Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३८-१७४)
महापुराण
(३८७
ज्ञानविज्ञानसम्पन्नः स्वगुरोरभिसम्मतः । विनीतो धर्मशीलश्च यः सोऽर्हति गुरोःपदम् ॥ १६७
गुरुस्थानाभ्युपगमः ॥ २७ ततः सुविहितस्यास्य युक्तस्य गणपोषणे । गणोपग्रहणं नाम क्रियाम्नाता महर्षिभिः ॥ १६८ श्रावकानायिकासाचं श्राविकाः संयतानपि । सन्मार्गे वर्तयन्नेष गणपोषणमाचरेत् ॥ १६९ . श्रुताथिभ्यःश्रुतं दद्याद्दीक्षार्थिभ्यश्च दीक्षणम् । धर्माथिभ्योऽपि सद्धर्म स शश्वत्प्रतिपादयेत् ॥ सद्वृत्तान्धारयन्सूरिरसदृत्तानिवारयन् । शोधयंश्च कृतादागोमलात्स बिभृयाद्गणम् ॥
इति गणोपग्रहणम् ॥ २८ गणपोषणमित्याविष्कुर्वन्नाचार्यसत्तमः । ततोऽयं स्वगुरुस्थानसङक्रान्तो यत्नवान्भवेत् ॥ १७२ अधीतविद्यं तद्विद्यैरादृतं मुनिसत्तमैः । योग्यं शिष्यमथाहूय तस्मै स्वं भारमर्पयेत् ॥ १७३ गुरोरनुमतात्सोऽपि गुरुस्थानमधिष्ठितः । गुरुवृत्तौ स्वयं तिष्ठेद्वर्तयेत्सकलं गणम् ॥ १७४
इति स्वगुरुस्थानावाप्तिः॥ २९ भावना सोळा प्रकारची सांगितली आहे. दर्शनशुद्धि, विनयसंपन्नता वगैरे सोळा प्रकारांची आहे व फार मोठ्या ऐश्वर्याची प्राप्ति तिच्यापासून होते. या भावनांचे वर्णन पूर्वी विस्ताराने केले आहे. ही २६ वी भावना होय ।। १६४-१६६ ॥
___ यानन्तर ज्याला सर्व विद्या अवगत झालेल्या आहेत व ज्याने आपल्याला ताब्यात ठेवले आहे अशा त्या मुनिराजाला गुरूंचा अनुग्रह मिळाल्यामुळे गुरुस्थानाची प्राप्ति होते. तो मुनिराज ज्ञान व विज्ञान-अध्यात्मिक याने संपन्न असल्यामुळे मुरूना मान्य झालेला असतो. अर्थात् गुरु आपले पद देण्याला त्याला योग्य समजतात. तो विनयी व धर्मचरणात दक्ष असल्यामुळे गुरूंच्या पदाला धारण करण्यास योग्य होतो. ही गुरुस्थानाभ्युपगम-गुरुस्थानाचा स्वीकार करणे या नांवाची २७ वी क्रिया आहे ॥ १६७ ॥
सदाचार संपन्न हा मुनिराज गणपोषण करण्यास -शिष्यसमूहाचे रक्षण करण्यास - समर्थ होतो तेव्हा गणोपग्रहण क्रिया केली जाते असे महर्षीनी सांगितले आहे. श्रावक, आर्यिकांचा संघ, श्राविका व मुनि यांना सन्मार्गात तत्पर करणे ही गणोपग्रहण क्रिया होय. या मुनिराजाने ज्ञानाची इच्छा करणाऱ्याना ज्ञान द्यावे, त्यांच्याकडून शास्त्राभ्यास करून घ्यावेत, दीक्षा घेण्याची इच्छा करणाऱ्यांना दीक्षा द्यावी, धर्माची इच्छा करणाऱ्याना धर्मोपदेश द्यावा अशा क्रिया याने नेहमी कराव्यात. सदाचाराने वागणाऱ्याचे रक्षण करावे, दुराचाऱ्यांचे निवारण करावे व ज्यांच्या हातून पाप घडले असेल त्यांना प्रायश्चित्त देऊन शुद्ध करावे. याप्रमाणे गणाला स्वकृत्यात स्थिर करावे. ही गणोपग्रहण नांवाची २८ वी क्रिया होय ॥ १६८-१७१ ॥
___ गण-शिष्यसंघाचे पोषण करणाऱ्या श्रेष्ठ आचार्यांनी यानन्तर आपले जे गुरुपद आहे ते योग्य शिष्याला देण्याचा विचार करावा, त्याविषयी यत्न करावा. ज्याने विद्याध्ययन केले आहे व जो विद्याध्ययन केलेल्या श्रेष्ठ मुनीनी आदरिलेला आहे अशा योग्य शिष्याला बोलावून त्याला ते आपले गुरुपद द्यावे. गुरूंच्या अनुमतीने त्या शिष्याने ते गुरुपद स्वीकारावे व गुरूंच्या स्थानी स्वतः बसून सगळ्या गणाला त्याने योग्य रीतीने वागवावे. ही गुरुस्थानप्राप्ति नांवाची २९ वी क्रिया होय ॥ १७२-१७४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org