Book Title: Mahapurana Part 2
Author(s): Jinsenacharya, Jindas Shastri
Publisher: Shantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
View full book text
________________
३७-६६)
महापुराण
(३५१
ताश्च तच्चित्तहारिण्यस्तरुण्यः प्रणयोद्धराः । बभुवुः प्राप्तसाम्राज्या इव रत्युत्सवश्रियः ॥५८ नाटकानां सहस्राणि द्वात्रिंशत्प्रमितानि वै । सातोद्यानि सगेयानि यानि रम्याणि भूमिभिः ॥ ५९ द्वासप्ततिः सहस्राणि पुरामिन्द्रपुरश्रियाम् । स्वर्गलोक इवाभाति नृलोको यैरलडकृतः ॥ ६० ग्रामकोट्यश्च विज्ञेया विभोः षण्णवतिप्रमाः । नन्दनोद्देशजित्वों यासामारामभूमयः ॥ ६१ द्रोणामुखसहस्राणि नवतिर्नव चैव हि । धनधान्यसमृद्धीनामधिष्ठानानि यानि वै ॥ ६२ । पत्तनानां सहस्राणि चत्वारिंशतथाष्ट च । रत्नाकरा इवाभान्ति येषामुद्घा वणिक्पथाः ॥ ६३ षोडशव सहस्राणि खेटानां परिमा मता। प्राकारगोपुराट्टालखातवप्रादिशोभिनाम् ॥ ६४ भवेयुरन्तरद्वीपाः षट्पञ्चाशत्प्रमामिताः । कुमानुषजनाकीर्णाः येऽर्णवस्य खिलायिताः ॥ ६५ संवाहानां सहस्राणि संख्यातानि चतुर्दश । वहन्ति यानि लोकस्य योगक्षेमविधाविधिम् ॥ ६६
......................
भरतेश्वरांचे चित्त हरणाया, प्रेमाने उचंबळणाऱ्या अशा त्या स्त्रिया लक्ष्मीप्रमाणे होत्या व रतिसुखाचे वेळी जणु सर्वसाम्राज्य आपल्या हाती आले आहे अशा झाल्या ॥ ५८॥
या चक्रवर्तीच्या ऐश्वर्यात ज्यांची गणना आहे अशा बत्तीस हजार नाटकशाला होत्या. त्या अनेक वाद्यानी व गायनानी व अनेक प्रकारच्या वेषानी रमणीय दिसत होत्या ॥ ५९ ।।
ज्यानी सुशोभित केलेला हा मनुष्यलोक स्वर्गाप्रमाणे शोभत आहे व ज्यांचे ऐश्वर्य इन्द्रनगराप्रमाणे आहे अशी या चक्रवर्तीची मोठ मोठी नगरे बहात्तर हजार होती ।। ६० ॥
ज्यातील बगीचे नन्दनवनाच्या प्रदेशाना जिंकित आहेत अशी शाहाण्णव कोटी गावे या चक्रवर्तीच्या स्वाधीन आहेत ॥ ६१॥
या चक्रवर्तीची धनधान्य समृद्ध अशी नव्याण्णव हजार द्रोणमुख गावे होती. नदीच्या व समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या गावाला द्रोणमुख म्हणतात ।। ६२ ।।
ज्यातील उत्कृष्ट धनसंपन्न बाजाराचे मार्ग रत्नाच्या खाणीप्रमाणे शोभतात अशी पतने अठेचाळीस हजार होती. ( रत्नांच्या खाणीनी युक्त गावाना पत्तन म्हणतात ॥ ६३ ॥
जी तट, वेशी, सज्जे, खंदक व गावकोस आदिकानी शोभत होती अशी नदी व पर्वत यानी घेरलेली गावे ज्यांना ‘खेट' म्हणतात ती गावे सोळा हजार होती ॥ ६४ ॥
या चक्रवर्तीच्या अधीन छप्पन अन्तर्वीपे होती. त्यात कुमानुष-राहत होते या अन्तर्वीपाना कुभोगभूमि म्हणतात. तेथील माणसे नाना आकाराची असतात. ही अन्त:पे समुद्राला खिळे मारून बसविल्या प्रमाणे होती ।। ६५ ।।
या चक्रवर्तीची संवाहन नावाची गावे चौदा हजार होती. ही गावे लोकांचा योगक्षेम चालवित होती अर्थात् नवीन वस्तूची प्राप्ति करून देणे यास योग म्हणतात व असलेल्या वस्तूचे रक्षण करणे यास क्षेम म्हणतात. अर्थात् ही गावे लोकांचा योगक्षेम चालवीत होती व ही गावे पर्वतावर वसलेली होती म्हणून याना संवाहन म्हणतात ॥ ६६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org