________________
३५६)
महापुराण
(३७-१०२
वक्त्रमस्याः शशाङकस्य कान्ति जित्वा स्वशोभया। दधेऽनुभूपताकाङक कर्णाभ्यां जयपत्रकम् ॥ हेमपत्राङिकतौ तस्याः कणा लीलामवापतुः । स्वर्वनिर्जयायेव कृतपत्रावलंबनौ ॥ १०३ कपोलावुज्ज्वलौ तस्या दधतुर्दर्पणश्रियम् । द्रष्टुकामस्य कामस्य स्वा दशा दशधा स्थिताः॥ १०४ मध्येचक्षुरषीराक्ष्या नासिकाभान्मखोन्मुखी । तदामोदमिवाघ्रातुं कृतयत्ना कुतूहलात् ॥ १०५ कृत्वा श्रोतृपदे कर्णी तन्नेत्रे विभ्रमैमिथः । कृतस्पर्द्ध इवाभातां पुष्पबाणे सभापतौ ॥ १०६ अभूत्कान्तिश्चकोराक्ष्या ललाटे लुलिनालके । हेमपट्टान्तसंलग्ननीलोत्पलविडम्बिनी ॥ १०७ तस्या विनीलविसस्तकबरीबन्धबन्धुरम् । केशपाशमनङ्गस्य मन्ये पाशं प्रसारितम् ॥ १०८ इत्यस्या रूपमुद्भूतसौष्ठवं त्रिजगज्जयि । मत्वानङ्गस्तदङ्गेषु सन्निधानं व्यधाभ्रुवम् ॥ १०९
या देवीचे तोंड आपल्या शोभेने चन्द्राची कान्ति जिंकून कानांच्या मिषाने जयपत्र व भुवयांच्या मिषाने जणु जयपताका धारण करीत आहे असे दिसत होते ।। १०२ ।।
सोन्याच्या पानड्यानी युक्त असे तिचे दोन कान स्वर्गातील देवाङगनांना जिंकण्यासाठी ज्यानी शिफारशीची पत्रे जणु घेतली आहेत असे शोभत होते ॥ १०३ ।।
तिचे निर्मल चमकणारे दोन गाल दहा प्रकारच्या आपल्या अवस्था पाहण्याची इच्छा करणाऱ्या कामदेवाच्या दर्पणाच्या शोभेला धारण करीत होते. १) सर्वदा प्रियाचे किंवा प्रियेचे चिन्तन, २) तिला किंवा त्याला पाहण्याची इच्छा, ३) दीर्घ श्वासोच्छवास, ४) कामज्वर, ५) सन्ताप, ६) कोणत्याही विषयात अप्रीति, ७) मूर्छा, ८) जगण्याचा संशय, १०) मरण. या मदनाने पीडित झालेल्या स्त्री-पुरुषांच्या दहा अवस्था शास्त्रात वर्णिल्या आहेत ।। १०४ ॥
चंचलनयना अशा सुभद्रादेवीच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी असलेली आणि मुखाचे जवळ प्राप्त झालेली तिची नासिका (नाक) कौतुकाने जणु मुखाचा सुगंध हुंगण्यासाठी तिने प्रयत्न केला आहे अशी शोभत होती ॥ १०५ ॥
तिच्या दोन डोळ्यानी कानाना साक्षीदार श्रोते बनविले होते आणि मदनाला जणु त्यानी सभापति बनविले व ते दोन डोळे एकमेकाशी जणु स्पर्धा करीत आहेत असे शोभले ॥ १०६ ॥
जिचे डोळे चकोर पक्ष्याप्रमाणे आहेत अशा त्या सुभद्रादेवीच्या कपाळावर कुरळे केश रुळत होते. त्यामुळे सोन्याच्या पट्टीच्या वरील भागावर लोंबत असलेल्या नीलकमलांचे अनुकरण करणारी शोभा उत्पन्न झाली होती ॥ १०७ ।।
जिचे बन्धन सुटले आहे अशा काळ्या वेणीचा जो सुन्दर सुभद्रादेवीचा केशपाश तो मला वाटते हा मदनाने पसरलेला पाश आहे ॥ १०८ ।।
याप्रमाणे या सुभद्रादेवीचे रूप अतिशय सुन्दर असल्यामुळे हे त्रैलोक्याला जिंकणारे आहे असे मदनाला वाटले म्हणून तिच्या सर्व अवयवात तो जणु येऊन राहिला आहे असे मला वाटते ॥ १०९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org