Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३७-१६५)
महापुराण
रत्नांशुजटिलास्तस्य पादुका विषमोचिकाः । परेषां पदसंस्पर्शान्मुञ्चन्त्यो विषमुल्बणम् ॥ १५८ अभेद्याख्यमभूत्तस्य तनुत्राणं प्रभास्वरम् । द्विषतां शरनाराचैर्यदभेद्यं महाहवे ॥ १५९ रथोजितज्जयोनाम्ना जयलक्ष्मीभरोद्वहः । यत्र शस्त्राणि जैत्राणि दिव्यान्यासन्ननेकशः ॥ १६० चण्डाकाण्डाशनिप्रख्यज्याघाताकम्पिताखिलम् । जितदैत्यामरं तस्य वज्रकाण्डमभूद्धनुः ॥ १६१ अमोघपातास्तस्यासन्नमोघाख्या महेषवः । यैरसाध्यजये चक्रीकृतश्लाघ्यो रणाङगणे ॥ १६२ प्रचण्डा वज्रतुण्डाख्या शक्तिरस्यारिखण्डिनी। बभूव वज्र निर्माणा श्लाध्या वजिजयेऽपि या ॥ कुन्तः सिंहाठको नाम यः सिंहनखराजकुरैः । स्पर्द्धते स्म निशानानो मणिदण्डाग्रमण्डनः ॥ १६४ तस्यासिपुत्रिका दीप्रारत्नानद्धस्फुरत्सरूः । लोहवाहिन्यभून्नाम्ना जयश्री दर्पणास्थिता ।। १६५ --...-..-----------------------..
रत्नांच्या किरणानी चमचमणाऱ्या व इतराच्या पायांचा स्पर्श झाला असता तीव्र विष बाहेर टाकणान्या अशा पादुका या चक्रवर्तीच्या होत्या. 'विषमोचिका' हे त्यांचे नाव होते ॥१५८॥
या चक्रवर्तीचे चमकणारे अभेद्य नावाने चिलखत होते व ते महायुद्धात शत्रूच्या तीक्ष्ण बाणानी अभेद्य होते ॥ १५९ ॥
या चक्रीचा जयलक्ष्मीचा भार धारण करणारा अजितंजय नावाचा रथ होता. या रथात अनेक विजयशाली दिव्य अस्त्रे होती ॥ १६० ॥
अकाली होणाऱ्या प्रचंड विद्युत्पाताप्रमाणे होणाऱ्या दोरीच्या टङ्कारानी ज्याने सारे जग कम्पित केले आहे व ज्याने दैत्य व देवाना जिंकले आहे असे या चक्रीचे वज्रकाण्ड नावाचे धनुष्य होते ।। १६१ ॥
ज्यांचे शत्रूवर पडणे व्यर्थ होत नाही असे या चक्रीचे अमोघ नावाचे महाबाण होते. या बाणाच्या योगाने चक्रवर्ती भरताला जेथे जय मिळविणे असाध्य असे अशा रणांगणातही जय प्राप्त होत असे. त्यामुळे हा चक्रवर्ती प्रशंसिला जात असे ॥ १६२ ॥
या चक्रवर्तीजवळ वज्रतुण्डा नावाचे शत्रूचे खंडन करणारे शक्ति आयुध होते. ते वज्रापासून बनविले होते व त्या आयुधाने इन्द्रालाही जिंकता येते अशी त्याची प्रशंसा केली जात असे ॥ १६३ ॥
या चक्रीचा सिंहाटक नावाचा भाला होता. त्याचा अग्रभाग फार तीव्र असल्यामुळे तो सिंहाच्या तीक्ष्ण नख्यांच्या अग्रभागाबरोबर स्पर्धा करीत असे व त्याच्या दंडाचा अग्रभाग रत्नानी जडविलेला असल्यामुळे शोभत असे ।। १६४ ॥
या भरत राजाची सुरी (जंबिया) अतिशय तेजस्वी होती. तिची मूठ रत्नानी जडविली होती व त्यामुळे ती चमकत असे. 'लोहवाहिनी' हे तिचे नाव होते व ती सुरी जयश्रीच्या दर्पणाप्रमाणे होती ।। १६५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org