Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४१६)
महापुराण
(३९-१०४
स्पृशन्नपि महीं नैव स्पृष्टो दोषैर्महीगतः । देवत्वमात्मसात्कुर्यादिहैवाचितैर्गुणैः ॥ १०४ नाणिमा महिमवास्य गरिमैव न लाघवम् । प्राप्तिः प्राकाम्यमोशित्वं वशित्वं चेति तद्गुणाः ॥१०५ गुणरेभिरुपारूढमहिमा देवसाद्भवन् । बिभ्रल्लोकातिगं धाम महामेष महीयते ॥ १०६ धयराचरितैः सत्यशौचक्षान्तिदमादिभिः । देवब्राह्मणतां श्लाघ्यां स्वस्मिन्सम्भावयत्यसो ॥ १०७ अथ जातिमदावेशाकश्चिदेनं द्विजब्रुवः । ब्रूयादेवं किमद्यैव देवभूयंगतो भवान् ॥ १०८ त्वमामुष्यायणः किन्तु किं तेऽम्बामुष्य पुत्रिका । येनैवमुन्नसो भूत्वा यास्यसत्कृत्य मद्विधान् ॥१०९ जातिः सैव कुलं तच्च सोऽसि योऽसि प्रगेतनः । तथापि देवतात्मानमात्मानं मन्यते भवान् ॥११० देवतातिथिपित्रग्निकार्येष्वप्राकृतो भवान् । गुरुद्विजातिदेवानां प्रणामाच्च पराङमुखः ॥ १११
तो या भूतलाला जरी स्पर्श करीत आहे तथापि पृथ्वीवरच्या दोषानी स्पशिला जात नाही. त्यामुळे इहलोकीच आदरणीय अशा गुणानी देवपणाला प्राप्त करून घेतो ॥ १०४ ।।
याच्या ठिकाणी अणिमा-तुच्छपणा नसतो पण महिमा ऋद्धि-श्रेष्ठपणा असतो व याच्या ठिकाणी गरिमा-गुरुत्व मोठेपणा वजनदारपणा जरी नसतो तथापि श्रेष्ठपणा आदरणीयता असते. याच्या ठिकाणी प्राप्ति, प्राकाम्य, ईशत्व व वशित्व आदिक देवपणाचे गुण विद्यमान आहेत. वरील गुणानी याची महिमा वाढत असल्यामुळे हा जणु देवरूप होत आहे व लोकाला उल्लंघन करणारे उत्कृष्ट तेज धारण करीत असून हा लोकपूजित होत आहे ।। १०५ ।।।
___ या गुणानी याचा महिमा वाढल्यामुळे तो देवाप्रमाणे होऊन लोकाना उल्लंघणारे तेज धारण करून पृथ्वीवर तो पूज्य होत आहे ॥ १०६ ।।
सत्य, शौच-निर्लोभता, क्षमा, जितेन्द्रियपणा आदिक गुणानी तो आपल्या ठिकाणी देवब्राह्मणपणाची संभावना करीत आहे. अर्थात् उत्तम आचरणाने स्वतःला देवब्राह्मणाप्रमाणे उत्तम बनवितो ॥ १०७ ॥
मी ब्राह्मण आहे अशा जातिमदाच्या आवेशाने स्वतःलाच ब्राह्मण समजणारा कोणी मनुष्य त्याला असे म्हणतो 'काय आजच तूं देवपणाला प्राप्त झाला आहेस ?' ॥ १०८ ॥
'तू अमुक प्रसिद्ध पुरुषाचा पुत्र आहेस अर्थात् तुझा पिता प्रसिद्ध आहे व तुझी माता अमुक प्रसिद्ध पुरुषाची मुलगी आहे हे आम्हाला माहीत आहे पण तू आपले नाक वर करून आमच्या सारख्यांचा आदर न करता आमच्या पुढून तू निघून जातोस ? ॥ १०९ ॥
'तुझी जातही जी पूर्वी होती तीच आताही आहे व तुझे कुलही पूर्वीचेच आहे तरीही तू आपणास देवपणाला प्राप्त मी झालो आहे असे समजतोस' ॥ ११० ॥
तू देवता, अतिथि व पितर यांच्याविषयी करावयाची होमादि कृत्ये तूं जाणत आहेस तरीही गुरु, द्विज व देव यांना नमस्कार करण्यापासून तू पराङमुख झाला आहेस ॥ १११ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org
Jain Education International