Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३८४)
महापुराण
(३८-१४२
लब्धवर्णस्य तस्येति कूलचर्यानकीर्तने । सात्विज्यादत्तिवार्तादिलक्षणा प्राकप्रपञ्चिता ॥ १४२ विशुद्धावृत्तिरस्यार्यषट्कर्मानुप्रवर्तनम् । गृहिणां कुलचर्येष्टा कुलधर्मोऽप्यसौ मतः ॥ १४३
___ इति कुलचर्या क्रिया। १९ कुलचर्यामनुप्राप्तो धर्मे दाढर्यमथोद्वहन् । गृहस्थाचार्यभावेन संश्रयेत्सगृहीशिताम् ॥ १४४ ततोवर्णोत्तमत्वेन स्थापयेत्स्वां गृहीशिताम् । शुभवृत्तिक्रियामन्त्रविवाहैः सोत्तरक्रियः ॥ १४५ अनन्यसदृशैरेभिः श्रुतवृत्तिक्रियादिभिः । स्वमुन्नति नयन्नेष तदाहति गृहीशिताम् ॥ १४६ वर्णोत्तमो महीदेवः सुश्रुतो द्विजसत्तमः । निस्तारको ग्रामपतिर्मानाहश्चेतिमानितः ॥ १४७
इति गृहीशिता । २०
ज्याला धनधान्यादि सम्पत्ति मिळाली आहे असा तो पुत्र वडिलाच्या सम्मतीने वेगळे घर करून जेव्हा राहतो तेव्हा स्वतंत्र होऊन उपजीविका करण्याच्या त्याच्या त्या वृत्तीला वर्णलाभ म्हणतात. ह्या वर्णलाभक्रियेच्या वेळीही पूर्वीप्रमाणे सिद्ध पूजन करावे व इतर मुख्य श्रावकाना साक्षी ठेवून पिता आपल्या पुत्राला धन अर्पण करितो व असे म्हणतो, हे पत्रा, हे धन घेऊन या माझ्या घरात तु पथक राहा आणि दान देणे, पूजा करणे वगैरे जो गहस्थ धर्म आहे त्याचे त पालन कर. जसे आमच्या पित्याने दिलेल्या धनाने आम्ही यश आणि धर्म मिळविला तसे तही यश व धर्म याचे उपार्जन कर, याप्रमाणे त्याला उपदेश करून वर्णलाभात त्याचे नियोजन करावे. असा हा सदाचार आहे व सद्धर्माचे आचरण करण्यास तू आता योग्य झाला आहेस. ही १८ वी वर्णलाभ क्रिया करावी ॥ १३५-१४१॥
ज्याला वर्णलाभ प्राप्त झाला आहे त्याची कुलचर्या आता सांगतो. ती कुलचर्या म्हणजे जिनपूजा करणे, सत्पात्राला दान देणे व न्यायाने उपजीविका करणे इत्यादी तिचे स्वरूप आहे व तिचा विस्तार पूर्वी सांगितला आहे. अर्थात् निर्दोष अशी उपजीविका करणे व आर्याच्या देव पूजादि षट्कर्माचे पूर्वजाप्रमाणे पालन करणे ही गृहस्थाची कुलचर्या होय. यासच कुलधर्म असेही म्हणतात. याप्रमाणे कुलचर्या १९ वी क्रिया होय ॥ १४२-१४३ ॥
कुलचर्येला प्राप्त झालेला हा गृहस्थ जेव्हा धर्मात अतिशय दृढ होतो तेव्हा गृहस्थाचार्य भावाला स्वीकारतो अर्थात् तो सर्व गृहस्थाचा स्वामी होतो अर्थात् गृहस्थाचार्य होतो. यानंतर स्वतःला वर्णात श्रेष्ठपणा प्राप्त झाल्यावर आपणात गृहीशिता-गृहस्थाचार्यता स्थापन करावी. दुसऱ्या गृहस्थात न आढळणारे व इतराप्रमाणे नसलेले अशा शुभवृत्ति, क्रिया, मन्त्र, विवाह आणि पुढे सांगितलेल्या क्रियांचे ज्ञान इत्यादीकानी व विशिष्ट शास्त्रज्ञान व चारित्र आदि क्रियानी आपल्याला उन्नत करून तो गृहीश अर्थात् गृहस्थात श्रेष्ठ होतो, गृहस्थाचार्य होतो. तेव्हा सर्व लोकानी त्याला वर्णोत्तम, महीदेव - पृथ्वीवर असलेला देव, उत्तम श्रुतज्ञानी, द्विजात सर्व श्रेष्ठ, निस्तारक, ग्रामपति - सर्व ग्रामात श्रेष्ठ व मानार्ह- मान देण्याला योग्य असे मानावे. याप्रमाणे गृहस्थाचार्य पदाला तो पोहोचतो ही विसावी गृहीशिता क्रिया आहे ॥१४४-१४७।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org