Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३९२)
महापुराण
(३८-२१७
सतोऽवतीर्णो गर्भेऽसौ रत्नगर्भगृहोपमे । जनयित्र्या महादेव्यां श्रीदेवीभिविशोधिते ॥ २१७ हिरण्यवृष्टि धनदे प्राक्षण्मासान्प्रवर्षति । अन्वायान्त्यामिवानन्दात्स्वर्गसम्पदि भूतले ॥ २१८ अमृतश्वसने मन्दमावाति व्याप्तसौरभे। भूदेव्या इव निःश्वासे प्रक्लप्ते पवनामरैः ॥ २१९ दुन्दुभिध्वनिते मन्द्रमुत्थिते पथिवार्मुचाम् । अकालस्तनिताशङ्कामातन्वति शिखण्डिनाम् ॥ २२० मन्दारस्रजमम्लानिमामोदाह्रतषट्पदाम् । मुञ्चत्सु गुह्यकारव्येषु निकायेष्वमृताशिनाम् ॥ २२१ देवीषपचरन्तीषु देवीं भुवनमातरम् । लक्षम्या स्वयंसमागत्य श्रीहीधीतिकोतिषु ॥ २२२ कस्मिश्चित्सुकृतावासे पुण्ये राजर्षिमन्दिरे । हिरण्यगर्भो धत्तेऽसौ हिरण्योत्कृष्टजन्मनाम् ॥ २२३ हिरण्यसूचितोत्कृष्टजन्मत्वात्स तथाश्रुतिम्। विभ्राणां तां क्रियां धत्ते गर्भस्थोऽपि त्रिबोधषत् ॥२२४
इति हिरण्यजन्मता॥३९ विश्वेश्वरी जगन्माता महादेवी महासती । पूज्या सुमङ्गला चेति धत्ते रूढिं जिनाम्बिका ॥ २२५
____रत्ननिर्मित गर्भगृहाप्रमाणे असलेला श्री आदिक देवतानी शुद्ध केलेला, महादेवीपदाला पावलेल्या अशा जननीच्या गर्भात तो इन्द्र अवतरतो. तो मातेच्या गर्भात येण्यास सहा महिन्याचा अवधि असतो अशा वेळी कुबेर-हिरण्य-सुवर्ण वृष्टि करीत असतो. जणु स्वर्गातून या इन्द्राची सम्पत्ति खाली येत आहे असे वाटते ॥ २१७-२१८ ।।।
वायुकुमारानी जणु निर्माण केलेला भूदेवीचा जणु निश्वास आहे असा व ज्याचा सुगंध चोहोकडे पूर्ण भरला आहे असा अमृतासारखा वायु वाहात असतो ।। २१९ ॥
___ मेघमार्गात-आकाशात गंभीर असा नगाऱ्यांचा ध्वनि होतो व मोराना अकाली मेघांची गर्जना होत आहे असा भास होतो ।। २२० ।
देवांच्या भेदात अन्तर्भूत अशा गुह्यक देवाकडून विकसित झालेल्या मंदारपुष्पांच्या माला ज्यानी आपल्या सुगंधाने भुंग्याना ओढून आणिले आहे त्या चोहोकडे वर्षिल्या जात होत्या ॥ २२१ ॥
श्री, ही, बुद्धि, धृति व कीति या देवता लक्ष्मीसह स्वतः येतात व त्रैलोक्यमाता अशा जिनजननीची सेवा करतात ॥ २२२ ॥
पुण्याचे घर असलेल्या पुण्ययुक्त-पवित्र अशा कोणा एका श्रेष्ठ राजाच्या मंदिरात हिरण्यगर्भ भगवान सुवर्णासमान उत्कृष्ट जन्माला धारण करतात ।। २२३ ॥
प्रभु गर्भात राहून देखिल तीन ज्ञानाना-मति, श्रुत व अवधि ज्ञानाना धारण करतात व हिरण्य-सुवर्ण वृष्टीनी जन्माची उत्कृष्टता सूचित होत असल्यामुळे हिरण्योत्कृष्ट जन्म या सार्थक नांवाला धारण करणान्या क्रियेला धारण करतात. याप्रमाणे हिरण्यगर्भता क्रिया ३९ वी संपली ।। २२४ ॥
विश्वेश्वरी, जगन्माता, महादेवी, महासती, पूज्या, सुमंगला इत्यादि नांवे जिनमातेला आहेत ॥ २२५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org