Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३९-६८)
महापुराण
(४११
प्रतावतरणं तस्य भूयो भूषादिसङग्रहः । भवेदधीतविद्यस्य यथावद्गुरुसंनिधौ ॥ ५८ विवाहस्तु भवेदस्य नियुञ्जानस्य दीक्षया । सुव्रतोचितया सम्यक् स्वां धर्मसहचारिणीम् ॥ ५९ पुनविवाहसंस्कारः पूर्वः सर्वोऽस्य सम्मतः । सिद्धार्चनां पुरस्कृत्य पत्याः संस्कारमिच्छतः ॥ ६०
इति विवाहक्रिया ॥ वर्णलाभस्ततोऽस्य स्यात्सम्बन्धं संविधित्सतः । समानाजीविभिलब्धवर्णैरन्यैरुपासकैः ॥ ६१ चतुरः श्रावकज्येष्ठानाहूय कृतसत्क्रियान् । तान्ब्रूयादस्म्यनुग्राह्यो भवद्भिः स्वसमीकृतः ॥ ६२ यूयं निस्तारका देवब्राह्मणा लोकपूजिताः । अहं च कृतदीक्षोऽस्मि गृहीतोपासकव्रतः ॥ ६३ मया तु चरितो धर्मः पुष्कलो गृहमेषिनाम् । दत्तान्यपि च दानानि कृतं च गुरुपूजनम् ॥ ६४ अयोनिसम्भवं जन्म लब्ध्वाहं गुर्वनुग्रहात् । चिरभावितमुत्सृज्य प्राप्तो वृत्तमभावितम् ॥ ६५ व्रतसिद्धयर्थमेवाहमुपनीतोऽस्मि साम्प्रतम् । कृतविद्यश्च जातोऽस्मि स्वधीतोपासकवतः ॥ ६६ व्रतावतरणस्यान्ते स्वीकृताभरणोऽस्म्यहम् । पत्नी च संस्कृतात्मीया कृतपाणिग्रहा पुनः ॥ ६७ एवं कृतवतस्याद्यवर्णलाभो ममोचितः । सुलभः सोऽपि युष्माकमनुज्ञानात्सधर्मणाम् ॥ ६८
ज्याने गुरूजवळ अध्ययन केले आहे अशा त्याने व्रतावतरण करावे अर्थात पूर्वीप्रमाणे भूषणादिक धारण करावेत. ही अकरावी व्रतावतरण क्रिया आहे ।। ५८ ॥
. जेव्हा तो भव्य आपल्या पत्नीला उत्तम व्रतानी योग्य अशा श्रावकाच्या दीक्षेने युक्त करतो तेव्हा त्याची विवाह नांवाची क्रिया होते. आपल्या पत्नीलाही संस्कारसहित करावे असे
गान्या त्या भव्याचा पुनः तिच्याशी विवाह संस्कार होतो व या संस्कारात सिद्धपूजनपूर्वक पुनः सर्व विवाहविधि केला पाहिजे ही बारावी विवाहक्रिया आहे ।। ५९-६० ।।
ज्यांची आजीविकासमान आहे व ज्यांना वर्णलाभ झाला आहे असे जे अन्य श्रावक गृहस्थ आहेत त्याच्याशी आपला सबध व्हावा असे इच्छिणाऱ्या त्या विवाह झालेल्या श्रावकाचा वर्णलाभ नांवाचा संस्कार होतो ।। ६१ ।।
श्रावकामध्ये जे श्रेष्ठ आहेत अशा चार श्रावकांचा सत्कार करून त्यांना बोलावून त्याने असे म्हणावे, 'आपण मला आपल्यासारखे करून घेतले आहे. तेव्हा आता माझ्यावर आपण अनुग्रह करा. आपण संसारातून पार करणारे व लोकाकडून पूजिले जाणारे सन्मान्य गृहस्थ आहात व मी आपणाकडून दीक्षा दिला गेलेला आहे व मी श्रावकाची व्रते धारण केली आहेत. मी गृहस्थाच्या धर्माचे पुष्कळ आचरण केले आहे. मी दाने दिली व गुरूंचे पूजन केले आहे. मला गुरूंचा अनुग्रह झाला आणि त्यामुळे मी योनीवाचून उत्पन्न झालेला-जन्म धारण केला आहे. मी पुष्कळ काळापासून पाळलेला मिथ्याधर्म त्यागला व आता पूर्वी कधी न स्वीकारलेली अशी व्रते-जैनवते धारण करून त्यांचे पालन करीत आहे. त्या व्रतांची प्राप्ति व्हावी म्हणून मी उपनयनक्रियायुक्त केला गेलो आहे. श्रावकाचाराचे मी चांगले अध्ययन केले आहे व आपणाला विद्वान केले आहे. त्या उपनयन क्रियेची व्रते त्यागून अर्थात् व्रतावतरण करून अन्ती वस्त्राभरणे धारण केली आहेत आणि माझ्या पत्नीशी माझा पुनर्विवाह करून तिलाही या विवाहाने संस्कृत केले आहे याप्रमाणे व्रते धारण केलेल्या माझा वर्णलाभसंस्कार आपण करावा. सधार्मिक अशा आपणाकडून तो वर्णलाभ मला सुलभ होईल" असे त्याने ज्येष्ठ श्रावकाना म्हणावे ।। ६२-६८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org