________________
३८-१०९)
महापुराण
(३८१
क्रियोपनीति मास्य वर्षे गर्भाष्टमेमता । यत्रापनीतकेशस्य मौजी सव्रतबन्धना ॥ १०४ कृतार्हत्पूजनस्यास्य मौजीबन्धो जिनालये । गुरुसाक्षी विधातव्यो व्रतार्पणपुरःसरणम् ॥ १०५ शिखी सितांशुकः सान्तर्वासा निर्वेषविक्रियः । व्रतचि दधत्सूत्रं तदोक्तो ब्रह्मचार्यसौ ॥ १०६ चरणोचितमन्यच्च नामध्येयं तदास्य वा । वृत्तिश्च भिक्षयान्यत्र राजन्यादुद्धवैभवात् ॥ १०७ सोऽन्तःपुरे चरेत्पाभ्यां नियोग इतिकेवलम् । तदनं देवसात्कृत्य ततोऽन्नं योग्यमाहरेत् ॥ १०८
इत्युपनीतिः । १४ व्रतचर्यामहं वक्ष्ये क्रियामस्योपबिभ्रतः । कटयूरूरः शिरोलिङ्गमनूचानव्रतोचितम् ॥ १०९
___ गर्भापासून आठव्या वर्षी बालकाची उपनीति क्रिया करावी. यावेळी मुंडन करून व्रतासह मौंजी बंधन केले जाते. जिनमंदिरात अर्हन्ताची पूजा केल्यावर गुरूच्या साक्षीने व्रतार्पणपूर्वक मौंजी बन्धन करावे. ज्याला शिखा-शेंडी आहे, ज्याने शुभ्र वस्त्र धारण केले आहे व ज्याने लंगोटी धारण केली आहे, ज्याचा वेष निर्विकार आहे, व्रताचे चिह्न असे यज्ञोपवीत धारण केले आहे असा तो बालक 'ब्रह्मचारी' या नांवाने वाखाणला जातो. त्याच्या या आचरणाला अनुसरून दुसरेही योग्य नांव ठेवण्यास हरकत नाही. ज्याचे ऐश्वर्य मोठे आहे अशा राजपुत्राशिवाय बाकीच्या ब्रह्मचा-यानी आपला निर्वाह भिक्षेने करावा. याचप्रमाणे जो राजपुत्र असेल त्यानेही भिक्षा मागावी असा नियम असल्यामुळे अन्तःपुरात पात्र हातात घेऊन भिक्षा मागावी व थोडेसे अन्न देवाला अर्पण करावे आणि बाकीचे योग्य अन्न आपण खावे. याप्रमाणे उपनीति क्रिया १४ वी होय ।। १०४-१०८ ॥
आता मी व्रतचर्या नामक क्रियेचे वर्णन करतो. कंबर, मांड्या, छाती व मस्तक या ठिकाणी ब्रह्मचर्याला योग्य अशी चिह्न बालक-धारण करतो. तिहेरी केलेले मौंजीचे बन्धन कडदोरा याच्या कमरेला असतो. हे चिह्न रत्नत्रयाची विशुद्धि निर्मलता दाखविणारे आहे. अतिशय धुतलेले शुभ्र वस्त्र हे मांड्याचे चिन्ह आहे. हे चिन्ह जिनमत धारण करणाऱ्या जैनांचे कुल विशाल व पवित्र आहे याचे सूचक आहे. या ब्रह्मचारी बालकाचे छातीचे चिह्न जानवे आहे. हे सात पदरांचे असते व सज्जाति, सद्गृहस्थपणा, आदि सात परमस्थानांचे सूचक आहे. या बालकाचे मस्तकाचे चिन्ह स्वच्छ व उत्कृष्ट मुण्डन हे आहे व ते चिन्ह याच्या मनाची, वचनाची आणि शरीराची शुद्धता वाढविणारे आहे. इन्द्रियविषयाविषयीची अनासक्ति वाढविणारे आहे. अशा रीतीच्या तीन लिंगानी युक्त होऊन हा ब्रह्मचारी बालक स्थूल हिंसा त्याग, स्थूल असत्य भाषण त्याग इत्यादिक ब्रह्मचर्याला वाढविणारी पाच व्रते धारण करतो. याचप्रमाणे ह्या ब्रह्मचारी बालकाने दात घासण्याच्या काड्यानी दात घासू नयेत, याने तांबूल भक्षण करू नये, डोळयात अंजन घालू नये. अंगाला हळद वगैरे लावून स्नान करू नये. फक्त स्वच्छ पाण्याने स्नान करावे. याने बाजेवर, पलंगावर झोपू नये. दुसन्याशी अंग संघटन करून झोपू नये. अर्थात् त्याने जमिनीवर केवळ एकटयाने या ब्रह्मचर्याच्या व्रतशुद्धीकरिता झोपावे व जोपर्यन्त याच्या विद्येची समाप्ति होत नाही तोपर्यन्त या व्रताचे पालन याने केले पाहिजे. यानंतरही जेव्हा हा बालक विद्या समाप्तीनंतर गृहस्थ होतो तेव्हाही त्याने अहिंसादि
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org