________________
३८-३१३)
महापुराण
शार्दूलविक्रीडितम् ।
इत्युच्चैर्भरताधिपः स्वसमये संस्थापयंस्तान्द्विजान् । सम्प्रोवाच कृती सतां बहुमता गर्भान्वयोत्थाः क्रियाः ॥ गर्भाद्याः परिनिर्वृतिप्रगमनप्रान्तास्त्रिपञ्चाशतम् । प्राभेऽथ पुनः प्रवक्तुमुचिता दीक्षान्वयाद्याः क्रियाः ॥ ३१२ यस्त्वेता द्विजसत्तमैरभिमता गर्भादिकाः सत्क्रियाः । श्रुत्वा सम्यगधीत्य भावितमतिर्जेनेश्वरे दर्शने ॥ सामग्रीमुचितां स्वतश्च परतः सम्पादयन्नाचरेद् । भव्यात्मा स समग्रधस्त्रिजगतीचूडामणित्वं भजेत् ॥ ३१३
इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्य प्रणीते त्रिषष्टिलक्षणपुराणसंग्रहे द्विजोत्पत्ति गर्भावयक्रियावर्णनं नामाष्टत्रिंशत्तमं पर्व समाप्तम् ।
याप्रमाणे भरतक्षेत्रस्वामी अशा भरताने जिनधर्मात द्विजांना उत्तम रीतीने स्थापन करून सज्जन धार्मिक लोकांना अतिशय मान्य असलेल्या गर्भान्वयक्रियांचे वर्णन केले. गर्भापासून प्रारंभ करून मोक्षापर्यंतच्या अंतिम क्रियेपर्यंत त्रेपन्न क्रियांचे वर्णन केले. यानंतर पुनः विबेचन करण्यायोग्य अशा दीक्षान्वय क्रिया त्याने सांगण्यास सुरवात केली ॥ ३१२ ॥
Jain Education International
(४०३
श्रेष्ठ अशा त्रैवर्णिकांना मान्य असलेल्या गर्भादिक क्रियांचे वर्णन ऐकून व उत्तम रीतीने त्यांचे अध्ययन करून जिनेश्वरांनी सांगितलेल्या दर्शनात ज्याची बुद्धि चांगली स्थिर झाली आहे असा जो श्रावक तोही योग्य सामग्री मिळवून दुसऱ्याना या क्रियांचे आचरण करावयास लावतो व स्वतःही यांचे आचरण करतो. तो भव्यपुरुष पूर्ण ज्ञानी होऊन - केवली सर्वज्ञ होऊन त्रैलोक्यातील अग्रभागावर मुक्तिशिलेवर चूडामणिपणाला प्राप्त होईल अर्थात् मोक्षस्थानी अग्रभागी विराजमान होईल ।। ३१३ ।।
याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यांनी रचिलेल्या आर्ष त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहाच्या मराठी भाषानुवादामध्ये द्विजांची उत्पत्ति व गर्भान्वयक्रियांचे वर्णन करणारे हे अडतीसावे पर्व समाप्त झाले || ३८ ॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org