Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३५४)
महापुराण
(३७-८५
चक्रदण्डासिरत्नानि सच्छत्राण्यायुधालयात् । जातानि मणिचर्मभ्यां काकिणी श्रीगृहोदरे ॥ ८५ स्त्रीरत्नगजवाजीनां प्रभवो रौप्यशैलतः। रत्नान्यन्यानि साकेताज्जज्ञिरे निधिभिः समम् ॥ ८६ निधीनां सहरत्नानां गुणान्को नाम वर्णयेत् । वैराजितमूर्जस्वि हृदयं चक्रवर्तिनः ॥ ८७ भेजे षड़तुजानिष्टान्भोगान्पञ्चेन्द्रियोचितान् । स्त्रीरत्नसारथिस्तद्धि निधानं सुखसम्पदाम् ॥८८ कान्तारत्नमभूत्तस्य सुभद्रेत्यनुपद्रुतम् । भद्रिकासौ प्रकृत्यैव जात्या विद्याधरान्वया ॥ ८९ शिरीषसुकुमाराङ्गी चम्पकच्छदसच्छविः । बकुलामोदनिःश्वासा पाटलापाटलाधराः ॥९० प्रबुद्धपद्मसौम्यास्या नीलोत्पलदलेक्षणा । सुभ्ररलिकुलानीलमदुकुञ्चितमूर्धजा ॥ ९१ तनदरी वरारोहा वामोरूनिबिडस्तनी। मृदुबाहुलता साभन्मदनाग्नेरिवारणिः ॥ ९२ तत्क्रमौ नूपुरामञ्जुगुञ्जितर्मुखरीकृतौ । मदनद्विरदस्येव तेनतुर्जयडिण्डिमम् ॥ ९३
चक्र, दण्ड, तरवार, छत्र ही आयुधशालेपासून उत्पन्न झाली. चूडामणि, चर्मरत्न व काकिणीरत्न है
न ही श्रीगहापासन उत्पन्न होतात. स्त्रीरत्न. गजरत्न व अश्वरत्न यांची उत्पत्ति 'विजयार्धपर्वतापासून होते. याहून बाकीची रत्ने ही अयोध्येत निधीबरोबर उत्पन्न झाली. ॥ ८५-८६ ॥
या रत्नासह निधींच्या गुणांचे कोण वर्णन करू शकेल ? कारण या निधीनी व रत्नानी चक्रवर्तीचे अत्यन्त शक्तिशाली हृदय वश केले होते ।। ८७ ॥
सुखसम्पत्तीचे निधान असे स्त्री-रत्न ज्याला सहाय्यक आहे असा तो चक्रवर्ती पंचेन्द्रियांना योग्य आणि सहा ऋतूपासून उत्पन्न होणारे जे भोग त्याचे सेवन करीत असे ॥८॥
या चक्रवर्तीचे स्त्रीरत्न सर्वदोषरहित होते. त्याचे नाव सुभद्रा होते. ती स्वभावतःच 'भद्र-मंगलस्वरूपाची होती आणि तिचा विद्याधरकुलात जन्म झाला होता ।। ८९ ॥
तिचे सर्व अंग शिरीष पुष्पाप्रमाणे सुकुमार होते. तिची अंगकान्ति पिवळ्या 'चाफ्याच्या पाकळीप्रमाणे होती. बकुल पुष्पाप्रमाणे तिचे श्वास सुगंधित होते. तिचा खालचा ओठ पाडळीच्या फुलाप्रमाणे गुलाबी रंगाचा होता ।। ९० ॥
विकसित कमलाप्रमाणे तिचे मुख सुंदर होते. निळया कमळाच्या पाकळीप्रमाणे तिचे डोळे होते. तिच्या भुवया फार सुन्दर होत्या आणि तिचे मस्तक-केश भ्रमरपंक्तिप्रमाणे काळे मऊ आणि कुरळे होते ।। ९१ ॥
तिचे पोट कृश होते व तिचे ढुंगण पुष्ट होते, तिच्या मांड्या सुंदर व तिचे स्तन पुष्ट व कठिण होते. तिचे बाहु मृदुलतेप्रमाणे नाजुक होते. ती जणु मदनाग्नीचे उत्पत्ति स्थान आहे असे वाटत असे ॥ ९२ ॥
तिचे दोन पाय पैंजणांच्या मधुर शब्दानी युक्त होते व ते तिचे पाय मदनरूपी हत्तीच्या विजयाचा नगारा जणु वाजवितात असे होते ॥ ९३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org