Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३८-१७)
महापुराण
(३७१
इति निश्चित्य राजेन्द्रः सत्कर्तुमुचितानिमान् । परीचिक्षिषुराह्वास्त तदा सर्वान्महीभुजः ॥९ सदाचारैनिजैरिष्टैरनुजीविभिरन्विताः । अद्यास्मदुत्सवे यूयमायातेति पृथक् पृथक् ॥ १० हरितैरङकुरैः पुष्पैः फलैश्चाकीर्णमङ्गणम् । सम्राडचीकरतेषां परीक्षायैस्ववेश्मनि ॥ ११ तेष्वव्रता विना सङ्गात्प्राविक्षन्नृपमन्दिरम् । नानेकतः समुत्सार्य शेषानाह्वाययत्प्रभुः ॥ १२ ते तु स्ववतसिद्धयर्थ महिमाना महान्वयाः । नैषुः प्रवेशनं तावद्यावदाङकुराः पथि ॥ १३ सधान्यहरितैः कोर्णमनाक्रम्य नपाङ्गणम् । निश्चक्रमुः कृपालुत्वात्केचित्सावद्यभीरवः ॥ १४ कृतानुबन्धनाभूयश्चक्रिणः किलतेऽन्तिकम् । प्रासुकेन पथान्येन भेजुः क्रान्त्वा नपाङ्गणम् ॥ १५ प्राककेन हेतुना यूयं नायाताः पुनरागताः। केन ब्रूतेति पृष्टास्ते प्रत्यभाषन्त चक्रिणम् ॥ १६ प्रवालपत्रपुष्पादेः पर्वणि व्यपरोपणम् । न कल्पतेऽद्य तज्जानां जन्तूनां नोऽनभिद्रुहाम् ॥ १७
याप्रमाणे निश्चय करून सत्कार करण्यास योग्य असलेल्या यांची परीक्षा करावी अशी इच्छा मनात धरून भरत राजेन्द्राने सर्व राजांना बोलाविले ।। ९॥
हे नृपानो आपण आपल्या सदाचारी इष्ट नोकरवर्गासह आज आमच्या उत्सवात वेगळेवेगळे या असे आमंत्रण भरतेश्वराने पाठविले ॥ १० ॥
सम्राट भरताने त्यांची परीक्षा घेण्यासाठी हिरवे अंकुर, फुले, हिरवी-कच्ची फळे यांनी आपल्या घरातले अंगण भरून टाकले. अंगणात हिरवे अंकुरादिक पसरले ।। ११ ॥
आमंत्रिलेल्या लोकापैकी जे अणुव्रत धारक नव्हते-अव्रती होते त्यांनी विचार न करता राजमंदिरात प्रवेश केला. तेव्हा त्याना एका बाजूला करून सम्राटाने बाकीच्या लोकाना बोलाविले ॥ १२॥
ते महाकुलीन लोक आपल्या व्रताच्या सिद्धिसाठी प्रयत्नपूर्वक प्रवृत्ति करीत होते म्हणून जेवढ्या मार्गात ओले अङकुरादिक होते तेथे त्यानी प्रवेश करण्याची इच्छा केली नाही ॥ १३ ॥
हिरव्या धान्याङकुरांनी व्याप्त झालेल्या राजाङगणाला न ओलांडता दयाळू व पापापासून भय पावणारे काही व्रती लोक परत गेले ।। १४ ।।
परंतु चक्रवर्तीने त्याना येण्याचा पुनः आग्रह केला ते अन्य प्रासुक मार्गाने राजांगण ओलांडून राजाजवळ आले ॥ १५ ॥
पूर्वी कोणत्या हेतूने आपण आला नाहीत व पुनः कोणत्या हेतूने आपण आता आलेले आहात हे मला सांगा असे चक्रीने त्यांना विचारले तेव्हा ते त्याला याप्रमाणे बोलले ॥ १६ ॥
कोवळे अंकुर, पाने, फुलें इत्यादिकांचा आज पर्वकाली विधात करणे-तुडवणे वगैरे योग्य नाही व त्यात जन्मलेले कृमिकीटादिक ज्यांचा आमच्याशी द्रोह-द्वेष नाही त्यांचा आज पर्वकाली नाश करणे योग्य नाही ॥ १७ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org