Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३७-२००)
महापुराण
(३६७
पुण्याविना कुतस्तादृगन्तः पुरमहोदयः । पुण्याविना कुतस्तादृग्दशाङगो भोगसम्भवः ॥ १९३ पुण्याविना कुतस्तादृगाज्ञा द्वीपाब्धि लङघिनी । पुण्याविना कुतस्तादृग्जयश्रीजित्वरी दिशाम् ॥ पुण्याविना कुतस्तादृक्प्रतापः प्रणनामरः । पुण्याद्विना कुतस्तादगृद्योग लङघितार्णबः ॥ १९५ पुण्याद्विना कुतस्तादृप्राभवं त्रिजगज्जयि । पुण्याद्विना कुतस्तादृग्नगराजजयोत्सवः ॥ १९६ पुण्याद्विना कुतस्तादृक्सत्कारस्तत्कृतोऽधिकः । पुण्याविना कुतस्तादृक् सरिद्देव्यभिषेचनम् ॥ १९७ पुण्याविना कुतस्तादकखचराचल निर्जयः । पुण्याद्विना कुतस्तादृररत्नलाभोऽन्यदुर्लभः ॥ १९८ पुण्याविना कुतस्तादृगायतिर्भरतेऽखिले । पुण्याविना कुतस्तादृक्कोतिर्दिक्तटलङधिनी ॥ १९९ ततः पुण्योदयोद्भूतां मत्वा चक्रभृतः श्रियम् । चिनुध्वं भो बुधाः पुण्यं यत्पुण्यं सुख सम्पदाम् ॥२००
पुण्यावाचून या भरतासारखे अन्तःपुराचे राण्या वगैरे वैभव इतराना कसे बरे प्राप्त होणार? पुण्यावाचून या भरत राजाप्रमाणे दहा प्रकारचे भोग इतरांना कसे बरेप्राप्त होतील? अनेक द्वीप व समद्र याना उल्लंघून पलीकडे जाणारी अशी भरतेश्वरासारखी आज्ञा देण्याची शक्ति इतराना पुण्यावाचून कशी बरे प्राप्त होईल? व सर्व दिशाना जिंकणारी अशी भरतेश्वरासारखी जयलक्ष्मी इतराना कशी बरे प्राप्त होईल? पुण्यावाचून सर्व देवाना नम्र बनविणारा असा भरतासारखा प्रताप इतरांना कसा बरे प्राप्त होईल ? आणि पुण्यावाचून ज्याने समुद्राचे उल्लंघन केले असा भरतासारखा उद्योग इतरांना कसा बरे प्राप्त पुण्यावाचून त्रैलोक्याला जिंकणारा असा प्रभुपणा कसा बरे प्राप्त होईल? आणि पुण्यावाचून हिमवान पर्वताला जिंकण्याचा उत्सव कसा बरे प्राप्त होईल ? ॥ १९३-१९६ ॥
ईल ?
- जर या प्रभूच्या ठिकाणी पुण्योदय नसता तर हिमवान देवाने जो अधिक सत्कार केला तो केला गेला असता काय ? जर पुण्य नसते तर गंगा आणि सिंधु या देवीनी या भरत प्रभूचा अभिषेक केला असता काय ? ॥ १९७।।
पुण्याच्या अभावी जो अपूर्व विजया पर्वतावर चक्रवर्तीला विजय मिळविता आला तो मिळाला असता काय ? जर या भरतेश्वराच्या ठायीं पुण्योदय नसताना अन्यजन दुर्लभ अशा चौदा रत्नांचा लाभ त्याला कोठून झाला असता? ।। १९८ ।।
जर पुण्योदय नसता तर या सगळ्या भरत क्षेत्रात भरतेश्वराचा जो उत्कर्ष झाला तो घडून आला नसता आणि पुण्याच्या अभावी जी दिगंताला कीर्ति उल्लंघून गेली ती त्याला उल्लंघून गेली नसती ।। १९९ ।।
यास्तव भरतेश्वराला जी चक्रवर्तीची लक्ष्मी प्राप्त झाली ती पुण्याच्या उदयामुळे त्याला प्राप्त झाली असे समजून हे विद्वज्जनहो तुम्ही पुण्याचा संग्रह करा. कारण ते आपणास प्राप्त करून घेण्याच्या सुखसंपत्तीचे ते मूल्य आहे. ती पुण्यरूपी किमत दिल्याशिवाय तुम्हाला सुखसंपत्ती प्राप्त व्हावयाची नाही ॥ २०० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org