Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३९-८४)
महापुराण
(४१३
त्यक्तागारस्य तस्यातस्तपोवनमुपेयुषः । एकशाटकषारित्वं प्राग्वद्दीक्षाद्यमिष्यते ॥ ७७
इति दीक्षाद्यक्रिया ॥ १८ ततोऽस्य जिनरूपत्वमिष्यते त्यक्तवाससः । धारणं जातरूपस्य युक्ताचाराद्गणेशिनः ॥ ७८ ।
___ इति जिनरूपता ॥ १९ क्रियाशेषास्तु निःशेषाः प्रोक्ता गर्भान्वये यथा । तथैव प्रतिपाद्याः स्युन भेदोऽस्त्यत्र कश्चन ॥७९ यस्त्वेतास्तत्त्वतो ज्ञात्वा भव्यः समनुतिष्ठति । सोऽधिगच्छति निर्वाणमचिरात्सुखसाद्भवन् ॥ ८०
इति दीक्षान्वयक्रिया ॥ २० अथातः सम्प्रवक्ष्यामि द्विजाः कन्वयक्रियाः । याः प्रत्यासन्ननिष्ठस्य भवेयुभव्यदेहिनः ॥ ८१ तत्र सज्जातिरित्याद्या क्रिया श्रेयोऽनुबन्धिनी । या सा चासन्नभव्यस्य नजन्मोपगमे भवेत् ॥ ८२ स नजन्मपरिप्राप्तौ दीक्षायोग्ये सदन्वये। विशुद्धं लभते जन्म सैषा सज्जातिरिष्यते ॥ ८३ विशुद्धकुलजात्यादिसम्पत्सज्जातिरुच्यते । उदितोदिजवंशत्वं यतोऽभ्येति पुमान्कृती ॥ ८४
घराचा त्याग करून तपोवनाकडे हा गृहस्थाचार्य जातो व पूर्वी गर्भान्वयक्रियेत सांगितल्याप्रमाणे एक वस्त्र धारण करतो. या संस्काराला दीक्षाद्यक्रिया म्हणतात. ही अठरावी क्रिया आहे ॥ ७७ ॥
यानन्तर त्या एक वस्त्राचाही त्याग करून हा गृहस्थाचार्य जिनरूपत्व धारण करतो अर्थात् ज्यांचा आचार यत्याचार शास्त्रानुसार आहे अशा गणाधिपमुनिराजापासून हा जातरूप धारण करतो अर्थात् जन्म झाला त्यावेळचे रूप-दिगंबरस्वरूप धारण करतो. ही जिनरूपता क्रिया १९ वी आहे ।। ७८ ॥
येथपर्यन्त आम्ही दीक्षान्वयक्रियांचे वर्णन केले आहे पण आणखी जे दीक्षान्वय वर्णन करणे राहिले आहे त्यांचे वर्णन करणे गर्भान्वयक्रियांचे जसे केले तसेच जाणावे. त्यात क्रियाचा काहीही फरक नाही. जो भव्य परमार्थरीतीने त्यांचे स्वरूप जाणून त्याचे आचरण करतो तो लौकरच सुखमय होऊन निर्वाणपदाला मिळवितो ॥ ७९-८० ॥
यानंतर हे द्विजानो, मी कर्जन्वयक्रियांचे वर्णन करतो. या क्रिया ज्याचा संसार थोडासा उरला आहे अर्थात् मोक्षाची प्राप्ति ज्याला लौकरच होईल त्याला होतात ।। ८१ ॥
या कन्वयक्रियामध्ये पहिली क्रिया सज्जाति नांवाची आहे व ती आसन्नभव्याला मनुष्यजन्म प्राप्त झाला असता प्राप्त होते व ती कल्याण करणारी आहे ॥ ८२ ॥
मनुष्य जन्म प्राप्त झाला असता दीक्षाग्रहण करण्यास योग्य अशा उत्तम वंशामध्ये विशुद्ध जन्म मिळवितो त्याला सज्जाति असे म्हणतात. ती त्याची सज्जातिक्रिया होय. निर्दोष असे कुल व जाति वगैरे संपदा प्राप्त होणे तिला सज्जाति म्हणतात. या सज्जातीपासूनच पुण्यवान् मनुष्याला उत्तरोत्तर उत्तमवंशाची प्राप्ति होते ।। ८३-८४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org