Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३७-२०५)
महापुराण
यः स्तुत्यो जगतां त्रयस्य न पुनः स्तोता स्वयं कस्यचित् । ध्येयो योगिजनस्य यश्च न तरां ध्याता स्वयं कस्यचित् ॥ यो नन्नपि नेतुमुन्नतिमलं नन्तव्य पक्षे स्थितः । स श्रीमाञ्जयताज्जगत्रय गुरुर्देवः पुरुः पावनः ॥ २०४
म. ४७
यं नत्वा पुनरानमन्ति न परं स्तुत्वा च यं नापरम् । भव्याः संस्तुवने श्रयन्ति न परं यं संश्रितः श्रेयसे ।
Jain Education International
यं सत्कृत्य कृतादरं कृतधियः सत्कुर्वते नापरम् । स श्रीमान् वृषभो जिनो भवभयान्नस्त्रायतां तीर्थकृत् ॥ २०५
इत्यार्षे भगवज्जिनसेनाचार्य प्रणीते त्रिषष्टिलक्षण महापुराणसङग्रहे भरतेश्वराभ्युदयवर्णनं नाम सप्तत्रिंशं पर्व ॥ ३७ ॥
तीनही जगतातील लोकाकडून जे स्तुति करण्यास योग्य आहेत परन्तु जे स्वतः कोणाची स्तुति करीत नाहीत, योगि जन ज्याचे ध्यान करतात पण जे कोणाचे बिलकुल ध्यान करीत नाहीत; जे नमस्करणाऱ्यांना उन्नत स्थानावर नेण्यास समर्थ आहेत व जे स्वतः इतरांनी नमस्कार करण्यायोग्य पक्षात आहेत; जे अनन्त ज्ञानादि चतुष्टय लक्ष्मीने युक्त आहेत, त्रैलोक्याचे गुरू आहेत व पवित्र आहेत असे आदि जिनदेव सर्वोत्कर्षाप्रत पावत ॥ २०४ ॥
भव्य जीव ज्याना नमस्कार करून पुन: दुसऱ्या कोणाला नमस्कार करीत नाहीत, याचप्रमाणे ज्याची स्तुति केल्यावर इतर कोणाची स्तुति करीत नाहीत व आपल्या कल्याणाकरिता ज्याचा आश्रय केल्यावर इतर कोणाचा आश्रय करीत नाहीत तसेच बुद्धिमान् भव्य जीव ज्याची पूजा करून आदर केल्यावर इतरांचा आदर करीत नाहीत. ते श्रीमान् वृषभ जिन तीर्थकर संसार भयापासून आमचे रक्षण करोत ॥ २०५ ॥
( ३६९
याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्य प्रणीत आर्ष त्रिषष्टि लक्षण महापुराण संग्रहाच्या मराठी अनुवादामध्ये भरतेश्वराच्या अभ्युदयाचे वर्णन करणारे सदतीसावें पर्व समाप्त झाले ।। ३७ ।।
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org