Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३६४)
महापुराण
(३७-१६६
कणवोऽस्य मनोवेगो जयश्री प्रणयावहः । द्विषत्कुल कुलक्ष्मान दलने योऽशनीयितः॥ १६६ सोनन्दकाख्यमस्याभूदस्तिरत्नं स्फुरद्युति । यस्मिन् करतलारूढे दोलारूपमिवाखिलम् ॥ १६७ प्राहुर्भूतमुखं खेटं विभोर्भूत मुखमङकितम् । स्फुरता श्रीमुखे येन द्विषां मृत्यमुखायितम् ॥ १६८ चक्ररत्नमभूज्जिष्णोदिक्चक्राक्रमणक्षमम् । नाम्ना सुदर्शनं दीप्रं यदुर्दशमरातिभिः ॥ १६९ प्रचण्डचण्डवेगाख्यो दण्डोऽभूच्चक्रिणः पृथः । स यस्य विनियोगोऽभडितकण्टकशोषने ॥ १७० नाम्ना वजमयं दिव्यं चर्मरत्नमभूद्विभोः । तद्वलं यद्बलाघानानिस्तीर्ण जलविप्लवात् ॥ १७१ मणिश्चूडामणि म चिन्तारत्नमनुत्तरम् । जगच्चूडामणेरस्य चित्तं येनानुरञ्जितम् ॥ १७२ सा चिन्ताजननीत्यस्य काकिणी भास्वराभवत् । या रूप्याद्रिगुहाध्वान्तविनिर्भेदैकदीपिका ॥ चमूपतिरयोध्याख्यो नृरत्नमभवत्प्रभोः । समरेऽरिजयाद्यस्य रोदसी व्यानशे यशः ॥ १७४
या चक्रीचे कणव अस्त्र होते. त्याचे मनोवेग हे नाव होते. जयलक्ष्मीची प्रीति संपादन करण्यास ते समर्थ होते. शत्रूचे वंशरूपी कुलपर्वताना फोडण्याच्या कामी ते वज्रासारखे होते ॥ १६६ ॥
या राजाचे सौनन्दक नावाचे खड्गरत्न होते. त्याची कान्ति फार चमकत असे. ते चक्रीने हातात घेतल्याबरोबर सर्व शत्रु आता काय प्रसंग गुदरेल याची काळजी करीत असत ।। १६७ ॥
या भरतेश्वराची भूतमुख नावाची ढाल होती. तिच्यावर भुताच्या मुखाची आकृति काढलेली होती. रणाच्या अग्रभागी चमकणाऱ्या या ढालीने शत्रूना मृत्युमुखाप्रमाणे भय उत्पन्न केले होते ॥ १६८ ॥
सगळ्या दिग्मण्डलावर आक्रमण करण्यास समर्थ असलेले, शत्रु ज्याला पाहण्यास असमर्थ होते असे तेजस्वी सुदर्शन चक्र या विजयी राजाचे होते ॥ १६९ ॥
या चक्रीचे चण्डवेग नावाचे प्रचंड व मोठे दंडरत्न होते व याचा उपयोग विजया 'पर्वताच्या गुहेतील काटे नष्ट करण्यासाठी झाला होता ॥ १७० ।।
या प्रभूचे 'वज्रमय' या नावाचे दिव्य चर्मरत्न होते. याच्या सामर्थ्यामुळे या चक्रीचे सैन्य जलप्रलयातून तरून गेले होते ॥ १७१ ।।
जगाला चूडामणिप्रमाणे शोभविणाऱ्या या भरतेश्वराचे चित्त ज्याने आपल्या ठिकाणी अनुरक्त केले होते असे इच्छित फल देणारे अत्युत्कृष्ट चूडामणि नावाचे रत्न होते ॥ १७२ ॥
चिंताजननी नावाचे काकिणी रत्न या भरतेश्वराला प्राप्त झाले होते. हे रत्नरूप्य पर्वताच्या गुहेतील अंधार नाहीसा करणारी जणु मुख्य अद्वितीय दिवटी होते ॥ १७३ ॥
या प्रभूचे 'अयोध्य' या नावाचे पुरुष-श्रेष्ठरत्न होते. युद्धात सर्व शत्रूना जिंकल्यामुळे याचे यश आकाश व पृथ्वी या दोहोमध्ये व्यापलेले होते ।। १७४ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org