Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५८)
महापुराण
(३७-११८
साशोककलिकां चूनमञ्जरी कर्णसङगिनीम् । बध्नती चम्पकप्रोतः केशान्तः सारुचन्मधौ ॥११८ मधौ मधुमदारक्तलोचनामास्खलद्गतिम् । बहुमेने प्रियःकान्तां मूर्तामिव मदश्रियम् ॥ ११९ कलैरलिकुलक्वाणः सान्यपुष्टविकूजितः । मधुरं मधुरभ्यष्टौत् तुष्टय वामुंविशाम्पतिम् ॥ १२० कलकण्ठोकलक्वाणमूच्छितैरलिझङगकृतः । व्यज्यतेस्मस्मराकाण्डावस्कन्दो डिडिमायितैः ॥ १२१ पुष्यच्च्यूतवनोद्गन्धिरुत्फुल्लकमलाकरः । पप्रथे सुरभिर्मासः सुरभीकृतदिङमुखः ॥ १२२ कृतालिकुलझङ्कारः सञ्चरन्मलयानिलः । अनङगनृपतेरासीद्घोषयन्निव शासनम् १२३ सन्ध्यारुणां कलामिन्दोमने लोको जगद्ग्रसः । करालामिव रक्ताक्तां दंष्ट्रां मदनरक्षसः ॥ १२४ उन्मत्तकोकिले काले तस्मिन्नुन्मत्तषट्पदे । नानुन्मत्तोजनः कोऽपि मुक्त्वानडगनुहोमुनीन् ॥ १२५ ..........................
अशोकाच्या कळ्यांनी युक्त अशा आंब्याच्या मंजरीला ती सुभद्रादेवी आपल्या कानावर धारण करीत असे व तिला चाफ्याच्या फुलांनी गुंफलेल्या आपल्या केशांच्या अग्रभागानी बांधीत असे. याप्रमाणे स्वताःस सजविणारी देवी वसन्त ऋतूत फारच शोभत असे ॥ ११८ ।।
वसन्तऋतूच्या काळी दारूच्या धुंदीने जिचे डोळे ताम्बूस बनले आहेत व त्यामुळे जिचे चालणेही अडखळत असे अशा त्या आपल्या कान्तेला सुभद्रादेवीला तो पति भरतेश्वर जणु मूर्तिमंत मदलक्ष्मी आहे असे समजत असे ॥ ११९ ।।
___ तो वसन्त ऋतू कोकिळांच्या स्वरानी युक्त अशा भुंग्याच्या मधूर गुंजारवानी जणु या भरतराजाची सन्तुष्ट होऊन स्तुति करीत होता ॥ १२० ।।
जयदुन्दुभीप्रमाणे ज्याचा आवाज भासत आहे अशा कोकिलांच्या मधुर स्वरानी युक्त असलेल्या भुंग्यांच्या गुंजारवानी जणु मदनाने एकाएकी भरतचक्रीवर छापा घातला आहे असे वाटत होते ॥ १२१ ॥
फुललेल्या आंबरायीच्या सुगन्धानी जेथील वनप्रदेश दरवळलेले आहेत व जेथे कमलांचे समूह विकसित झाले आहेत व सर्व दिशांचा प्रान्त ज्याने सुगन्धित केला आहे असा चैत्रमास चोहीकडे पसरला होता ।। १२२ ॥
. ज्याने भुंग्यांच्या गुंजारवाला आपल्याबरोबर घेतले आहे, असा चोहोकडे संचार करणारा मलय पर्वतावरील वारा मदनरूपी राजाच्या आज्ञेला चोहोकडे प्रसिद्ध करणान्या दौंडीवाल्याप्रमाणे सर्वाना वाटत होता ॥ १२३ ॥
सन्ध्यकालच्या लालरंगाने लालभडक झालेली चन्द्राची कला ही सगळ्या जगाला खाऊन टाकणारी मदनरूप राक्षसाची जणु रक्तांनी माखलेली भयंकर दाढ आहे असे लोकांनी मानले ॥ १२४ ॥
ज्यात कोकिल उन्मत्त झाले आहेत, ज्यात भुंगे उन्मत्त झाले आहेत, अशा काली मदनाशी द्रोह करणाऱ्या मुनीशिवाय कोणताही माणूस अनुन्मत्त-उन्मत्तपणाने रहित नव्हता. अर्थात मुनिजन मात्र कामोन्मत्त झाले नव्हते ॥ १२५ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org