Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३९-१७)
महापुराण
(४०५
धौतान्यपि हि वाक्यानि संमतानि क्रियाविधौ । न विचारसहिष्णूनि दुःप्रणीतानि तानि वै॥ १० इति पृष्टवते तस्मै व्याचष्टे स विदांवरः । तथ्यं मुक्तिपथं धर्म विचारपरिनिष्ठितम् ॥ ११ । विद्धि सत्योद्यमाप्तीयं वचः श्रेयोऽनुशासनम् । अनाप्तोपज्ञमन्यत्तु वचो वाडमलमेव तत् ॥ १२ विरागः सर्ववित्सार्वः सूक्तसूनतपूतवाक् । आप्तः सन्मार्गदेशी यस्तदाभासास्ततोऽपरे ॥ १३ रूपतेजोगुणस्थानध्यानलक्ष्मद्धिदत्तिभिः । कान्तताविजयज्ञानदृष्टिवीर्यसुखामृतैः॥ १४ । प्रकृष्टो यो गुणैरेभिश्चक्रिकल्पाधिपादिषु । स आप्तः स च सर्वज्ञः स लोकपरमेश्वरः॥ १५ ततः श्रेयोऽथिनां श्रेयो मतमाप्तप्रणेतृकम् । अव्याहतमनालीढपूर्व सर्वज्ञमानिभिः ॥ १६ हेत्वाज्ञायुक्तमद्वैतं दीप्तं गम्भीरशासनम् । अल्पाक्षरमसन्दिग्धं वाक्यं स्वायम्भवं विदुः ॥ १७
धार्मिक क्रिया करण्यासाठी जी वेदवाक्ये मानली आहेत ती देखिल विचारांना सहन करणारी नाहीत कारण ती दुष्ट पुरुषांनी रचलेली आहेत ॥ १० ॥
याप्रमाणे विचारणाऱ्या त्या भव्याला विद्वच्छेष्ठ मुनिराज खरें व विचारपरिपूर्ण मोक्षाचा मार्ग असलेल्या धर्माचे विवरण करतात ।। ११ ॥
हे भव्या, मोक्षाचा उपदेश देणारे, सर्वज्ञाचे वचन सत्य प्रतिपादन करणारे आहे असे समज. पण याहून इतरांचे जे वचन आहे ते यथार्थ विवेचन करणाऱ्याचे नाही व ते केवळ वाणीचा मल आहे असे समज ॥ १२ ॥
__ खरा हितोपदेशी आप्त त्याला म्हणावे- ज्याच्या ठिकाणी विरागता-रागद्वेषमोह हे विकार नाहीत तो खरा आप्त होय. तो सर्व जाणणारा सर्वांचे हित करणारा असतो. त्याची वाणी खरी युक्तियुक्त व पवित्र अशी असते व तो सन्मार्गाचा उपदेश करणारा असतो व याहून बाकीचे जे ते आप्ता-भास होत- त्यासारखे दिसतात. ते आप्त नव्हेत ॥ १३ ॥
जो रूप, तेज, गुणस्थान, ध्यान, लक्षण, ऋद्धि, दान, सुन्दरता, विजय, ज्ञान, दृष्टि, वीर्य व सुखामृत या गुणानी चक्रवर्ती, इन्द्र आदिकात श्रेष्ठ आहे त्याला आप्त म्हणतात व तो सर्वज्ञ आणि सर्व लोकांचा परमेश्वर आहे ॥ १४-१५ ।।
त्याला आप्त म्हणतात व त्याच्यापासून मोक्षेच्छुकाचे कल्याण होते. त्याचे जे मत ते आप्तप्रणेतक आहे- लोकांचे खरे कल्याण करणारे आहे. ते मत अव्याहत-कोणाकडून खंडित केले जात नाही व स्वतःला आम्ही सर्वज्ञ आहोत असे मानणान्या लोकाकडून ते स्पशिले जात नाही ॥ १६ ॥
हे अरहंत भगवंताचे शासनवाक्य हेतु-युक्तियुक्त व आगमयुक्त आहे, याच्यासारखे दुसरे जगात आढळून येणारे नाही असे आहे व गंभीर उपदेशाने भरलेले आहे, अतिशय तेजस्वी आहे, अल्पाक्षरयुक्त असूनही संशयरहित जीवादिक तत्त्वांचे प्रतिपादन करणारे आहे असे वाक्य अरहंत भगवंताचे आहे ।। १७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org