Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
( ३७ - १५०
धर्मान्तोऽस्य महानासीद्धारागृहसमाह्वयः । गृहकूटकमित्यूच्चैर्वर्षावासः प्रभोरभूत् ॥ १५० पुष्करावर्त्यभिख्यं च हर्म्यमस्य सुधासितम् । कुबेरकान्त मित्यासीद्भाण्डागारं यवक्षयम् ।। १५१ वसुधारकमित्यासीत्कोष्ठागारं महाव्ययम् । जीमूतनामधेयं च मज्जनागारमूजितम् ॥। १५२ 'रत्नमाला तिराचिष्णुर्बभूवास्यावतंसिका । देवरम्येति रम्या सा मता दृष्यकुटी पृथुः ॥ १५४ सिंहवाहिन्यभूच्छय्या सिंहरूढा भयानकः । सिंहासनमथोस्योच्चैर्गुणैर्नाम्नाप्यनुत्तरम् ॥ १५४ चामराण्युपमामानं व्यतीत्यानुपमान्यभान् । विजयार्द्धकुमारेण वित्तीणीनि निधीशिने ॥ १५५ भास्वत्सूर्यप्रभं तस्य बभूवा तपवारणम् । परार्ध्य रत्ननिर्माणं जितसूर्यशतप्रभम् ॥ १५६
विद्युत्प्रभे चास्य रुचिरे मणिकुण्डले । जित्वा ये वैद्युतों दीप्ति सरुचा ते स्फुरत्विषी ॥। १५७
३६२)
महापुराण
या राजाचे उन्हाळ्यातील गरम हवेपासून रक्षण करणारे धारागृह नांवाचे मोठे स्थान होते व पावसाळयात राहण्याचे 'गृहकूटक' म्हणून स्थान गृह होते ते फार उंच होते ।। १५० ।।
या चक्रवर्तीचा चुन्याने बांधलेला शुभ्र वाडा होता. त्याचे पुष्करावर्ती हे नाव होते व याच्या जामदारखान्याचे कोषगृहाचे नाव कुबेरकान्त असे होते व त्यातील धनादिक वस्तु केव्हांही संपत नसत ।। १५१ ।।
ज्यातील धान्यादिक वस्तु केव्हांच संपत नसत असे याचे कोठार होते व त्याचे नाव 'वसुधारक' हे होते व याच्या उत्कृष्ट स्नानगृहाचे नाव 'जीभूत' असे होते ।। १५२ ।।
या चक्रीच्या कंठीचे नाव ' अवतंसिका' हे होते. ती अतिशय मनोहर कान्तीने युक्त होती आणि याच्या तंबूचे नाव 'देवराया' असे होते. तो तंबू रमणीय आणि मोठा होता ।। १५३ ।।
या चक्रवर्तीच्या निजण्याची शय्या 'सिंहवाहिनी' नावाची होती व ती भयंकर अशा सिंहानी धारण केली होती. याचप्रमाणे याचे सिंहासनही खूप मोठे व उंच होते व त्यांचे 'अनुत्तर' असे नाव होते ते सिंहासन नावाने व गुणानीही उत्कृष्ट होते. त्याच्या सिंहासनासारखे उत्कृष्ट सिंहासन दुसरे इतर राजाचे नव्हते ।। १५४ ॥
विजयार्ध पर्वताचा स्वामी अशा देवाने निधिपति भरताला जी चामरे दिली होती त्याच्यासारखी चामरे कोठेच नव्हती म्हणून ती उपमारहित अर्थात् अनुपम - शोभत होती ।। १५५ ॥
या चक्रवर्तीचे छत्र शेकडो सूर्याच्या प्रकाशाला जिंकणारे होते आणि ते बहुमूल्यवान् रत्नानी बनविले होते व त्याचे सूर्यप्रभ नाव अन्वर्थक होते ।। १५६ ॥
याच चक्रवर्तीची विद्युत्प्रभ नावाची दोन रत्नकुंडले होती. त्यांची पसरली होती व त्यानी विजेच्या कान्तीला जिंकून शोभत होती ।। १५७ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org