Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३८-३०३)
महापुराण
परिनिष्क्रान्तिरेषा स्याक्रिया निर्वाणदायिनी । अतः परं भवेदस्य मुमुक्षोर्योगसम्महः ॥ २९५ यदायं त्यक्तबाह्यान्तःसङगो नैःसङग्यमाचरेत् । सुदुर्धरं तपोयोगं जिनकल्पमनुत्तरम् ॥ २९६ तदास्य क्षपकश्रेणीमारूढस्योचिते पदे । शुक्लध्यानाग्निनिर्दग्धघातिकर्मघनाटवेः ॥ २९७ प्रादुर्भवति निःशेषबहिरन्तर्मलक्षयात् । केवलाख्यं परञ्ज्योतिर्लोकालोकप्रकाशकम् ॥ २९८ तदेतत्सिद्धसाध्यस्य प्राप्नुषःपरमं महः । योगसम्मह इत्याख्यामनुधत्ते क्रियान्तरम् ॥ २९९ मानध्यानसमायोगो योगो यस्तत्कृतो महः । महिमातिशयः सोऽयमाम्नातो योगसम्महः ॥३००
इति योगसम्महः ॥ ४९ ततोऽस्य केवलोत्पत्तौ पूजितस्यामरेश्वरैः । बहिविभूत्तिरुद्भता प्रातिहार्यादिलक्षणा ॥ ३०१ प्रातिहार्याष्टकं दिव्यं गणो द्वादशधोदितः । स्तूपहावलीसालवलयः केतुमालिका ॥ ३०२ इयादिकामिमां भूतिमद्भुतामुपबिभ्रतः। स्यादाहन्त्यमिति ख्यातं क्रियान्तरमनन्तरम् ॥ ३०३
इति आर्हन्त्यक्रिया ॥ ५०
ही परिनिष्क्रान्ति नांवाची क्रिया निर्वाण-मोक्ष देणारी सांगितली. यानंतर या मोक्षेच्छूची 'योगसंमह' नांवाची क्रिया होते ती अशी ।। २९५ ।।
जेव्हां बाह्याभ्यन्तर परिग्रहांचा त्याग केलेले हे जिनराज निष्परिग्रह होतात तेव्हां हे अत्यंत दुर्धर असा तपोयोग धारण करतात. त्याला उत्कृष्ट जिनकल्प म्हणतात ।। २९६ ॥
___त्यावेळी हे जिनप्रभु क्षपकश्रेणीच्या योग्य गुणस्थानावर आरूढ होतात व शुक्लध्यानाग्नीने घातिकर्मरूपी दाट जंगल जाळून भस्म करतात व त्याच्या बाह्य व अन्तरंग मलांचा म्हणजे ज्ञानावरणादि चार द्रव्यघातिकर्मांचा आणि अज्ञान, रागद्वेष, मोहादि भावघातिकर्मांचा नाश होतो आणि त्या जिनप्रभूना केवलज्ञानरूपी उत्कृष्ट ज्योति प्राप्त होते. ती सर्व लोकांना व अलोकाकाशाला प्रकाशित करते ।। २९७-२९८ ॥
जे साध्य करावयाचे आहे ते प्रभूनी सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांना उत्कृष्ट तेज प्राप्त झाले आहे. या क्रियेला योगसंमह म्हणतात. ज्ञान आणि ध्यान यांची एकत्र स्थिति होणे याला योग म्हणतात व त्याचे मह म्हणजे तेज या दोघांचा मोठा जो महिमातिशय त्याला योगसंमह म्हणतात. योगसंमह नांवाची ही क्रिया ४९ वी आहे. ॥ २९९-३०० ॥
यानंतर या जिनेश्वराला केवलज्ञान उत्पन्न होते व देवेंद्र त्यांची पूजा करतात. त्यावेळी या प्रभूला अशोकवृक्षादि प्रातिहार्य वगैरे स्वरूप ज्याचे आहे असे वैभव प्राप्त होते ।। ३०१ ॥
__अशोकवृक्षादिक आठ प्रातिहार्ये-अशोकवृक्ष, देवकृत पुष्पवृष्टि, दिव्यध्वनि, चौसष्ट चामरे सिंहासन, भामंडल, नगारे वाजणे, छत्रत्रय, हे ऐश्वर्य व बारा प्रकारचा गण-भवनवास्यादिक चार प्रकारचे देव व चार प्रकारच्या देवी मिळून आठ व मुनि, आर्यिका, श्रावक व श्राविका हे चार मिळून बारा प्रकारचा गण. स्तूप, प्रासादपंक्ति, तीन तट, ध्वजपंक्ति, इत्यादिक वैभव प्रभूला प्राप्त होते, याला अर्हन्तावस्था म्हणतात. ही आर्हन्त्य क्रिया ५० वी होय ।। ३०२-३०३ ।। म. ५१
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org