Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
अष्टत्रिंशत्तमं पर्व |
जयन्त्वखिलवाङमार्गगामिन्यः सूक्तयोऽर्हताम् । धूतान्धतमसादीप्रा यास्त्विषोंऽशुमतामिव ॥ १ स जीयाहृपभो मोहविषसुप्तमिदं जगत् । पटविद्येव यद्विद्या सद्यः समुदतिष्ठपत् ॥ २ तं त्वा परमं ज्योतिर्वृषभं वीरमन्वतः । द्विजन्मनामथोत्पत्ति वक्ष्ये श्रेणिक भोः शृणु ॥ ३ भरतो भारतं वर्षं निजित्य सह पार्थिवैः । षष्ट्या वर्षसहस्रंस्तु दिशां निववृते जयात् ॥ ४ कृतकृत्यस्य तस्यान्तश्चिन्तेयमुदपद्यत । परार्थे सम्पदास्माकी सोपयोगा कथं भवेत् ॥ ५ महामहमहं कृत्वा जिनेन्द्रस्य महोदयम् । प्रीणयामि जगद्विश्वं विष्वग्विश्राणयन्धनम् ॥ ६ नानगारा वसून्यस्मत्प्रतिगृह्णन्ति निःस्पृहाः । सागारः कतमः पूज्यो धनधान्य समृद्धिभिः ॥ ७ अणुव्रतधरा घोरा धौरया गृहमेधिनाम् । तर्पणीया हितेऽस्माभिरीप्सितैर्वसुवाहनः ॥ ८
जिनेश्वरांची आत्म्याचे हित करणारी वचने सर्व भाषामध्ये परिणत होतात. आणि सूर्याच्या किरणाप्रमाणे ती तेजस्वी असल्यामुळे गाढ अज्ञानरूपी अन्धकाराचा नाश करितात अशी ती जिन वचने नेहमी जयवन्त होवोत ॥ १ ॥
गारुड्याची विद्या जशी विषाने मूच्छित झालेल्या जगाला प्राण्याला उठविते विषरहित करते तसे ज्यांच्या विद्येने केवलज्ञानाने मोहरूपी विषाने सुप्त झालेल्या आपले स्वरूप विसरलेल्या जगाला तत्काल उठविले मोहरहित करून त्याला आपल्या स्वरूपाची जाणीव करून दिली ते वृषभ जिनेश्वर सर्वोत्कर्ष युक्त होवोत ॥ २ ॥
अशा त्या उत्कृष्ट ज्योतिस्वरूप - उत्कृष्ट केवलज्ञान स्वरूपी वृषभ जिनाला आधी मी नमन करून नंतर महावीर भगवन्ताना नमन करितो यानन्तर मी गौतमगणधर द्विजांची ब्राह्मण वर्गाच्या उत्पत्तिचे वर्णन करितो हे श्रेणिकराजा तूं ऐक || ३ ||
भरताने अनेक राजाना बरोबर घेऊन भरतवर्षाला जिंकून साठ हजार वर्षेपर्यंन्त सर्व दिशांना जिंकण्याचे कार्य पूर्ण केले यानन्तर तो आपल्या राजधानीकडे आला ॥ ४ ॥
षट्खण्ड जिंकून कृतकृत्य झालेल्या भरताच्या मनात 'आम्ही मिळविलेली ही सम्पत्ति उत्कृष्ट अशा कार्यात कशी उपयोगी पडेल' अशी चिन्ता उत्पन्न झाली ॥ ५ ॥
मी मोठ्या ऐश्वर्याने जिनेश्वराची मोठी पूजा करून व सर्वांना धन देऊन सर्व जगाला सन्तुष्ट करीन ॥ ६॥
परन्तु जे अनगार - सर्व परिग्रहत्यागी मुनि आहेत ते निःस्पृह असल्यामुळे आमच्यापासून धन घेत नाहीत, मग धन, धान्याच्या समृद्धीने कोणता गृहस्थ पूजण्याला योग्य आहे ? ॥ ७ ॥ अहिंसा, सत्य, अचौर्य, परस्त्रीत्याग व परिग्रह प्रमाण अशी ज्यानी पाच अणुव्रते धारण केली आहेत, जे धैर्यशाली व गृहस्थामध्ये मुख्य आहेत त्यांना आम्ही इच्छित द्रव्य आणि वाहनादिक देऊन संतुष्ट करणे योग्य आहे ॥ ८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org