________________
३५२)
महापुराण
(३७-६७
स्थालीनां कोटिरेकोक्ता रन्धने या नियोजिताः । पक्त्री स्थालीविलीयानां तण्डुलानां महानसे ॥ कोटीशतसहस्रं स्याद्धलानां कुलियः समम् । कर्मान्तकर्षणे यस्य विनियोगो निरन्तरः ॥ ६८ तिस्रोऽस्य वजकोटयः स्युर्गोकुलैः शश्वदाकुलाः। यत्र मन्थरवाकृष्टास्तिष्ठन्ति स्माध्वगाः क्षणम्॥ कुक्षिवासशतान्यस्य सप्तैवोक्तानि कोविदः । प्रत्यन्तवासिनो यत्र न्यवात्सुः कृतसंश्रयाः॥ ७० दुर्गाटवीसहस्राणि तस्याष्टाविंशतिर्मता । वनधन्वाननिम्नादिविभागैर्वा विभागिताः ॥ ७१ म्लेच्छराजसहस्राणि तस्याष्टादशसडख्यया । रत्नानामुद्धवक्षेत्रं यः समन्तादधिष्ठितम् ॥ ७२ कालारव्यश्च महाकालो नैसर्ग्यः पाण्डुकाह्वयः । पद्ममाणवपिङ्गाब्जसर्वरत्नपदादिकाः ॥ ७३ निषयो नव तस्यासन्प्रतीतैरिति नामभिः । यैरयं गृहवार्तायां निश्चिन्तोऽभूनिधीश्वरः॥ ७४ निषिः पुण्यनिषेरस्य कालाख्यः प्रथमो मतः । यतो लौकिकशब्दादिवार्तानां प्रभवोऽन्वहम् ॥ ७५ इन्द्रियार्था मनोज्ञा ये वीणा वंशानकादयः । तान्प्रसूते यथाकालं निधिरेष विशेषतः ॥ ७६
शिजविण्याचे काम करणारे एक कोटि हंडे या चक्रीच्या स्वैपाकघरात होते. तांदुळ शिजविण्याच्या कार्वी त्यांचा उपयोग होत असे ॥ ६७ ।।।
या चक्रवर्तीचे कुळवासह नांगर एक लक्ष कोटी होते. धान्य पदरी पडल्यावर जमीन नांगरण्यासाठी त्यांचा निरन्तर उपयोग होत असे ।। ६८ ।।
ज्यात दही घुसळणे चालले असता वाटसरू क्षणपर्यन्त त्यांचे ध्वनि ऐकत उभे राहत असत. असे गायींनी गजबजलेले गौळवाडे तीन कोटी होते ।। ६९ ।।।
ज्यात रत्नांचा व्यापार होत असल्यामुळे समीपचे लोक येऊन राहत असत अशा स्थानाला कुक्षिवास म्हणतात तेथे या चक्रवर्तीचे सातशे कुक्षिवास होते ॥ ७० ॥
जेथे मोठ्या कष्टाने जाता येते अशा या चक्रवर्तीची अठ्ठावीस हजार जंगले होती. त्या जंगलाचा काही प्रदेश ओसाड, काही प्रदेश दाट झाडीचा, काही निर्जल व काही प्रदेश पर्वतमय व काही खोलगट अशा विभागानी विभक्त झालेला होता ॥ ७१ ।।
ज्यानी रत्नांच्या उत्पत्तीचा प्रदेश चोहोकडून व्यापलेला आहे असे त्या चक्रवर्तीच्या ताब्यात राहणारे अठरा हजार राजे होते ॥ ७२ ।।
काल, महाकाल, नैःसर्प, पांडुक, पद्म, माणव, पिंग, शंख आणि सर्वरत्न या नावानी प्रसिद्ध असे नऊ निधि या राजाला प्राप्त झाले होते. त्यामुळे गृहकृत्याच्या-आजीविकेच्या संबंधाने हा राजा निश्चित होता ।। ७३-७४ ।।
पुण्य निधि ज्याच्याजवळ आहे अशा या राजाचा पहिला निधि कालनावाचा होता व त्यापासून लौकिक शब्द व्याकरण वार्ता वगैरेची नेहमी उत्पत्ति होत असे. तसेच योग्य काली इन्द्रियांना आवडणारे अनेक विषय व वीणा, बासरी, नगारे आदिक वाद्यांची या कालनिधीपासून विशेष उत्पत्ति होत होती ।। ७५-७६ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org