Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३८-३५)
महापुराण
(३७३
तत्र नित्यमहो नाम शश्वज्जिनगृहं प्रति । स्वगहान्नीयमानार्चा गन्धपुष्पाक्षतादिका ॥ २७ चैत्यचैत्यालयादीनां भक्त्या निर्मापणं च यत् । शासनीकृत्य दानं च ग्रामादीनां सदार्चनम् ॥ २८ या च पूजा मुनीन्द्राणां नित्यदानानुषङगिणी । स च नित्यमहो ज्ञेयो यथाशक्त्युपबृंहितः ॥ २९ महामुकुटबद्धैश्च क्रियमाणो महामहः । चतुर्मुखः स विज्ञेयः सर्वतोभद्र इत्यपि ॥ ३० । दत्त्वा किमिच्छकं दानं सम्राभिर्यः प्रवर्त्यते । कल्पद्रुममहः सोऽयंजगदाशाप्रपूरणः ॥ ३१ आष्टाह्निको महः सार्वजनिको रूढएव सः । महानन्द्रध्वजोऽन्यस्तु सुरराजः कृतोमहः ॥ ३२ बलिस्नपनमित्यन्यस्त्रिसन्ध्यासेवया समम् । उक्तेष्वेव विकल्पेषु ज्ञेयमन्यच्च तादृशम् ॥ ३३ एवंविधविधानेन या महेज्या जिनेशिनाम् । विधिज्ञास्तमुशन्तीज्यावृत्ति प्राथमकल्पिकीम् ॥ ३४ वार्ता विशुद्धवृत्या स्यात्कृष्यादीनामनुष्ठितिः । चतुर्धा वर्णिता दत्तिर्दयापात्रसमान्वये ॥ ३५
__आपल्या घरातून गंध, फुले, अक्षत, दीप, धूपादिक हे पदार्थ दररोज जिनमंदिरात नेऊन त्यांनी जिनेश्वराची पूजा करणे त्या पूजेला नित्यमह पूजा म्हणतात. याचप्रमाणे जिनप्रतिमा, जिनमन्दिरादिक मोठ्या भक्तीने तयार करणे आणि सनदपत्र दानपत्र करून गाव, शेत, घर, दुकानाचे उत्पन्न देणे यासही नित्यपूजा म्हणतात. तसेच मुनीश्वरांना आहारदान देऊन जी पूजा केली जाते तिलाही नित्यपूजा म्हणतात. आपल्या शक्तीला अनुसरून या नित्यपूजेला वृद्धिंगत करावे ।। २७-२९ ॥
महामुकुटबद्ध राजाकडून जी मोठी पूजा केली जाते तिला चतुर्भूख पूजा किंवा सर्वतोभद्र पूजा म्हणतात ।। ३० ।।
आपणास काय पाहिजे असे विचारून दान मागणाऱ्याच्या इच्छेला अनुसरून त्याला ती वस्तु देऊन चक्रवर्तीकडून जी पूजा केली जाते तिला कल्पद्रुम पूजा म्हणतात ही पूजा जगतातील जीवांची इच्छा पूर्ण करणारी असल्यामुळे हिला कल्पद्रुम पूजा म्हणणे योग्य आहे ॥ ३१ ॥
__ आष्टाह्निक पूजा ही सार्वजनिक पूजा म्हणून रूढ आहेच आणि सुरराजानी इन्द्रानी केलेला जो जिनाचा उत्सव-जिनपूजा तिला इन्द्रध्वज पूजा म्हणतात ॥ ३२ ॥
बलि-नैवेद्य अर्पण करणे, जिनाभिषेक करणे, गीत नृत्यादिक करणे हे सर्व त्रिकाली जिन पूजा करणे व यासारखे इतर प्रकार जिनेश्वराची पालखी व रथाची मिरवणूक हे सर्व प्रकार वरील त्या त्या पूजेच्या प्रकारात अन्तर्भूत आहेत असे समजावे ।। ३३ ॥
या प्रकारच्या विधीने जी जिनेश्वराची महापूजा केली जाते पूजाविधि जाणणारे विद्वान् इज्यानामक पहिला प्रकार म्हणतात ।। ३४ ।।
निर्मल आचरण पूर्वक शेती आदिक उपजीविकेची कार्ये करणे यास वार्ता म्हणतात ब दयादत्ति, पात्रदत्ति, समदत्ति आणि अन्वयदत्ति अशी चार प्रकाराची दत्ति आहे ॥ ३५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org