________________
३९४)
महापुराण
(३८-२३४
दिशाञ्जयः स विज्ञेयो योऽस्य दिग्विजयोद्यमः । चक्ररत्न पुरस्कृत्य जयतः सार्णवां महीम् ॥२३४
इति दिशां जयः ॥ ४५ सिद्धदिग्विजयस्यास्य स्वपुरानप्रवेशने । क्रिया चक्राभिषेकाहा साधुना सम्प्रकीर्त्यते ॥ २३५ चक्ररत्नं पुरोधाय प्रविष्टः स्वं निकेतनम् । परायविभवोपेतं स्वविमानापहासि यत् ॥ २३६ तत्र क्षणमिवासीनो रम्ये प्रमदमण्डपे । चामरोज्यमानोऽयं सनिर्झर इवाद्रिराट् ॥ २३७ सम्पूज्य निधिरत्नानि कृतचक्रमहोत्सवः । दत्वा किमिच्छकं दानं मान्यान्संमान्य पार्थिवान् ॥ २३८ ततोऽभिषेकमाप्नोति पार्थिवैर्महितान्वयैः । नान्दीतूर्येषु गम्भीरं प्रध्वनत्सु सहस्रशः ॥ २३९ यथावदभिषिक्तस्य तिरीटारोपणं ततः । क्रियते पार्थिवर्मुख्यश्चतुभिः प्रथितान्वयः ॥ २४० महाभिषेकसामग्या कृतचक्राभिषेचनः । कृतमङगलनेपथ्यः पार्थिवैः प्रणतोऽभितः ॥ २४१ तिरीटं स्फुटरत्नांशुजटिलीकृतदिङमुखम् । दधानश्चक्रसाम्राज्यककुदं नृपपुङगवः ॥ २४२ रत्नांशुच्छरितं बिभ्रत्कर्णाभ्यां कुण्डलद्वयम् । यद्वाग्देव्याः समाक्रोडारथचक्रद्वयायितम् ॥ २४३ तारालितरलस्थूलमुक्ताफलमुरोगृहे । धारयन्हारमाबद्धमिव मङगलतोरणम् ॥ २४४
चक्ररत्न प्राप्त झाल्यावर प्रभु दिग्विजयासाठी उद्यम करतात. अर्थात् चक्ररत्न पुढे करून संपूर्णसमुद्रासह पृथ्वीला जिंकतात. या क्रियेला दिग्विजय म्हणतात. ही क्रिया ४५ वी होय ॥ २३४ ॥
__ जेंव्हा जिनप्रभु चक्रपति आपला दिग्विजय पूर्ण करून आपल्या नगरात प्रवेश करतात तेव्हा त्यांची चक्राभिषेकक्रिया होते. तिचे आता वर्णन करतात- प्रभूचा प्रासाद अत्युत्कृष्ट वैभवाने युक्त असल्यामुळे स्वर्गातल्या विमानास तो हासत असतो. अशा आपल्या प्रासादात प्रवेश करून क्षणपर्यंत तेथील रमणीय प्रमदनामक मंडपात ते बसतात. त्यावेळी ज्यांच्यावर चामरे वारली जातात असे प्रभु अनेक झऱ्यानी युक्त मेरुपर्वताप्रमाणे शोभतात. त्यावेळी ते चक्राचा महान् उत्सव साजरा करतात. अर्थात् नऊ निधींची व चक्ररत्नाची पूजा करून याचकाना तुम्हाला काय पाहिजे असे विचारून त्याला ते देतात आणि माननीय राजांचा त्यावेळी ते सम्मान करतात ।। २३५-२३८ ॥
_यानन्तर लोकमान्यकुलात उत्पन्न झालेले राजे हजारो मंगलवाद्ये गंभीरपणाने वाजत असता प्रभूचा अभिषेक करितात ।। २३९ ।।
शास्त्रोक्त अभिषेक झाल्यावर प्रसिद्ध वंशातील चार राजे प्रभूच्या मस्तकावर मुकुट ठेवतात ।। २४० ॥
___ महाभिषेकाच्या सामग्रीने प्रभूच्या चक्ररत्नालाही अभिषेक घालतात. त्यावेळी नाना भूषणांनी भूषित अशा प्रभूला सर्व राजे नम्र होऊन नमस्कार करतात ।। २४१ ।।
सर्व राजांचे मुकुटमणि अशा प्रभूनी जो मुकुट मस्तकावर धारण केलेला असतो त्यातील रत्नांच्या किरणानी सर्व दिशामुखे अगदी चमकत असतात. ज्यांच्या रत्नांची कान्ति पसरलो आहे अशी दोन कुण्डले त्यानी आपल्या कानात धारण केलेली असतात. ती जणु
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org