Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३९-१०३)
महापुराण
व्रतचिह्नं भवेदस्य सूत्रं मन्त्रपुरःसरम् । सर्वज्ञाज्ञाप्रधानस्य द्रव्यभावविकल्पितम् ॥ ९४ यज्ञोपवीतमस्य स्यात्द्रव्यनस्त्रिगुणात्मकम् । सूत्रमौपासिकं तु स्याद्भावरूपैस्त्रिभिर्गुणैः ॥ ९५ यदैव लब्धसंस्कारः परंब्रह्माधिगच्छति । तदैनमभिनन्द्याशीर्वचोभिर्गणनायकाः ॥ ९६ लम्भयन्त्युचितां शेषां जैनी पुण्यरथाक्षतैः । स्थितीकरणमेतद्धि धर्मप्रोत्साहनं परम् ॥ ९७ अयोनिसम्भवं दिव्यं ज्ञानगर्भसमुद्भवम् । सोऽधिगम्य परं जन्म तदासज्जातिभाग्भवेत् ॥ ९८ ततोऽधिगतसज्जातिः सद्गृहित्वमसौ भजेत् । गृहमेधी भवन्नार्यषट्कर्माण्यनुपालयन् ॥ ९९ यदुक्तं गृहचर्यायामनुष्ठानं विशुद्धिमत् । तदाप्तविहितं कृत्स्नमतन्द्रालुः समाचरन् ॥ १०० जिनेन्द्राल्लब्धसज्जन्मा गणेन्द्ररनुशिक्षितः । स धत्ते परमं ब्रह्मवर्चसं द्विजसत्तमः ॥ १०१ तमेनं धर्मसाभतं श्लाघन्ते धामिका जनाः। परं तेज इव ब्राह्ममवतीर्ण महीतलम् ॥ १०२ स यजन्थाजयन्धीमान्यजमानरुपासितः। अध्यापयन्नधीयानो वेदवेदाङ्गविस्तरम् ॥ १०३
जो सर्वज्ञ जिनेश्वराची आज्ञा मुख्य प्रमाण आहे असे मानतो अशा त्या भव्याचे व्रताचे चिह्न सूत्र हे आहे व ते त्याने मन्त्रपुरःसर धारण केलेले असते. त्याचे द्रव्य व भाव असे दोन भेद आहेत. अर्थात् द्रव्यसूत्र आणि भावसूत्र असे ते दोन प्रकारचे आहे. द्रव्यसूत्र असे जे यज्ञोपवीत आहे ते तीन पदरांचे असते व भावरूप जे औपासिक सूत्र ते सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र या तीन गुणानी हृदयात उत्पन्न झालेल्या सम्यग्दर्शनादिक तीन गुणानी उत्पन्न झालेले असते त्याला भावयज्ञोपवीत म्हणतात. ज्यावेळी हा भव्य या संस्काराला प्राप्त करून उत्तम ब्रह्मस्वरूपाला-रत्नत्रयाला मिळवितो तेव्हा आचार्य व गृहस्थाचार्य त्याला शेषा देतात अर्थात् आशीर्वादानी त्याची प्रशंसा करून जिनपूजा करून उरलेल्या पुष्पांचा व अक्षतांचा प्रसाद देतात. असे करणे हे त्याला जिनधर्मात स्थिर करणे होय व त्याला धर्म पाळण्यात उत्तम प्रोत्साहन देणे होय. त्यावेळी दिव्यज्ञानरूपी गर्भापासून व योनीवाचून उत्तम जन्म त्या श्रावकाला प्राप्त होतो असा जन्म प्राप्त करून तो उत्तमजातीला धारण करतो ॥ ९४-९८॥
यानंतर ज्याला सज्जातिप्राप्ति झाली आहे असा श्रावक सद्गृहस्थ होतो व सद्गृहस्थाची जी श्रेष्ठ षट्कर्म आहेत त्यांचे हा पालन करतो ।। ९९ ॥
जे गृहचर्याक्रियेत आप्त- जिनेश्वरानी सांगितलेले निर्दोष आचरण आहे ते सर्व निरलस असा हा गृहस्थ आचरणात आणतो ॥ १०० ॥
जिनेश्वरापासून ज्याला उत्तम जन्म प्राप्त झाला आहे व गणधरापासून-जैनाचार्यापासून ज्याला जैनधर्माचे शिक्षण प्राप्त झाले आहे असा तो श्रेष्ठ द्विज उत्कृष्ट ब्रह्मतेजाला आत्मतेजाला धारण करतो ॥ १०१ ।।
धर्मस्वरूपाला जणु प्राप्त झालेल्याची धार्मिक लोक "हे ब्रह्मतेज जणु या भूतलावर अवतीर्ण झाले आहे" अशी त्यांची प्रशंसा करतात ॥ १०२ ॥
पूजा करणारे अशा यजमानाकडून जो उपासिला जात आहे असा तो श्रेष्ठ द्विज स्वतः पूजा करतो व इतराना पूजा करावयास लावतो व वेद आणि वेदांगाच्या विस्ताराचे स्वतः अध्ययन करून इतरानाही त्याचे शिक्षण देतो ।। १०३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org