Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३७२)
महापुराण
(३८-१८
सन्त्येवानन्तशो जीवा हरितेष्वङकुरादिषु । निगोता इति सार्वज्ञं देवास्माभिः श्रुतं वचः ॥ १८ तस्मानास्माभिराक्रान्तमद्यत्वे त्वद्गृहाङ्गणम् । कृतोपहारमाद्रिः फलपुष्पाङकुरादिभिः ॥ १९ इति तद्वचनात्सर्वान् सोऽभिनन्द्य दृढव्रतान् । पूजयामास लक्ष्मीवान्दानमानादिसत्कृतः ॥ २० तेषां कृतानि चिह्वानि सूत्रैः पद्माह्वयानिधेः । उपात्तैब्रम्हासूत्रारेकाोकादशान्तकैः ॥ २१ गुणभूमिकृताद्धदात्कृसृप्तयज्ञोपवीतिनाम् । सत्कारः क्रियते स्मैषामवताञ्च बहिःकृताः ॥ २२ अथ ते कृतसन्मानाश्चक्रिणा व्रतधारणे । भजन्ति स्म परं दाढयं लोकश्चनानपूजयत् ॥ २३ इज्यांवाता च दत्ति च स्वाध्यायं संयमं तपः । श्रुतोपासकसूत्रत्वात्स तेभ्यः समुपादिशत् ॥ २४ कुलधर्मोऽयमित्येषामहत्पूजादि वर्णनम् । तदा भरतराजर्षिरन्ववोचदनुक्रमात् ॥ २५ प्रोक्ता पूजार्हतां नित्या सा चतुर्धा सदार्चनम् । चतुर्मुखमहः कल्पद्रुमश्चाष्टाह्निकोऽपि च ॥ २६
याचप्रमाणे हे प्रभो हिरव्या कोवळ्या अंकुरादिकांत अनंत जीव असतातच व त्यांना * निगोद' म्हणतात असे सर्वज्ञाचे भाषण आम्ही ऐकले आहे ।। १८ ।।
ज्यात अतिशय ओल्या अशा फळानी, फुलानी व अंकुरादिकांनी शोभा आणली आहे असे आपल्या प्रासादाचे अंगण आज आम्ही ओलांडले नाही ॥ १९ ॥
याप्रमाणे त्यांचे भाषण ऐकून त्या सर्व दृढ व्रतिकांचे चक्रवर्तीने अभिनंदन केले व त्या लक्ष्मीवंताने दान, मान सत्कारानी पूजा केली ।। २० ।।
त्यावेळी पद्मनामक निधीपासून जी घेतली आहेत, ज्याना ब्रह्मसूत्र हे नांव आहे व एकापासून अकरा संख्येपर्यंत असलेली ती सूत्रे (यज्ञोपवीत-व्रतसूत्रे) व्रतिकांचे चिह्न म्हणून ती त्या व्रतिकांना दिली ।। २१ ।।
___ दर्शन प्रतिमा, व्रतप्रतिमा इत्यादि प्रतिमा भेदाना अनुसरून त्या व्रतिकाना भरताने एक दोन तीन अशारीतीने अकरापर्यन्त यज्ञोपवीते दिली आणि त्यांचा सत्कार चक्रवर्तीने केला व जे व्रतरहित होते त्याना बाहेर केले. अर्थात् ते बाहेर गेले ।। २२ ।।
यानंतर चक्रवर्तीने त्यांचा सन्मान केला तेव्हा व्रतधारणात अतिशय दृढ झाले व लोकही त्यांना पुजू लागले ॥ २३ ॥
भरतचक्रवर्तीने उपासक सूत्र चांगले ऐकले असल्यामुळे जिनपूजा, उदरनिर्वाह, दान देणे, स्वाध्याय करणे, संयम व तप याची माहिती त्यांना सांगितली ॥ २४ ॥
हा या श्रावकांचा कुलधर्म आहे असे म्हणून भरतराजर्षीने अनुक्रमाने त्याना त्या अर्हत्पूजादिकांचे वर्णन करावयाला सुरवात केली ।। २५ ॥
जी अर्हन्ताची नित्य पूजा आहे तिचे चार भेद आहेत- १ नित्यपूजा (सदार्चन ), २ चतुर्मुखमह, ३ कल्पद्रुम आणि आष्टाह्निक ।। २६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org