________________
३७८)
महापुराण
(३८-७७
गर्भाधानात्परं मासे तृतीये सम्प्रवर्तते । प्रीति मक्रिया प्रोतर्यानुष्ठेया द्विजन्मभिः ॥७७ तत्रापि पूर्ववन्मन्त्रपूर्वापूजा जिनेशिनाम् । द्वारि तोरणविन्यासः पूर्णकुम्भौ च सम्मतौ ॥ ७८ तदादि प्रत्यहभेरीशब्दो घण्टास्वनान्वितः । यथाविभवमेवैतः प्रयोज्यो गृहमेधिभिः ॥ ७९ ।
इति प्रीतिः॥ आधानात्पञ्चमेमासि क्रिया सुप्रीतिरिष्यते । या सुप्रीतैः प्रयोक्तव्या परमोपासकवतैः॥ ८० तत्राप्युक्तो विधिः पूर्वः सर्वोऽर्हद्विम्बसन्निधौ । कार्योमन्त्रविधानन्जैः साक्षीकृत्याग्निदेवताः ॥ ८१
इति सुप्रीतिः ॥ धृतिस्तु सप्तमे मासि कार्या तद्वत्कृतादरैः । गृहमेधिभिरव्यग्रमनोभिर्गर्भवृद्धये ॥ ८२ इति धृतिः॥ नवमे मास्यतोऽभ्यर्णे मोदो नाम क्रियाविधिः । तद्वदेवादतः कार्यो गर्भपुष्टचै द्विजोत्तमैः ॥ ८३ तत्रष्टो गात्रिकाबन्धोमङ्गल्यं च प्रसाधनम् । रक्षासूत्रविधानं च गभिण्या द्विजसत्तमैः ॥ ८४
इति मोदः॥ प्रियोद्धवः प्रसूताया जातकर्मविधिः स्मृतः । जिनजातकमाध्याय प्रवर्यो यो यथाविधि ॥ ८५ अवान्तरविशेषोऽत्र क्रियामन्त्रादिलक्षणः । भूयान्समस्त्यसौ ज्ञेयो मूलोपासकसूत्रतः ॥ ८६
इति प्रियोद्धवः ॥
प्रीति- गर्भाधानानंतर तिसऱ्या महिन्यात प्रीतियुक्त द्विजांनी प्रीति नावाचासंस्कार करावा. या संस्कार क्रियेतही पूर्वीप्रमाणे अर्हत्परमेष्ठींची पूजा मन्त्रपूर्वक करावी. द्वारावर तोरण बांधावे व द्वारावर दोन पूर्ण कुंभ स्थापन करावेत. यानंतर दररोज नगाऱ्याचा शब्द करावा. नगारे वाजवावेत आणि घण्टा ध्वनि करावा. आपल्या वैभवाला अनुसरून गृहस्थानी हा विधि करावा. याप्रमाणे हा दुसरा प्रीतिनामक संस्कार आहे ।। ७७-७९ ।।
सुप्रीति- गर्भाधानानंतर पाचव्या महिन्यात सुप्रीति नांवाची क्रिया सांगितली आहे. ती प्रसन्न व उत्तम श्रावकाकडून केली जाते. ही क्रिया जिनेन्द्रबिम्बाच्या सन्निध अग्नि आणि देवतांच्या साक्षीने मंत्र विधान जाणणा-यानी उत्तमरीतीने करावी. - इति सुप्रीतिः ।। ८०-८१॥
धृतिक्रिया- आदरयुक्त श्रावकांनी आपले मन व्यग्र न होऊ देता गर्भाची वाढ व्हावी म्हणून सातव्या महिन्यात धृतिनामक क्रिया करावी ॥ ८२ ॥
मोद- जेव्हां नववा महिना जवळ येतो त्यावेळी आदरयुक्त उत्तम द्विज गृहस्थांनी गर्भ पुष्ट व्हावा म्हणून मोद नांवाची क्रिया करावी व गात्रिका बन्धन करावे अर्थात् मंत्रपूर्वक बीजाक्षरे लिहावीत. मङगलसूचक अलंकार गर्भिणीने धारण करावेत. गर्भ रक्षणार्थ रक्षासूत्र विधान करावे. हा मोद संस्कार होय ॥ ८३-८४ ॥
प्रियोद्भवसंस्कार-प्रसूति झाल्यानंतर प्रियोद्भवसंस्कार करावा. याचे दुसरे नांव जातकर्म-विधि असे आहे. ही क्रिया जितेन्द्र भगवंताचे स्मरण करून यथाविधि करावी. यात अवान्तर विशेष क्रिया मंत्रादिक पुष्कळ आहेत ते सर्व मूळ उपासक सूत्रावरून जाणावेत ॥ ८५-८६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org