Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३८६)
महापुराण
( ३८-१५७
त्यक्तागारस्य सदृष्टेः प्रशान्तस्य गृहीशिनः । प्राग्दीक्षोपासिकात्कालादेकशाटकधारिणः ॥ १५७ यत्पुरश्चरणं दीक्षाग्रहणं प्रतिधार्यते । दीक्षाद्यं नाम तज्ज्ञेयं क्रियाजातं द्विजन्मनः ॥ १५८
इति दीक्षा त्यक्तचेलादिसङ्गस्य जैनी दीक्षामुपेयुषः । धारणं जातरूपस्य यत्तत्स्याज्जिनरूपता ॥ १५९ अशक्यधारणं चेदं जन्तूनां कातरान्मनाम् । जैनं निःसङ्गतामुख्यं रूपं धीरनिषेव्यते ॥ १६०
इति जिनरूपता कृतदीक्षोपवासस्य प्रवृत्ते पारणाविधौ । मौनाध्ययनवृत्तत्वमिष्टमाश्रुतनिष्ठितेः ॥ १६१ । वाचंयमो विनीतात्मा विशुद्धकरणत्रयः । सोऽधीयोत श्रुतं कृत्स्नं आमूलाद्गुरुसन्निधौ ॥ १६२ श्रुतं हि विधिनानेन भव्यात्मभिरुपासितम् । योग्यतामिह पुष्णाति परत्रापि प्रसीवति ॥ १६३
इति मौनाध्ययनरूपता ततोऽधीताखिलाचारः शास्त्रादिश्रुतविस्तरः । विशुद्धाचरणोऽभ्यस्येत्तीर्थकृत्त्वस्य भावनाम् ॥ १६४ सा तु षोडशषाम्नाता महाभ्युदयसाधिनी । सम्यग्दर्शनशुद्धयादिलक्षणा प्राप्रपञ्चिता ॥ १६५
२६ इति तीर्थकृद्भावना ततोऽस्य विदिताशेषविद्यस्य विजितात्मनः । गुरुस्थानाभ्युपगमः सम्मतो गुर्वनुग्रहात् ॥ १६६
___ ज्याने घराचा त्याग केला, जो गृहस्थाचार्य असून अतिशय शान्त व सम्यग्दृष्टि आहे व दीक्षा घेण्याच्या पूर्वी ज्याने एक वस्त्र धारण केले आहे अशा त्याचे दीक्षा घेण्यापूर्वी जे आचरण केले जाते व ज्या क्रिया केल्या जातात त्याना दीक्षाद्य हे नांव आहे. ही दीक्षाद्य क्रिया २३ वी समजावी ॥ १५७-१५८ ।।
जन्मलेल्या बालकाप्रमाणे जी नग्नता धारण करणे तिला जिनरूपता म्हणतात. ही जिनरूपता वस्त्रादिक सर्व परिग्रह ज्याने त्यागले आहेत त्याला प्राप्त होते. जो भित्रा-धर्यहीन आहे त्याला ही जिनरूपता धारण करणे शक्य नाही. या जिनेश्वराच्या जातरूपात निःसंगतासंपूर्ण परिग्रहांचा त्याग हा मुख्य आहे. हे निःसंगतारूप धीर पुरुषाकडून धारण केले जाते. ही जिनरूपता क्रिया होय. ही २४ वी आहे ।। १५९-१६० ॥
ज्याने दीक्षा घेऊन उपवास धारण केला आहे व दुसरे दिवशी पारणा करण्यासाठी अर्थात् विधिपूर्वक आहार घेण्यासाठी जो प्रवृत्त झाला आहे तसेच शास्त्राच्या समाप्तीपर्यन्त जो मौनाने अध्ययन करीत आहे, त्याला मौनाध्ययनवृत्तित्व म्हणतात. ज्याने मौन धारण केले आहे, जो विनयशील आहे, ज्याचे मन, वचन व शरीराचे व्यापार पवित्र आहेत, अशा त्या मुनीने गुरूंच्या जवळ प्रारंभापासून सर्वश्रताचे अध्ययन करावे. या विधीने भव्यात्म्यानी श्रताचं उपासना केली म्हणजे त्यांच्या योग्यतेला ते शास्त्राध्ययन खूप पुष्ट करते व परलोकीही त्या आत्म्याना प्रसन्नता प्राप्त होते. ही मौनाध्ययनवृत्तिता २५ वी भावना होय ॥ १६१-१६३ ।।
यानन्तर ज्याने सर्व आचारांचे अध्ययन केले आहे व ज्याने इतर शास्त्रांच्या अध्ययनाने ज्ञानाचा विस्तार जाणला आहे अशा त्या मुनीश्वराचे आचरण अत्यन्त निर्मळ होते व त्यामुळे तो मुनीश्वर तीर्थंकरपदाची प्राप्ति करून देणान्या भावनेचा अभ्यास करतो. ती
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org