Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३७४ )
( ३८-३६
सानुकम्पमनुग्राह्ये प्राणिवृन्देऽभयप्रदा । त्रिशुद्धयनुगता सेयं दयादत्तिर्मता बुधैः ॥ ३६ महातपोधनायार्चा प्रतिग्रहपुरः सरम् । प्रदानमशनादीनां पात्रदानं तदिष्यते ॥ ३७ समानायात्मनान्यस्मै क्रियामन्त्रव्रतादिभिः । निस्तारकोत्तमायेह भू हेमाद्यतिसर्जनम् ॥ ३८ समानदत्तिरेषा स्यात्पात्रे मध्यमतामिते । समानप्रतिपत्त्यैव प्रवृत्त्या श्रद्धा यान्विता ॥ ३९ आत्मान्वयप्रतिष्ठार्थं सूनवे यदशेषतः । समं समयवित्ताभ्यां स्ववर्गस्यातिसर्जनम् ॥ ४० सैषा सकलदत्तिः स्यात्स्वाध्यायः श्रुतभावना । तपोऽनशनवृत्त्यादिसंयमो व्रतधारणम् ॥ ४१ विशुद्धावृत्तिरेषैषां षट्तयीष्टा द्विजन्मनाम् । योऽतिक्रामेदिमां सोऽज्ञो नाम्नैव न गुणैद्विजः ॥ ४२ तपः श्रुतं च जातिश्च त्रयं ब्राह्मणकारणम् । तपःश्रुताभ्यां यो हीनो जातिब्राह्मण एव सः ॥ ४३ अपापोपहता वृत्तिः स्यादेषां जातिरुत्तमा । दत्तीज्याधीतिमुख्यत्वाद्व्रतशुद्धया सुसंस्कृता ॥ ४४
महापुराण
अनुग्रह करण्यायोग्य प्राणिसमूहाचे मनवचनकायेच्या शुद्धीने भय दूर करणे त्याला शहाणे लोक दयादत्ति म्हणतात ।। ३६ ।
महान् तपस्वीची सत्कारपूर्वक पूजा करून त्यांना आहारादिक देणे ते पात्रदान होय ।। ३७ ।।
क्रियाव्रते व मंत्र यानी आपल्यासारखा जो आहे व संसार समुद्रातून जो तारून नेतो अशा गृहस्थाला जमीन, सुवर्ण घर वगैरे देणे अथवा मध्यम पात्राला समान बुद्धीने श्रद्धापूर्वक जे दान देणे त्याला समानदत्ति म्हणतात ।। ३८-३९ ।।
आपल्या वंशाची चिरकाल स्थिति राहावी म्हणून आपल्या पुत्राला आपला सद्धर्म आपण मिळविलेले धन यांच्यासह धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांचे जे देणे त्यास सकलदत्ति म्हणतात ॥ ४० ॥
शास्त्राची भावना - चिंतन मनन करणे त्याला स्वाध्याय म्हणतात व तप - उपवास करणे, रसत्याग करणे वगैरे तप होय व अहिंसादिव्रते धारण करणे तो संयम होय ।। ४१ ।।
या द्विजांची वर सांगितलेली सहा प्रकारची विशुद्ध वृत्ति आहे. जो या वृत्तींचा त्याग करितो तो अज्ञ नावानेच द्विज आहे तो गुणानी द्विज नाहीं ॥ ४२ ॥
तप, श्रुत-शास्त्रज्ञान आणि जाति या तीन गोष्टी ब्राह्मणाचे कारण आहेत. पण जो तव श्रुत यांनी रहित आहे तो केवळ जातीने ब्राह्मण आहे असे समजावे ॥ ४३ ॥
या लोकांची वृत्ति पापरहित आहे म्हणून यांची जाति उत्तम आहे आणि दान देणें, पूजा करणे, शास्त्राध्ययन करणे ही यांची मुख्य वृत्ति आहे व ती व्रताच्या निर्मलपालनाने सुसंस्कृत झाली आहे ॥ ४४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org