Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४१०)
महापुराण
(३९-५१
तथास्य दृढचर्या स्याक्रिया स्वसमयश्रुतम् । निष्ठाप्य शृण्वतो ग्रन्थान्वाह्यनन्यांश्च काश्चन ॥५१
___ इति दृढचर्या ॥ दृढव्रतस्य तस्यान्या क्रिया स्यादुपयोगिता । पर्वोपदासपर्यन्ते प्रतिमायोगधारणम् ।। ५२
इति उपयोगिताक्रिया ॥८ क्रियाकलापेनोक्तेन शुद्धिमस्योपबिभ्रतः । उपनोतिरनूचानयोग्यलिङ्गग्रहो भवेत् ॥५३ उपनीतिहि वेषस्य वृत्तस्य समयस्य च । देवतागुरुसाक्षि स्याद्विधिवत्प्रतिपालनम् ॥ ५४ शुक्लवस्त्रोपवीतादिधारणं वेष उच्यते । आर्यषट्कर्मजीवित्वं वृत्तमस्य प्रचक्ष्यते ॥ ५५ जैनोपासकदीक्षा स्यात्समयः समयोचितम् । दधतो गोत्रजात्यादिनामान्तरमतः परम् ॥ ५६
इत्युपनीतिक्रिया ॥ ततोऽयमुपनीतः सन्वतचर्या समाश्रयेत् । सूत्रमौपासकं सम्यगभ्वस्य ग्रन्थतोऽर्थतः ॥ ५७
इति वतचर्याक्रिया ॥
___ यानंतर दृढचर्या नावाचा सातवा संस्कार त्याच्यावर करतात. यात जैनधर्माच्या श्रुतज्ञानाच्या अर्थाचे श्रवण समाप्त करून बाह्य अनेक अन्यमताच्या ग्रंथाचे श्रवण तो करतो. हा सातवा संस्कार होय ।। ५१ ॥
जो व्रतांचे दृढ पालन करीत आहे अशा या श्रावकावर उपयोगिता नामक संस्कार करतात. अर्थात् तो अष्टमी चतुर्दशीच्या दिवशी उपवास करतो व रात्री प्रतिमायोग धारण करतो. अर्थात् रात्री आत्मध्यानात तत्पर तो राहतो. त्याची ही उपयोगिता नामक आठवी क्रिया आहे ॥ ५२ ।।
वर सांगितलेल्या क्रियासमूहाच्या आचरणाने व्रतादिकात शुद्धि धारण करणाऱ्या व आचारादिक अंगासहित असलेल्या प्रवचनाचा-आगमाचा अभ्यास-अध्ययन ज्याचे झाले आहे अशा या भव्याची उपनीतिक्रिया होते ।। ५३ ।।
देवता आणि गुरूंच्या साक्षीने विधीला अनुसरून आपला वेष, आपले व्रताचरण आणि जिनमताचे पालन करणे याला उपनीति किंवा उपनयसंस्कार म्हणतात ॥ ५४।।
पांढरे वस्त्र, यज्ञोपवीत वगैरे धारण करणे याला वेष म्हणतात आणि आर्यांची जी असि, मष्यादिक सहा कर्मे यांनी उपजीविका करणे याला वृत्त म्हणतात ॥ ५५ ॥
जैन श्रावकाची जी दीक्षा घेणे त्यास समय म्हणतात व त्या दीक्षेला योग्य असे गोत्र, जाति व नाव वगैरे धारण करणाऱ्या या श्रावकाची ही उपनीतिक्रिया समजावी. ही नववी उपनीतिक्रिया आहे ।। ५६ ॥
ज्याच्यावर उपनयनक्रियेचा संस्कार झाला आहे अशा या श्रावकाने उपासकसूत्राचे ग्रन्थ व अर्थाचे चांगले अध्ययन करावे अर्थात् श्रावकाचाराचा चांगला मननपूर्वक अभ्यास करावा आणि व्रतचर्यानामक क्रियेचा आश्रय करावा. ही व्रतचर्या क्रिया दहावी आहे ॥ ५७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org