Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३८-२७०)
महापुराण
इहैव स्याधशोलाभो भूलाभश्च महोदयः । अमुत्राभ्युदयावाप्ति, मात्रैलोक्यनिर्जयः ॥ २६३ इति भूयोऽनुशिष्यैतान्प्रजापालनसद्विधौ । स्वयं च पालयत्येतान्योगक्षेमानुचिन्तनः ॥ २६४ तदिदं तस्य साम्राज्यं नाम धर्मक्रियान्तरम् । येनानुपालितेनायमिहामुत्र च नन्दति ॥२६५॥
इति साम्राज्यम् ॥४७ एवं प्रजाः प्रजापालानपि पालयतश्चिरम् । काले कस्मिश्चिदुत्पन्नबोधे दीक्षोद्यमो भवेत् ॥ २६६ सैषा निष्क्रान्तिरस्येष्टा क्रिया राज्याद्विरज्यतः । लौकान्तिकामरैर्भूयो बोधितस्य समागतः ॥२६७ कृतराज्यार्पणो ज्येष्ठे सूनो पार्थिवसाक्षिकम् । सन्तानपालने चास्य करोतीत्यनुशासनम् ॥२६८ त्वया न्यायधनेनाङग भवितव्यं प्रजातौ । प्रजा कामदुधा धेनुर्मता न्यायेन योजिता ॥२६९ राजवृत्तमिदं विद्धि यन्न्यायन धनार्जनम् । वर्धनं रक्षणं चास्य तीर्थे च प्रतिपादनम् ॥ २७०
त्या राजाला या लोकीं यशःप्राप्ति होईल. पृथ्वीप्राप्ति होईल आणि मोठा उत्कर्ष होईल. व परलोकी त्याला अभ्युदय स्वर्ग प्राप्त होईल. आणि तो त्रैलोक्याला जिंकील म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होईल ॥ २६३ ।।
__ याप्रमाणे प्रजापालनाच्या पद्धतीचा वारंवार सर्व लोकाना उपदेश करून व स्वतः योगक्षेमाचे चिन्तन करून प्रजेचे तो चक्रवर्ती पालन करतो ॥ २६४ ॥
याप्रमाणे त्या चक्रवर्तीची साम्राज्यनामक ही क्रिया आहे. या क्रियेच्या पालनाने हा परमेष्ठी-चक्रवर्ती इहलोकी व परलोकी सुखी होतो. याप्रमाणे ही ४७ वी साम्राज्यक्रिया आहे. ॥ २६५ ॥
निष्क्रान्तिक्रियेचे वर्णन याप्रमाणे आपल्या प्रजेचे व अनेक राजांचेही दीर्घकालपर्यन्त जिनप्रभु रक्षण करीत असता त्यांना एकेवेळी भेदविज्ञान उत्पन्न होते व ते दीक्षा घेण्यासाठी उद्युक्त होतात ॥ २६६ ॥
त्यावेळी ते राज्यापासून विरक्त होतात. ही. त्यांची निष्क्रान्ति क्रिया होय. त्यावेळी लौकान्तिक देव येऊन त्यांच्या वैराग्याला पुनः वृद्धिंगत करतात ॥ २६७ ।।
त्यावेळी ते प्रभु आपल्या जेष्ठ पुत्राला सर्व राजांच्या समक्ष राज्य अर्पण करतात व 'प्रजेच्या पालनाविषयी त्याला याप्रमाणे उपदेश करतात ।। २६८ ॥
हे पुत्रा, न्यायधनाचे रक्षण कर अर्थात् न्यायाने प्रजेचे पालन कर. न्यायाने प्रजेचे रक्षण केले असता ती प्रजा कामधेनूसारखी होते. अर्थात् प्रजा राजाच्या सर्व मनोरथाना पूर्ण करते ॥ २६९ ॥
__ राजाने न्यायाने धन मिळवावे, ते वाढवावे त्याचे रक्षण करावे, आणि योग्य पात्रात त्याचा व्यय करावा. यालाच राजवृत्त अर्थात् राजाचे कर्तव्य समज ॥ २७० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org