Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
( ३९-१२०
देहान्तरपरिप्राप्तिः पूर्वदेहपरिक्षयात् । शरीरजन्म विज्ञेयं देहभाजां भवान्तरे ॥ १२० तथा लब्धात्मलाभस्य पुनः संस्कारयोगतः । द्विजन्मतापरिप्राप्तिर्जन्म संस्कारजं मतम् ।। १२१ शरीरमरणं स्वायुरन्ते देहविसर्जनम् । संस्कारमरणं प्राप्तव्रतस्यागः समुज्झनम् ।। १२२
तोऽयं लब्धसंस्कारो विजहाति प्रगेतनम् । मिथ्यादर्शनपर्यायं ततस्तेन मृतो भवेत् ॥ १२३ तत्र संस्कारजन्मेदमपापोपहतं परम् । जातं नो गुर्वनुज्ञानादतो देवद्विजा वयम् ॥ १२४ इत्यात्मनो गुणोत्कर्ष ख्यापयन्त्यायवर्त्मना । गृहमेधीभवेत्प्राप्य सद्गृहित्वमनुत्तरम् ॥ १२५ भूयोऽपि सम्प्रवक्ष्यामि ब्राह्मणान्सत्क्रियोचितान् । जातिवादावलेपस्य निरासार्थमतः परम् ॥ १२६ ब्रह्मणोऽपत्यमित्येवं ब्राह्मणाः समुदाहृताः । ब्रह्मा स्वयम्भूर्भगवान्परमेष्ठी जिनोत्तमः ॥ १२७ सह्यादिपरमब्रह्मा जिनेन्द्रो गुणबृंहणात् । परंब्रह्म यदायत्त मामनन्ति मुनीश्वराः ।। १२८
४१८)
महापुराण
प्राण्याला पूर्वीच्या देहाचा नाश झाल्यामुळे दुसन्या देहाची प्राप्ति अन्यभवात होते तो शरीरजन्म जाणावा असा शरीरजन्म झाल्यावर त्यावर संस्काराच्या योगाने पुनः आत्म लाभ ज्याला प्राप्त झाला आहे अशा पुरुषाला जी द्विजपणाची प्राप्ति होते तो संस्कारजन्म समजावा ।। १२०-१२१ ।।
आपले आयुष्य संपल्यावर देहत्याग होणे यास शरीरमरण म्हणतात व व्रती पुरुष पापाचा त्याग करतो म्हणून त्या पापत्यागाला संस्कारमरण म्हणतात. याप्रमाणे मरण दोन 'प्रकारचे आहे ।। १२२ ॥
ज्याने संस्काराची प्राप्ति करून घेतली आहे असा पुरुष आपल्या पूर्वीच्या मिथ्यादर्शन पर्यायाचा त्याग करतो त्याअर्थी त्या त्यागाने तो मृत झाला असे मानले जाते ॥ १२३ ॥
पापाने जो दूषित झाला नाही तो संस्कारजन्म होय. असा संस्कारजन्म गुरूंच्या आज्ञेचे पालन केल्यामुळे आम्हाला प्राप्त झाला आहे म्हणून आम्ही देवद्विज आहोत ॥ १२४ ॥ याप्रमाणे न्यायपद्धतीने आपल्या गुणांचा उत्कर्ष प्रसिद्ध करणारा तो जैनद्विज उत्कृष्ट सद्गृहीपणाला मिळवून उत्तम गृहमेधीउत्कृष्ट गृहस्थ होतो ।। १२५ ॥
उत्तम संस्काराला योग्य अशा ब्राह्मणाचे मी पुनः वर्णन करतो. कारण जातिवादाच्या गर्वाचा परिहार व्हावा हा हेतु माझ्या मनात आहे ।। १२६ ।।
ब्राह्मण - जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत त्यांना ब्राह्मण म्हणतात अशी ब्राह्मण शब्दाची 'निरुक्ति आहे. येथे ब्रह्मा म्हणजे आदिभगवान् ते स्वयम्भू परमेष्ठी व जिनोत्तम आहेत. तात्पर्य हे की, जे जिनेन्द्र भगवंताचा उपदेश ऐकून त्यांच्या शिष्यपरम्परेत राहून सदाचाराने वागत आले आहेत त्याना ब्राह्मण म्हणावे ।। १२७ ।।
तो आदिजिनेश्वर अत्युत्तम ब्रह्मा आहे. त्याच्या ठिकाणी गुणाची वाढ झालेली होती म्हणून तो सर्वोत्कृष्ट ब्रह्मा होय. परब्रह्म त्याच्याच स्वाधीन आहे असे मुनीश्वर म्हणतात ।। १२८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org