Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३८८)
महापुराण
(३८-१७५
तत्रारोप्य भरं कृत्स्नं काले कस्मिश्चिदव्यथः । कुर्यादेकविहारी स निःसङ्गत्वात्मभावनाम् ॥१७५ निःसङ्गवृत्तिरेकाको विहरन्स महातपाः । चिकीर्षुरात्मसंस्कारं नान्यं संस्कर्तुमर्हति ॥ १७६ अपि रागं समुत्सृज्य शिष्यप्रवचनादिषु । निमैमत्वकतानः संश्चर्याशुद्धि तदाश्रयेत् ॥ १७७
इति निःसङ्गत्वात्मभावना ॥३० कृत्वैवमात्मसंस्कारं ततः सल्लेखनोद्यतः । कृतात्मशुद्धिरध्यात्म योगनिर्वाणमाप्नुयात् ॥ १७८ योगो ध्यानं तदर्थो यो यत्नः संवेगपूर्वकः । तमाहुर्योगनिर्वाणं सम्प्राप्तं परमं तपः ॥ १७९ कृत्वा परिफरं योग्यं तनुशोधनपूर्वकम् । शरीरं कर्शयेद्दोषैः समं रागादिभिस्तदा ॥ १८० तदेतद्योगनिर्वाणं संन्यासपूर्वभावना । जीविताशां मृतीच्छां च हित्वा भव्यात्मलब्धये ॥ १८१ रागद्वेषौ समुत्सृज्य श्रेयोऽवाप्तौ च संशयम् । अनात्मीयेषु चात्मीयसङ्कल्पाद्विरमेत्तदा ॥ १८२ नाहं देहो मनो नास्मि न वाणी न च कारणम् । तत्र यस्येत्यनुद्विग्नो भजेदन्यत्वभावनाम् ॥ १८३ अहमेको न मे कश्चिन्नवाहमपि कस्यचित् । इत्यदीनमनाः सम्यगेकत्वमपि भावयेत् ॥ १८४ मतिमाधाय लोकाग्रे नित्यानन्तसुखास्पदे । भावयेद्योगनिर्वाणं स योगी योगसिद्धये ॥ १८५
__इति योगनिर्वाणसम्प्राप्तिः ॥ ३१ याप्रमाणे योग्य शिष्यावर आपला सर्व भार अर्पण करून काही कालपर्यन्त काळजी न करता मी आता संपूर्ण परिग्रहरहित झालो अशी आत्मभावना करीत एकविहारी व्हावे, सर्व परिग्रहरहित, एकाकी व महातपस्वी अशा त्या महामुनीनी केवळ आपल्या आत्म्यावरच संस्कार करावे. स्वतःला सोडून इतर साधु किंवा गृहस्थाचा संस्कार करण्याची चिन्ता त्यांनी सोडून द्यावी. शिष्य, शास्त्र आदिकावरची रागभावना त्यागावी व त्या मुनिवर्याने निर्ममत्वामध्ये पूर्ण तत्पर व्हावे. आपल्या चारित्राच्या शुद्धीचा त्यावेळी आश्रय करावा. याप्रमाणे निःसङगत्वात्म भावना ३० होय ॥ १७५-१७७ ।।
___ याप्रमाणे आत्म्यावर संस्कार करून जेव्हा सल्लेखना करण्यासाठी उद्युक्त होतात तेव्हा ते मुनिराज आत्म्याची शुद्धि केली असल्यामुळे योगनिर्वाणाला प्राप्त होतात. योगनिर्वाणाचा खुलासा असा- योग म्हणजे ध्यान. त्यासाठी संसारभीति मनात बाळगून जो प्रयत्न करणे त्याला योगनिर्वाण म्हणतात. अर्थात् ते उत्कृष्ट तप आहे. प्रथमतः या योगनिर्वाणासाठी शरीरशुद्धि करावी. यानन्तर वातपित्तादिक दोषाबरोबर रागादिक दोष कृश करून शरीर कृश करावे. याला योगनिर्वाण म्हणतात. संन्यासाच्या वेळी पूर्वभावना अशी करावी अर्थात् जगण्याची इच्छा व मरण्याची इच्छाही त्यागावी. यामुळे आत्म्याचे हित होते. आत्मस्वरूप प्राप्त होते. रागद्वेषांचा त्याग करावा व मोक्षप्राप्तिविषयी मन निःशंक करावे. जे पदार्थ आत्म्याचे नाहीत त्याविषयी हे आत्म्याचे आहेत असा संकल्प त्यागावा. मी देह नाही, मी मन नाही व मी वचन नाही व देहमनोवचनांचे कारण पण नाही. या तीन पदार्थाविषयी खिन्न होऊ नये. याप्रमाणे यापासून मी भिन्न आहे अशी भिन्नत्वभावना भावावी. मी एकटाच, माझे कोणी नाहीत व मी पण कोणाचा नाही अशी उदात्त मनाने उत्तम एकत्वाची भावना भावावी. जो नित्य आहे व अनन्त सुखांचे स्थान आहे अशा मोझस्थानात आपली बुद्धि लावून या मुनिराजाने योगसिद्धीसाठी योगनिर्वाणाची भावना करावी. याप्रमाणे योगनिर्वाणसम्प्राप्ति ही एकतीसावी क्रिया आहे ।। १७८-१८५ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org