं च नः सूत्रं पवित्रं सूत्रदर्शितम् ॥ ११७ पापसूत्रानुगा यूयं न द्विजाः सूत्रकण्टकाः । सन्मार्गकण्टकास्तीक्ष्णाः केवलं मलदूषिताः ॥ ११८ शरीरजन्म संस्कारजन्म चेति द्विधा मतम् । जन्माङ्गिनां मृतिश्चैवं द्विधाम्नाता जिनागमे ॥११९
तू जैनदीक्षा घेतली आहेस पण तुझ्या ठिकाणी कोणती विशिष्टता उत्पन्न झाली आहे ? तू अद्यापि मनुष्यच आहेस व पृथ्वीला स्पर्श करून आमच्याप्रमाणे पायानीच चालत आहेस ।। ११२ ॥
___याप्रमाणे क्रोधाने कोणाकडून तरी जर तो निन्दिला गेला तर तो त्याला युक्तीनी सुन्दर अशा वचनानी याप्रमाणे उत्तर देतो- आपणास ब्राह्मण समजणाऱ्या हे पुरुषा, आमचा दिव्यजन्म कसा झाला आहे तो ऐक. जिनेश्वर हे आमचे जनक आहेत व अत्यन्त निर्मल गर्भ म्हणजे त्यानी दिलेले उत्कृष्ट ज्ञान हा गर्भ आहे ।। ११३-११४ ॥
त्या गर्भात उपलब्धि, उपयोग आणि संस्कार याप्रमाणे तीन प्रकारानी भिन्न झालेली व तीन गुणानी आश्रय केलेली म्हणजे अरिहन्त सम्बंधी सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र या तीन गुणांचा आश्रय करून आम्ही संस्काररूपी जन्माने उत्पन्न झालेले आहोत ॥ ११५ ॥
आम्ही योनीपासून उत्पन्न न झाल्यामुळे देवच आहोत आम्ही मनुष्य नाही व आमच्यासारखे जे इतरही आहेत तर त्यानाही तू अयोनिसंभवच म्हण ॥ ११६ ॥
स्वयंभू जिनेश्वराच्या मुखापासून आमचा जन्म झाला आहे म्हणून आम्ही देवब्राह्मण आहोत व आमचे सूत्र- यज्ञोपवीत हे आगमानें वर्णिलेले पवित्र सूत्र असे आहे ॥ ११७ ॥
पण आपण पापसूत्राला- हिंसा धर्म आहे असे निरूपण करणाऱ्या वेदाचे अनुयायी आहात व गळ्यात सूत अडकविणारे आहात व फक्त पापरूपी मलाने चिखलाने दूषित झालेले भरलेले आहात आणि सन्मार्गातील तीक्ष्ण काटे आहात आपण द्विज- ब्राह्मण नाहीत ॥ ११८॥
जिनागमात जन्म दोन प्रकारचा सांगितला आहे. एक शरीरजन्म व एक संस्कार जन्म. तसेच मरणही जिनागमात दोन प्रकारचे सांगितले आहे ॥ ११९ ॥
म. ५३
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org