________________
३९-३३)
महापुराण
(४०७
मन्त्रास्त एव धाः स्युर्ये क्रियासु नियोजिताः । दुर्मन्त्रास्तेऽत्र विज्ञेया ये युक्ताः प्राणिमारणे ॥२६ विश्वेश्वरादयो ज्ञेया देवताः शान्ति हेतवः । क्रूरास्तु देवता हेया यासां स्यावृत्तिरामिषः ॥ २७ निर्वाणसाधनं यत्स्यात्तल्लिङ्ग जिनदेशितम् । एषाजिनादिचिह्न तु कुलिङ्ग तद्धि वैकृतम् ॥ २८ स्यानिरामिषभोजित्वं शुद्धिराहारगोचरा । सर्वकषास्तु ते ज्ञेया ये स्युरामिषभोजिनः ॥ २९ अहिंसा शुद्धिरेषां स्याद्ये निःसङ्गा दयालवः । रताः पशुवधे ये तु न ते शुद्धा दुराशयाः ॥ ३० कामशुद्धिर्मता तेषां विकामा ये जिनेन्द्रियाः। सन्तुष्टाश्च स्वदारेषु शेषाः सर्वे विडम्बकाः ॥ ३१ इति शुद्धं मतं यस्य विचारपरिनिष्ठितम् । स एवाप्तस्तदुन्नीतो धर्मः श्रेयो हितार्थिनाम् ॥ ३२ श्रुत्वेनि देशनां तस्माद्भव्योऽसौ देशिकोतमात् । सन्मार्गे मतिमाधत्ते दुर्मार्गरतिमुत्सृजन् ॥ ३३
गर्भाधानादि क्रियामध्ये योजलेले जे मन्त्र आहेत तेच मन्त्र धर्म्य-पुण्य प्राप्त करून देणारे आहेत पण जे प्राणिघात करण्यात योजलेले मंत्र आहेत ते दुर्मन्त्र आहेत पापोत्पादक आहेत असे समजावे ॥ २६ ॥
विश्वेश्वरादि-तीर्थकरादिक ज्या देवता आहेत त्या शान्ति उत्पन्न करण्यास कारण आहेत पण ज्यांची वृत्ति मांसानी होते त्या क्रूर देवतांचा त्याग करणे योग्य आहे ॥ २७ ॥
__जे मोक्षप्राप्ति करून देण्याचे साधन ते लिंग समजावे असे जिनेश्वरानी सांगितले आहे पण हरिणाचे कातडे आदिक जे चिह्न आहे ते कुलिंग आहे व ते कुलिंगानी बनविले आहे ते मुक्तिसाधन केव्हाही होत नाही ॥ २८ ॥
___मांसरहित भोजन करणे ही आहारविषयक शुद्धि आहे व जे मांसभोजन करतात ते लोक सर्वघाती आहेत असे समजावे ।। २९ ॥
हिंसा न करणे प्राणिघात न करणे हीच शुद्धि होय. अशी शुद्धि धारण करणारे जे निःसंग-परिग्रहरहित आहेत असे साधु दयाळु असतात. पण जे पशुवध करण्यात तत्पर आहेत ते दुष्ट अभिप्रायाचे लोक शुद्ध नाहीत ।। ३० ॥
जे कामरहित व जितेन्द्रिय आहेत त्यांच्या ठिकाणी कामशुद्धि राहते व ते स्वस्त्रीमध्ये सन्तुष्ट आहेत तेथेही कामशुद्धि राहते पण याहून जे अन्य-वेगळे आहेत ते सर्व विडंबक'फसविणारे आहेत ॥ ३१ ॥
__ अशा रीतीने ज्यांचे मत विशुद्ध निर्मल आहे व विचारात टिकाऊ आहे व ज्याचा विचार केला असता निर्दोष आहे असे सिद्ध होते त्या महात्म्याला आप्त म्हणावे व त्या आप्ताने-जिनेश्वराने सांगितलेला धर्म हितेच्छु लोकांचे श्रेय-कल्याण करणारा आहे ॥ ३२ ॥
याप्रमाणे उत्तम अशा मुनीश्वरापासून किंवा उत्तम गृहस्थाचार्यापासून उपदेश ऐकून तो भव्य दुर्मार्गावरील प्रेम त्यागून सन्मार्गात रति-प्रेमधारण करतो, जैनधर्मात तो प्रेम करतो ॥ ३३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org