Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३९-५०)
महापुराण
(४०९
ततः पञ्चनमस्कारपदान्यस्मा उपादिशेत् । मन्त्रोऽयमखिलात्पापात्त्वां पुनीतादितीरयन् ॥ ४३ कृत्वा विधिमिमं पश्चात्पारणाय विसर्जयेत् । गुरोरनुग्रहात्सोऽपि सम्प्रीतः स्वगृहं व्रजेत् ॥ ४४
इति स्थानलामक्रिया ॥ ३ निर्दिष्टस्थानलाभस्य पुनरस्य गणग्रहः । स्यान्मिथ्यादेवताः स्वस्माद्विनिःसारयतो गृहात् ॥ ४५ इयन्तं कालमज्ञानात्पूजिताः स्थ कृतादरम् । पूज्यास्त्विदानीमस्माभिरस्मत्समयदेवताः ॥ ४६ ततोऽपमषितेनालमन्यत्र स्वैरमास्यताम् । इति प्रकाशमेवैतान्नीत्त्वान्यत्र क्वचित्त्यजेत् ॥ ४७ गणग्रहः स एषः स्यात्प्राक्तनं देवतागणम् । विसृज्यार्चयतः शान्ता देवताः समयोचिताः ॥ ४८
इति गणग्रहणक्रिया ॥४ पूजाराध्याख्यया ख्याता क्रियास्य स्यादतःपरा । पूजोपवाससम्पत्त्या शृण्वतोऽङ्गार्थसङग्रहम् ॥४९
इति पूजाराध्यक्रिया ॥५ ततोऽन्यपुण्ययज्ञाख्या क्रिया पुण्यानुबन्धिनी । शृण्वतः पूर्वविद्यानामर्थ सब्रह्मचारिणः ॥ ५० ।
इति पुण्ययज्ञक्रिया ॥६
यानंतर त्याला पंचनमस्कारमंत्राच्या पदांचा उपदेश करावा व हा मन्त्र तुला सर्व पापांचा नाश करून पवित्र करो असे बोलावे. याप्रमाणे विधि केल्यावर नंतर त्याला पारणे करण्याकरिना घरी पाठवावे. गुरूंचा याप्रमाणे अनुग्रह झाल्यामुळे त्याने देखिल अतिशय आनंदित होऊन आपल्या घरी जावे. याप्रमाणे तिसऱ्या स्थानलाभक्रियेचे वर्णन झाले. गणग्रह क्रियेचे वर्णन असे- ॥ ४३-४४ ।।
ज्याच्यावर स्थानलाभक्रियासंस्कार केला आहे असा हा भव्य गणग्रहसंस्काराने संस्कृत होतो. त्यावेळी तो आपल्या घरातून मिथ्यादेवता बाहेर काढतो. तो त्यावेळी असे म्हणतो, "इतके कालपर्यन्त मी अज्ञानामुळे आपली पूजा केली आहे, आपला आदर केला आहे पण आता आम्ही आमच्या मताच्या देवतांचे पूजन करू म्हणून आपण आमच्यावर न रागवता अन्य ठिकाणी स्वच्छंदाने बसावे" याप्रमाणे म्हणून प्रकटपणाने त्या देवतांचा अन्य कोणत्या तरी ठिकाणी त्याग करावा. याप्रमाणे हा गणग्रहसंस्कार आहे. यात पूर्वीच्या मिथ्यादेवांच्या समूहाचे विसर्जन करून आपल्या मताच्या शान्तदेवतांची तो पूजा करतो. ही गणग्रहक्रिया चौथी आहे ॥ ४५-४८॥
यानन्तर पूजाराध्य या नांवाची क्रिया गणग्रह या क्रियेनंतर केली जाते. या क्रियेच्या संस्काराने त्याला आचारादिक बारा श्रुतज्ञानाच्या अर्थाच्या संग्रहाचे श्रवण होते. ते श्रवण त्याने पूजा व उपवास करून करावे. अर्थात् जिनपूजा करून उपवास करावा व त्याने आचारांग स्थानांग, समवायाङ्ग वगैरे जे श्रुतज्ञानाचे भेद आहेत त्यांची माहिती गृहस्थाचार्यापासून ऐकावी अशा रीतीने जैनधर्माचे ज्ञान होते ॥ ४९ ॥
यानंतर पुण्ययज्ञ नांवाचा संस्कार पुण्यबंधाला कारण आहे तो करावा. सार्मिकाबरोबर उत्पादपूर्व, आग्रापणीयपूर्व इत्यादि चौदा पूर्वश्रुतज्ञानाचा अर्थ त्याने ऐकावा हा सहावा संस्कार आहे ॥ ५० ॥
म. ५२
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org