________________
३९८)
महापुराण
(३८-२७१
प्रजानां पालनाथं च मतं मत्यनुपालनम् । मतिहिताहितज्ञानमात्रिकामुत्रिकार्थयोः ॥ २७१ ततः कृतेन्द्रियजयो वृद्धसंयोगसम्पदा । धर्मार्थशास्त्रविज्ञानात् प्रज्ञां संस्कर्तुमर्हति ॥२७२ अन्यथा विमतिर्भूपो युक्तायुक्तानभिज्ञकः । अन्यथान्यैः प्रणेयः स्यान्मिथ्याज्ञानलबोद्धतः ॥ २७३ कुलानुपालने चायं महान्तं यत्नमाचरेत् । अज्ञातकुलधर्मो हि दुवृत्तैर्दूषयेत्कुलम् ॥ २७४ तथायमात्मरक्षायां सदा यत्नपरो भवेत् । रक्षितं हि भवेत्सर्व नृपेणात्मनि रक्षिते ॥ २७५ अपायो हि सपत्नेभ्यो नृपस्यारक्षितात्मनः । आत्मानुजीविवर्गाच्च क्रुखलुब्धविमानितात् ॥ २७६ तस्माद्रसदतीक्ष्णादीनुपायानरियोजितान् । परिहत्य निरिष्टैः स्वं प्रयत्नेन पालयेत् ॥ २७७ स्यात्समञ्जसवृत्तित्वमप्यस्यात्मादिरक्षणे । असमञ्जसवृत्तो हि निजेरप्यभिभूयते ॥ २७८
प्रजेचे पालन करण्यासाठी आपली बुद्धि रक्षावी. त्यास सत्यनुपालन म्हणतात. अर्थात् इहलोकसंबंधी आणि परलोकसंबंधी जो हिताहिताचा विचार करणे त्याला मति म्हणतात ॥ २७१ ॥
वद्ध अनुभवी विद्वान लोकांची संगतिरूपी संपत्ति जवळ बाळगावी व त्यामुळे आपल्या इन्द्रियांना ताब्यात ठेवता येते, जिंकता येते. त्या विद्वानापासून धर्म व अर्थ या शास्त्रांचे ज्ञान होते व त्यामुळे आपली बुद्धि सुसंस्कृत होते ।। २७२ ।।
___जर अनुभवी लोकांचा राजाने संग्रह केला नाही तर मूर्ख राजाला युक्त कोणते व अयोग्य कोणते हे समजणार नाही. व अशा राजावर मिथ्याज्ञानाने अल्पज्ञानाने उद्धत बनलेल्या लोकांचा पगडा बसेल ॥ २७३ ॥
राजानी आपल्या कुलाचे रक्षण करण्यासाठी फार मोठा प्रयत्न केला पाहिजे. ज्याला आपल्या कुलाच्या धर्माच्या मर्यादांचे ज्ञान नाही तो राजा दुराचारानी आपले कुल दूषित करील ।। २७४ ॥
याचप्रमाणे राजाने स्वतःचे रक्षण करण्याच्या कार्टी नेहमी दक्ष रहावे, यत्न करावा. राजाने आपले रक्षण केले तर तो सर्वांचे रक्षण करण्यास समर्थ होतो ॥ २७५ ॥
जर राजाने आपल्या रक्षणाची काळजी घेतली नाही तर शत्रूपासून त्याला अपाय होईल. तसेच जे रागावले आहेत, जे लोभी आहेत, ज्यांचा आपण अपमान केला असेल अशा आपल्या नोकरवर्गापासूनही नाश होतो ॥ २७६ ।।
प्रारंभी गोड पण परिणामी कटु असे शत्रूकडून उपाय योजले जातात त्याचा परिहार करून जे आवडते असे आपले लोक आहेत त्यांच्याकडून आपले रक्षण करून घ्यावे ।। २७७ ॥
याचप्रमाणे राजाच्या ठिकाणी समञ्जसवृत्तिही असावी लागते. अर्थात् त्याने स्वतःचे व प्रजांचे रक्षण करण्यात तत्पर असावे, पक्षपातरहित असावे. पण जो राजा असंमजसवृत्तीचा असतो त्याचा स्वतःच्या लोकाकडूनदेखील अपमान होतो ॥ २७८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org