Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३७-८४)
महापुराण
(३५३
असिमष्यादिषट्कर्मसाधनद्रव्यसम्पदः । यतः शश्वत्प्रसूयन्ते महाकालो निधिः स वै ॥ ७७ शय्यासनालयादीनां नःसात्प्रभवो निधेः । पाण्डकाद्धान्यसम्भूतिः षड्रसोत्पत्तिरप्यतः ॥ ७८ पट्टांशकदुकलादिवस्त्राणां प्रभवो यतः । स पद्माख्यो निधिः पद्मागर्भाविर्भावितोऽद्युतत् ॥ ७९ दिव्याभरणभेदानामुद्धवः पिङ्गलान्निधेः। माणवानीतिशास्त्राणां शस्त्राणां च समुद्धवः ॥ ८० शंखात्प्रदक्षिणावर्तात्सौवर्णी सृष्टिमुत्सृजन् । स शङ्कनिधिरुत्प्रेसद्रुक्मरोचिजितार्करुक् ॥ ८१ सर्वरत्नान्महानीलनीलस्थूलोपलादयः। प्रादुष्यन्ति मणिच्छायाचितेन्द्रायुधत्विषः ॥ ८२ रत्नानि द्वितयान्यस्य जीवाजीवविभागतः । मात्राणेश्वर्यसम्भोगसाधनानि चतुर्दश ॥ ८३ चक्रातपत्रदण्डासिमणयश्चर्म काकिणी । चमूगृहपतीभाश्वयोषित्तक्षपुरोषसः ॥ ८४
दुसऱ्या महाकालनिधिपासून असि, मषी आदिक सहा कर्माना साधक अशा पदार्थांची संपत्तीची निरन्तर उत्पत्ति होत असे ॥ ७७ ॥
नैसर्प निधीपासून शय्या, आसने, घरे आदिकांची उत्पत्ति होत असे, पाण्डुकनिधीपासून सर्व धान्ये उत्पन्न होत असत व याच्यापासून सहा रसांचीही उत्पत्ति होत असे ॥ ७८ ॥
रेशमी वस्त्रे व भरजरी वस्त्रे, सुती वस्त्रे, आदिक अनेक प्रकाराच्या वस्त्रांची उत्पत्ति होत असे व तो पद्मनिधि लक्ष्मीच्या गर्भापासून उत्पन्न झाल्याप्रमाणे शोभत असे ।। ७९॥
पिंगल नामक निधीपासून दिव्य अलंकाराचे अनेक प्रकार उत्पन्न होतात आणि माणव नामक निधीपासून नीतिशास्त्राची व अनेक शास्त्रांची उत्पत्ति होते ।। ८० ॥
ज्याच्या आतील भोवरे उजव्या बाजूकडून आहेत, अशा शंखापासून सुवर्णमय वस्तूना उत्पन्न करणारा शंख नावाचा निधि आपल्या चमकणाऱ्या सुवर्णाप्रमाणे कान्तीने सूर्याच्या किरणाना जिंकणारा होता ॥ ८१ ॥
सर्वरत्न नामक निधि आपल्या मण्यांच्या कान्तीपासून इन्द्रधनुष्याची कान्ति उत्पन्न करितो व या निधीपासून महानीलमणि, नील व पद्मराग आदिक अनेक प्रकारांची रत्ने उत्पन्न होतात ॥ ८२ ॥
या चक्रवर्तीजवळ सजीव रत्ने व अजीव अशी दोन प्रकारची रत्ने होती व ती पृथ्वी व बल, ऐश्वर्य यांचा उपभोग घेण्यास साधनीभूत होती. चक्र, छत्र, दण्ड, तरवार, चूडामणि, चर्म आणि काकिणी ही सात अजीव रत्ने आणि सेनापति, गृहपति, हत्ती, घोडा, स्त्री, तक्षरत्न-सुतार आणि पुरोहित ही सात जीवरत्ने होत ।। ८३-८४ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org