Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३६८)
महापुराण
( शार्दूलवि )
इत्याविष्कृत सम्पदो विजयिनस्तस्याखिलक्ष्माभृताम् । स्फीतामप्रतिशासनां प्रथयतः षट्खण्ड राज्यश्रियम् ॥ कालोऽनल्पतरोऽप्यगात्क्षण इव प्राक् पुण्यकर्मोदयात् । उद्भूतैः प्रमदावहैः षॠतुजैर्भोगैरतिस्वादुभिः ॥ २०१ नानारत्ननिधानदेशविलसत्सम्पत्ति गुर्वीमिमाम् । साम्राज्यश्रियमेकभोगनियतां कृत्वाखिलां पालयन् ॥ योsभूव किलाकुल: कुलवधूमेकामिवाङक स्थिताम् । सोऽयं चक्रधरोऽभुनक् भुवममूमेकातपत्रां चिरम् ॥ २०२ यन्नाम्ना भरतावनित्वमगमत् षट्खण्डभूषा मही । येनासेतुहिमाद्रिरक्षितमिदं क्षेत्रं कृतारिक्षयम् ॥ यस्याविनिधि रत्नसम्पदुचिता लक्ष्मीरुरःशायिनी । स श्रीमान्भरतेश्वरो निषिभुजामग्रेस रोऽभूत्प्रभुः ॥ २०३
याप्रमाणे ज्याने आपले वैभव प्रकट केले आहे व ज्याने सर्व समूहावर विजय मिळविला आहे व सर्वत्र पसरलेल्या षट्खण्ड राज्यलक्ष्मीवर इतरांचा ताबा नसून स्वतःचा पूर्ण ताबा ज्याने ठेविला आहे अशा या भरत चक्रवर्तीचा फार मोठा काळ देखिल पूर्वजन्मी संचित केलेल्या पुण्यकर्माच्या उदयामुळे उत्पन्न झालेल्या, अतिशय आनंद देणाऱ्या, अतिशय मधुर असलेल्या सहाही ऋतूपासून उत्पन्न झालेल्या अनेक प्रकारच्या भोगपदार्थांच्या उपभोगानी एक क्षणाप्रमाणे गेला ॥ २०१ ॥
( ३७-२०१
अनेक रत्ने व निधी आणि देशानी शोभणाऱ्या सम्पत्तीनी जिला गौरव प्राप्त झाला आहे, जिला महत्त्व प्राप्त झाले आहे, अशा या सम्पूर्ण राज्यलक्ष्मीला भरतेश्वराने आपणा एकट्यासच भोगता येईल अशी केली व आपल्या मांडीवर बसलेल्या कुलवधूप्रमाणे तिला करून पूर्ण अशा तिचे त्याने पालन केले व तिचे पालन करीत असता तो तिळमात्रही व्याकुळ खिन्न झाली नाही. अशा भरतेश्वराने दीर्घ काळपर्यन्त जिच्यावर एकच छत्र अशा या षट्खण्ड पृथ्वीचा दीर्घ काळपर्यन्त उपभोग घेतला व रक्षण केले ॥ २०२ ॥
Jain Education International
ही षट्खण्डानी शोभणारी पृथ्वी ज्याच्या नांवाने भरतभूमीपणास प्राप्त झाली ( अर्थात् ज्याच्या नावामुळे या भूमीला भरतभूमि असे म्हणतात ) व ज्याने सेतु - दक्षिण समुद्रापासून हिमवान् पर्वतापर्यन्त सर्व शत्रूचा क्षय करून या क्षेत्राचे रक्षण केले; प्रकट झालेली रत्ने व निधि यांच्या सम्पदेने शोभणारी लक्ष्मी ज्याच्या वक्षःस्थलावर सर्वदा राहात आहे असा तो श्रीमान् भरतेश्वर सर्व निधिपतिमध्ये सर्व चक्रवर्तीमध्ये अग्रेसर - पहिला चक्रवर्ती झाला ॥२०३॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org