________________
३८-५४)
महापुराण
(३७५
मनुष्यजातिरेकैव जातिनामोदयोद्भवा । वृत्तिभेदाहिताद्भेदाच्चातुर्विध्यमिहाश्नुते ॥ ४५ ब्राह्मणा व्रतसंस्कारात्क्षत्रियाःशस्त्रधारणात् । वणिजोर्थार्जनान्न्यायाच्छुद्रा न्यग्वृत्तिसंश्रयात् ॥४६ तपःश्रुताभ्यामेवातो जातिसंस्कार इष्यते । असंस्कृतस्तु यस्ताभ्यां जातिमात्रेण स द्विजः ॥ ४७ द्विर्जातोहिद्विजन्मेष्टः क्रियातोगर्भतश्च यः । क्रियामन्त्रविहीनस्तु केवलं नामधारकः ॥४८ तदेषां जातिसंस्कारं द्रढयन्निति सोऽधिराट् । सम्प्रोवाच द्विजन्मभ्यः क्रियाभेदानशेषतः ॥ ४९ ताश्च क्रियास्त्रिधाम्नाताः श्रावकाध्यायसङग्रहे । सदृष्टिभिरनुष्ठेया महोदाः शुभावहाः॥५० गर्भान्वयक्रियाश्चैव तथा दीक्षान्वयक्रियाः। कन्वयक्रियाश्चेति तास्त्रिधैवं बुधर्मताः ॥ ५१ आधानाद्यास्त्रिपञ्चाशज्ज्ञया गर्भान्वयक्रियाः । चत्वारिशदथाष्टौ च स्मता दीक्षान्वयक्रियाः॥५२ कन्वयक्रियाश्चैव सप्त तज्जैः समुच्चिताः । तासां यथाक्रम नाम निर्देशोऽयमनद्यते ॥ ५३ अङ्गानां सप्तमादङ्गादुस्तरादर्णवादपि । श्लोकैरष्टाभिरुन्नेष्ये प्राप्त ज्ञानलवं मया ॥ ५४
मनुष्य जाति ही एकच आहे व ती जाति नामकर्माच्या उदयामुळे उत्पन्न झाली आहे. उपजीविकेच्या भेदामुळे तिच्यांत भेद उत्पन्न होऊन ती चार प्रकारची बनली आहे. व्रतसंस्कारामुळे ब्राह्मण, शस्त्र धारणामुळे क्षत्रिय, न्यायपूर्वक धनार्जनाने वैश्य आणि नीच वृत्तीचा आश्रय केल्याने शूद्र असे चार प्रकार झाले ॥ ४५-४६ ॥
तप करणे व शास्त्राभ्यास करणे हा ब्राह्मण जातीचा संस्कार आहे. पण तपश्चरण करणे व शास्त्राभ्यास यांचा संस्कार ज्याचा झाला नसेल त्याला जातीने फक्त ब्राह्मण म्हणावे. क्रिया व गर्भ या दोन कारणांनी जो जन्मला आहे तो द्विजन्मा-ब्राह्मण म्हटला जातो पण जो क्रिया आणि मन्त्र या दोन्हींनीही रहित आहे तो फक्त नामधारक द्विज आहे ।। ४७-४८ ॥
म्हणून यांचा जाति संस्कार दृढ करण्यासाठी या भरतेश्वराने या द्विजांसाठी संपूर्ण क्रिया भेद पुढे लिहिल्याप्रमाणे सांगितले आहेत ।। ४९ ॥
श्रावकाध्याय संग्रहांत त्या क्रिया तीन प्रकारच्या सांगितल्या आहेत. त्या सम्यग्दृष्टि श्रावकांनी अवश्य कराव्यात कारण त्यांच्यापासून उत्तम फल मिळते व कल्याण होतें ।। ५० ॥
गर्भान्वयक्रिया, दीक्षान्वयक्रिया आणि कन्वयक्रिया अशा तीन प्रकारच्या क्रिया आहेत असे विद्वानांनी सांगितले आहे ।। ५१ ।।
गर्भान्वयक्रियेचे आधान, प्रीतिसुप्रीति आदिक त्रेपन्न भेद आहेत आणि दीक्षान्वय क्रियेचे अवतारादिक अठेचाळीस भेद आहेत आणि कन्वयक्रियेचे सज्जात्यादिक सात भेद आहेत. याप्रमाणे तज्ज्ञांनी या क्रियांचा संग्रह केला आहे. आता त्या क्रियांची नावे चक्रवर्ती सांगत आहे ॥ ५२-५३ ॥
जे समुद्रापेक्षाही तरून जाण्यास कठिण आहे असे जे बारा आचारादिक अंगापैकी सातवे उपासकाध्ययन नामक जे अंग आहे त्यातून जे मला थोडेसे ज्ञान प्राप्त झाले आहे ते मी आठ श्लोकानी आपणास सांगतो ॥ ५४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org