Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
एकोनचत्वारिंशत्तमं पर्व ।
अथाब्रवीद्विजन्मभ्यो मनुःक्षान्वयक्रियाः । यास्ता निःश्रेयसोदश्चित्वारिंशवथाष्ट च ॥१ श्रूयतां भो द्विजन्मानो वक्ष्ये निःश्रेयसीः क्रियाः। अवतारादिनिर्वाणपर्यन्ता दीक्षितोचिताः ॥२ व्रताधिकरणं दीक्षा द्विधाम्नातं च तद्वतम् । महच्चाणु च दोषाणां कृत्स्नदेशनिवृत्तितः॥३ महाव्रतं भवेत्कृत्स्नहिसाधागोविवर्जनम् । विरतिःस्थूलहिंसादिदोषेभ्योऽणुव्रतं मतम् ॥ ४ तदुन्मुखस्य या वृत्तिः पुंसो दीक्षेत्यसौ मता। तामन्विता क्रिया या तु सा स्याद्दीक्षान्वयक्रिया ॥५ तस्यास्त भेदसख्यानं प्राकनिर्णीतं षडष्टकम । क्रियते तद्विकल्पानामधना लक्ष्मवर्णनम् ॥६ तत्रावतारसंज्ञा स्यादाद्या दीक्षान्वयक्रिया । मिथ्यात्वदूषिते भव्ये सन्मार्गग्रहणोन्मखे ॥ ७ स तु संयत्य योगीन्द्रं युक्ताचारं महाधियम् । गृहस्थाचार्यमथवा पृच्छतीति विचक्षणः ॥८ ब्रूत यूयं महाप्राज्ञा मह्यं धर्ममनाविलम् । प्रायो मतानि तीर्थ्यानां हेयानि प्रतिभान्ति माम् ॥९
यानंतर सोळावे मनु अशा भरताने ज्याचे फल निःश्रेयस-मोक्ष आहे अशा अठेचाळीस दीक्षान्वयक्रिया त्रैवर्णिकांना सांगितल्या ॥ १ ॥
हे त्रैवर्णिकानो, ज्यानी दीक्षा घेतली आहे अशांना योग्य असलेल्या ज्या अवतार आदि क्रियाना धरून निर्वाणापर्यंत मुक्तिसाधक क्रिया मी तुम्हास सांगतो त्या तुम्ही ऐका ॥२॥
व्रतांना धारण करणे दीक्षा होय व ते व्रत दोन प्रकारचे सांगितले आहे. एक महाव्रत व दुसरे अणुव्रत. संपूर्ण हिंसा, असत्यादिकदोषापासून निवृत्त होणे ते महाव्रत होय व काही अंशाने दोषापासून निवृत्त होणे ते अणुव्रत होय ॥ ३ ।।
___संपूर्ण हिंसा, असत्य, चोरी आदिक पाच पापापासून निवृत्त होणे त्यांचा पूर्ण त्याग करणे ते महावत होय व स्थूलहिंसादि दोषापासून विरक्त होणे त्याला अणुव्रत म्हणतात ॥ ४ ॥
त्या कवांना ग्रहण करण्यास उन्मुख झालेल्या पुरुषाची प्रवृत्ति-जो त्याचा आचार त्याला दीक्षा म्हणतात. त्या दीक्षेशी संबद्ध असलेली जी क्रिया तिला दीक्षान्वयक्रिया म्हणतात ॥५॥
___ या दीक्षान्वयक्रियेचे अठेचाळीस भेद आहेत असे पूर्वी निर्णीत केले आहे. आता तिच्या भेदांचे लक्षणवर्णन करतो ॥ ६ ॥
मिथ्यात्वाने दूषित झालेली व्यक्ति-भव्य पुरुष जेव्हा सन्मार्गाला ग्रहण करण्यास उन्मुख होतो तेव्हा पहिली अवतारनामक दीक्षान्वय क्रिया तो करतो ॥ ७ ॥
तो विद्वान भव्य जीव ज्याचा आचार शुद्ध आहे, जो महाबुद्धिमान आहे अशा योगीन्द्राजवळ जाऊन अथवा गृहस्थाचार्यांजवळ जाऊन याप्रमाणे विचारतो ॥ ८ ॥
हे महाबुद्धिमता मला आपण धर्माचे निर्मल स्वरूप सांगा. कारण अन्यमतीयांची मते बहुत करून त्याज्य आहेत असे मला वाटते ॥ ९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org