Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
४०६)
महापुराण
(३९-१८
इतश्च तत्प्रमाणं स्यात् श्रुतमन्त्रक्रियादयः । पदार्थाः सुस्थितास्तत्र यतो नान्यमतोचिताः ॥ १८ यथाक्रममतो ब्रूमस्तान्पदार्थान्प्रपञ्चतः । यैः सन्निकृष्यमाणाः स्युर्दुःस्थिताः परसूक्तयः ॥ १९ वेदाः पुराणं स्मृतयश्चारित्रं च क्रियाविधिः । मन्त्राश्च देवता लिङ्गमाहाराद्याश्च शुद्धयः ॥ २० एतेऽर्था यत्र तत्त्वेन प्रणीताः परमषिणा । स धर्मः स च सन्मार्गस्तदाभासाःस्युरन्यथा ॥२१ श्रुतं सुविहितं वेदो द्वादशाङ्गमकल्याणम् । हिंसोपदेशि यद्वाक्यं न वेदोऽसौ कृतान्तवाक् ॥ २२ पुराणं धर्मशास्त्रं च तत्स्याद्वधनिषेधि यत् । वधोपदेशि यत्तत्तु ज्ञेयं धूर्तप्रणेतृकम् ॥ २३ सावधविरतिवृत्तं आर्यषट्कर्मलक्षणम् । चातुराश्रम्यवृत्तं तु परोक्तमसदञ्जसा ॥ २४ क्रिया गर्भादिकायास्ता निर्वाणान्ताः परोदिताः।आधानादिश्मशानातान ताः सम्यक क्रिया मता
या अरहंताच्या मतात शास्त्र, मन्त्र व क्रियादिक पदार्थ अतिशय निर्दोष पद्धतीने वणिले आहेत. असे निर्दोष विवेचन अन्यमतात आढळून येणारे नाही म्हणून हे अर्हन्मत प्रमाण आहे ॥ १८ ॥
हे भव्य आता मी जैनागमकथित पदार्थाचे क्रमाने वर्णन करतो, सविस्तर प्रतिपादन करतो व ज्याच्यापुढे इतर मतांची वचने दोषयुक्त सिद्ध होतात ।। १९ ।।
या अरहंताच्या मतात वेद, पुराण, स्मृति, चारित्र, क्रियाविधि, मंत्र, देवता, लिङ्ग व आहारादिकांची शुद्धि, हे पदार्थ यथार्थ परमऋषि जिनदेवाने सांगितले आहेत म्हणून त्याला धर्म व सन्मार्ग म्हणावे व ज्यांच्यामध्ये असे यथार्थ वर्णन नाही ते सर्व धर्माभास व मार्गाभास आहेत असे समजावे ।। २०-२१ ॥
आचाराङ्ग, सूत्रकृताङ्ग वगैरे द्वादशांगांचे श्रुतज्ञान त्यास वेद म्हणतात. ते श्रुतज्ञान सुविहित सदाचाराचे प्रतिपादन करते व ते अकल्मष आहे, दुराचरणाच्या उपदेशाने रहित आहे. पण हिंसेचा उपदेश करणारे जे शास्त्र आहे त्याला वेद म्हणू नये. त्यास कृतान्तवाक् अर्थात् यमाची वाणी म्हणावे ॥ २२ ॥
जे हिंसेचा निषेध करते तेच पुराण होय व तेच धर्मशास्त्र होऊ शकते परन्तु जे याच्याविपरीत आहे अर्थात् हिंसेचा उपदेश जे करते असे पुराण व धर्मशास्त्र समजू नये ते धूर्त लोकानी बनविले आहे असे समजावे ॥ २३ ।।
पापकार्यापासून विरक्त होणे यास वृत्त-चारित्र म्हणतात. आर्यपुरुषांची जी जिनपूजा, उपजीविका, दान देणे, स्वाध्याय, इन्द्रियसंयम व प्राणिसंयम पाळणे आणि तपश्चरण करणे ही सहा कर्मे करणे हे चारित्र होय व ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि भिक्षुकाश्रम यांचे जे अन्य धर्मात इतरांमी जे स्वरूप सांगितले आहे ते निश्चयाने अयोग्य आहे. जैनधर्मामध्ये या चार आश्रमांचे जे स्वरूप सांगितले आहे ते मात्र सत्य व योग्य आहे ॥ २४ ॥
गर्भाधानादि निर्वाणापर्यन्त ज्या क्रिया अर्थात् संस्कार सांगितले आहेत ते योग्य सम्यक् आहेत पण गर्भाधानापासून श्मशानापर्यन्त ज्या क्रिया इतरानी सांगितल्या आहेत त्या सम्यक् नाहीत ॥ २५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org